Chandrayaan-3 : विक्रम लँडरवर ‘सोनेरी कोटिंग’ का लावलं जातं तुम्हाला माहितीये का?
विक्रम लँडरवरील सोनेरी कोटिंग किंवा इतर कोणत्याही अंतराळयानाचे सिल्व्हर शीट बहुतेक वेळा अॅल्युमिनियम कोटेड पॉलिमाइडचा एक थर असतो. त्याच्या आतील बाजूस अॅल्युमिनियम आहे आणि बाहेरून सोनेरी रंग असल्यामुळे त्यावर सोन्यासारखी कोटिंग दिसते.
ADVERTISEMENT
Vikram lander Why Coated With Golden Foil Know the Reason : चांद्रयान-3 च्या विक्रम लँडरने बुधवारी (23 ऑगस्ट) संध्याकाळी 6.04 वाजता चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग केलं. इस्रोचं हे मोठं यश आहे. तसंच भारतासाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. यावेळी लँडरचे फोटो पाहिल्यावर तुमच्याही मनात एक प्रश्न निर्माण झाला असेल की, यावर सोनेरी कोटिंग का असतं? चला तर मग आज याविषयी सविस्तर जाणून घेऊयात. (Chandrayaan-3 Do you know why Golden Coating is applied on Vikram lander)
ADVERTISEMENT
भौतिकशास्त्रात (Physics) आपण इन्सुलेटर हा शब्द ऐकला आहे. अशी कोणतीही वस्तू, उपकरण किंवा घटक ज्याद्वारे उष्णता किंवा इतर कोणत्याही प्रकारची ऊर्जा येऊ किंवा जाऊ शकत नाही. अंतराळयान किंवा सॅटेलाइटवरील फॉइल सारखी दिसणारी ही गोष्ट प्रत्यक्षात मल्टी-लेयर इन्सुलेशन (MLI) आहे. हे मल्टी लेयर इन्सुलेशन अनेक रिफ्लेक्टिव्ह फिल्म्सपासून बनलेले आहे. जे खूप हलके असतात आणि त्यांची जाडी वेगवेगळी असते.
BRICS Summit : शी जिनपिगं भेटताच PM मोदी काढला मुद्दा, काय झाली चर्चा?
MLI चे सर्व स्तर सामान्यतः पॉलिमाइड किंवा पॉलिस्टर (एक प्रकारचे प्लास्टिक) चे बनलेले असतात. आणि या थरांवर अॅल्युमिनियमची कोटिंग देखील असते. प्लॅस्टिक, अॅल्युमिनियम आणि इतर थरांमध्ये कोणता थर हलका किंवा जाड आहे, ते कोणत्या प्रमाणात वापरले गेले आहेत, हे सर्व सॅटेलाइट किंवा अंतराळयान कोणत्या कक्षेत फिरेल यावर अवलंबून असते.
विक्रम लँडरवरील सोनेरी कोटिंग किंवा इतर कोणत्याही अंतराळयानाचे सिल्व्हर शीट बहुतेक वेळा अॅल्युमिनियम कोटेड पॉलिमाइडचा एक थर असतो. त्याच्या आतील बाजूस अॅल्युमिनियम आहे आणि बाहेरून सोनेरी रंग असल्यामुळे त्यावर सोन्यासारखी कोटिंग दिसते.
‘या’ सोनेरी कोटिंगचा उपयोग काय?
थर्मल कंट्रोल हा सॅटेलाइट किंवा अंतराळयानावर गुंडाळलेल्या या MLI चा सर्वात महत्वाचा थर आहे. अंतराळात खूप कमी किंवा खूप जास्त तापमान असू शकते. अंतराळयान कोणत्या कक्षेत आहे, त्याला कोणत्या तापमानाला सामोरे जावे लागेल यावर अवलंबून असते. काही कक्षेत ते उणे 200 (-200 डिग्री) अंश फॅरेनहाइट असू शकते आणि दुसर्या कक्षेमध्ये ते 300 अंश फॅरेनहाइटपर्यंत गरम असू शकते. अशा परिस्थितीत, कक्षेत फिरणाऱ्या अंतराळयानाचे तापमान संतुलित ठेवून MLI त्यातील उपकरणांचे संरक्षण करते.
