Bigg Boss Marathi 5: वाट्टेल ते बोलणाऱ्या जान्हवी किल्लेकरचा करेक्ट कार्यक्रमच झालाय, बिग बॉसच्या घरातून...

मुंबई तक

Bigg Boss Marathi 5 News : 'तुमचा माज, तुमची दादागिरी आज इकडे बंद होणार आहे. आता मी तुम्हाला बाहेर काढणार, दरवाजा उघडा...'असे रितेश सांगतो. त्यानंतर जान्हवी रडत बाहेर जाताना दिसते. आता जान्हवी खरंच घराबाहेर पडणार की?हे फक्त नाटक आहे? याबाबतचा उलगडा आज होणार आहे.

ADVERTISEMENT

जान्हवीला बसणार रितेश भाऊचा धक्का
riteish deshmukh angry on janhavi killekar now ill take you out paddy kamble fight bigg boss marathi 5 promo marathi entertainment
social share
google news

बातम्या हायलाइट

point

चौथ्या आठवड्यातील भाऊचा धक्काचा प्रोमो रिलीज झाला

point

रितेश जान्हवीला भाऊचा धक्का देताना दिसणार

point

रितेश खरंच जान्हवीला घराबाहेर काढणार का?

Bigg Boss Marathi 5, Riteish Deshmukh : बिगबॉसच्या घरात आज चौथ्या आठवड्यातील भाऊचा धक्काचा प्रोमो रिलीज झाला आहे. या प्रोमोनुसार आज रितेश देशमुख (Riteish Deshmukh) खऱ्या अर्थाने जान्हवीला  (janhavi killekar) भाऊचा धक्का देताना दिसणार आहे. कारण प्रोमोत रितेश जान्हवीला, ''तुमचा माज, तुमची दादागिरी आज इकडे बंद होणार आहे. आता मी तुम्हाला बाहेर काढणार, दरवाजा उघडा...'' असे बोलताना दिसला आहे. त्यामुळे रितेश देशमुख खरंच जान्हवीला घराबाहे काढणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

बिग बॉस मराठीट्या आजच्या प्रोमोत रितेश देशमुख जान्हवीवर प्रचंड रागावलेला दिसतोय. या प्रोमोत रितेश म्हणतो की, जान्हवी तुम्ही 'बिग बॉस मराठी'च्या इतिहासातील एक वाईट स्पर्धक आहात. कोणत्या गोष्टीत किती पर्सनस जावं याची लिमिट असते. डिक्शनरीमध्ये ओव्हर हा शब्द फक्त तुमच्यासाठी आहे. या भाऊच्या धक्क्यावर आता मी बंदोबस्त करणार आहे. हा शो फक्त तीन महिन्यांपूरता आहे. लोक इथे करिअर घडवायला येतात. तुम्ही काय संपवायला आला आहात...तुमचा ओव्हर कॉन्फिडिन्स तुम्हाला नडणार आहे. 

हे ही वाचा : Yavatmal News : शिंदेंच्या भाषणा दरम्यान 'लाडक्या बहिणीं'नी घातला गोंधळ, नेमकं काय घडलं?

"तुम्ही नाटकी आहात, तुम्ही ढोंगी आहात. लोकांना सगळं दिसतंय. तुम्ही मेलोड्रामा करता. सगळे कॅमेरे स्वत:कडे वळवण्याचा प्रयत्न करता. पॅडींची मागितलेली माफी मनापासून होती का? एवढं असूनही पॅडी भाऊंनी मोठ्या मनाने तुम्हाला माफ केलं. जान्हवी तुम्ही मोठ्या कलाकारांसह छोट्या कलाकारांचाही अपमान करताय,अशा शब्दात रितेशने जान्हवीला सुनावलं आहे. 

तसेच  ''खोटं वागण्याला एक लिमिट असते. आम्हाला असं वाटतं जान्हवी जे करते ते सगळं नाटक आहे. या घरातली सगळ्यात खोटारडी व्यक्ती जान्हवी आहे. हे सगळं फुटेज आणि क्रेडिटसाठी तुम्ही करताय. करिअर घडवायला किती मेहनत घ्यावी लागते... लोकांचं प्रेम मिळवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. तुमचा उर्मटपणा इथे बंद होणार आहे.  तुमचा माज, तुमची दादागिरी आज इकडे बंद होणार आहे. आता मी तुम्हाला बाहेर काढणार, दरवाजा उघडा...असे रितेश सांगतो. त्यानंतर जान्हवी रडत बाहेर जाताना दिसते. आता जान्हवी खरंच घराबाहेर पडणार की?हे फक्त नाटक आहे? याबाबतचा उलगडा आज होणार आहे. 

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : 'त्या' महिलांच्या खात्यात पुन्हा 3000 होणार जमा, सरकारने घेतला मोठा निर्णय

हे वाचलं का?

    follow whatsapp