ADVERTISEMENT
Bawankule : “उद्धव ठाकरे, संजय राऊत यांचे अश्रू थांबले नाहीत, त्यामुळे आज…”
हीट ट्रान्सफर म्हणजे कंडक्शन, कन्वेक्शन आणि रेडिएशन असे एका वस्तूपासून दुसऱ्या वस्तूपर्यंत उष्णता पोहोचण्याचे तीन मार्ग आहेत. पण अंतराळात सूर्याचा प्रकाश आणि त्याचबरोबर उष्णता केवळ रेडिएशनद्वारेच प्रवास करते. कंडक्शन आणि कन्वेक्शनसाठी हवेसारखे माध्यम हवे असते जे अवकाशात नसते. MLI देखील अंतराळयानाला कंडक्शन आणि कन्वेक्शनपासून पूर्णपणे संरक्षित करू शकत नाही. याचा अर्थ असा की जर एमएलआयच्यावर गरम ग्रिडल ठेवले तर उष्णता अंतराळयानापर्यंत पोहोचेल. परंतु अंतराळातील एमएलआय अंतराळयानाचे रेडिएशनपासून संरक्षण करते.
ADVERTISEMENT
त्याची रचना अशी आहे की ते सूर्यप्रकाश परत अंतराळात परावर्तित करते. यामुळे, अवकाशयानाची उपकरणं गरम होत नाहीत आणि त्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत नाही. तसंच हीट इन्सुलेशन फिचरचा हा ही फायदा आहे की ते अंतराळयानाच्या आत तापमान राखून देखील ठेवते.
MLI चे इतर फायदे कोणते?
मल्टी-लेयर इन्सुलेशनचे इतरही काही फायदे आहेत. चंद्रावर लॅंड होताना लँडरला चंद्राच्या धुळीपासूनही वाचवावं लागतं, तिथेही एमएलआय उपयुक्त ठरतं. त्याचे सेन्सर आणि इतर लहान पण आवश्यक उपकरणं धुळीमुळे खराब होत नाहीत.
MOTN : 2024 मध्ये लोक मोदींना ‘या’ मुद्द्यांवर मतदान करणार, कौलमध्ये काय?
पूर्ण लँडरला सोनेरीच कोटिंग का करतात? असाही तुमच्या मनात प्रश्न येत असेल. खरं तर, संपूर्ण अवकाशयान किंवा सॅटेलाइटवर सोनेरी कोटिंग वापरलं जात नाही. त्यातील फक्त काही आवश्यक भागांनाच MLI ने झाकलं जातं. सोनेरी कोटेड फिल्म्सचे अंतराळात बरेच फायदे आहेत. अंतराळात सूर्यप्रकाशाच्या रेडिएशनशिवाय अनेक प्रकारचे रेडिएशन आहेत. एक्स-रे, अल्ट्राव्हायोलेट किरणांसारख्या रेडिएशनमुळे होणाऱ्या गंजापासून सोनेरी कोटिंग अंतराळयानाचे संरक्षण करते.
नासा आपल्या अंतराळवीरांसाठी बनवलेल्या स्पेससूटमध्येही सोनेरी कोटिंगचा वापर करते. सूटवरील सोनेरी कोटिंगचा थर अंतराळवीरांना इन्फ्रारेड रेडिएशनपासून वाचवतो. अंतराळवीरांच्या डोक्यावर सोनेरी कोटिंगचा हलका थर असतो. जेव्हा अंतराळवीर थेट सूर्यप्रकाशाखाली येतात तेव्हा हा थर त्यांचं सूर्यप्रकाशातील हानिकारक घटकांपासून संरक्षण करतो.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT