ITR e filing process : 15 मिनिटांत स्वतःच इन्कम टॅक्स रिटर्न कसा भरायचा?
इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम मुदत संपत आली आहे. जर तुम्ही प्राप्तिकराच्या कक्षेत येत असाल तर ITR भरण्यासाठी उद्या वेळ आहे.
ADVERTISEMENT
How to file income tax return online step by step : इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम मुदत संपत आली आहे. जर तुम्ही प्राप्तिकराच्या कक्षेत येत असाल तर ITR भरण्यासाठी आज आणि उद्या वेळ आहे. मूल्यांकन वर्ष 2023-24 साठी आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2023 आहे. त्यानंतर आयटीआर भरण्यासाठी दंड भरावा लागेल. कारण आयकर रिटर्न भरण्याची मुदत वाढवली जाणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
ADVERTISEMENT
जर तुम्ही 31 जुलै 2023 पर्यंत तुमचा ITR दाखल केला नाही, तर तुम्हाला हे काम पूर्ण करण्याची संधी मिळेल. मात्र तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते.
दंड किती भरावा लागणार?
31 जुलैनंतर आयकर रिटर्न भरणाऱ्या करदात्यांना विलंब शुल्क भरावे लागणार आहे. जर एखाद्या व्यक्तीने एका वर्षात 5 लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई केली, तर त्याला उशिराने ITR भरण्यापोटी दंड म्हणून 5,000 रुपये भरावे लागतील. जर करदात्याचे वार्षिक उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर त्याला विलंब शुल्क म्हणून 1,000 रुपये भरावे लागतील. दंडासह उशीरा दाखल करण्याचा पर्याय 31 डिसेंबर 2023 पर्यंत उपलब्ध आहे.
हे वाचलं का?
नवीन आणि जुन्या कर रचना समजून घ्या
आयटीआर भरताना लक्षात ठेवा की यावेळी नवीन कर व्यवस्था डिफॉल्टमध्ये ठेवण्यात आली आहे. जर तुम्हाला जुन्या कर प्रणाली अंतर्गत आयटीआर फाइल करायचा असेल तर तुम्हाला ते स्वतःच पर्याय बदलावा लागणार आहे. नवीन कर प्रणालीमध्ये कर सूट मिळविण्यासाठी खूप मर्यादित पर्याय आहेत. कारण 7 लाखांपर्यंतचे उत्पन्न प्रभावीपणे करमुक्त करण्यात आले आहे. त्याच वेळी, जुन्या कर प्रणालीमध्ये कर सूट मर्यादा वाढविण्यात आलेली नाही. पण तिथे तुम्ही सरकारी बचत योजनांमध्ये आणि इतर मार्गांनी गुंतवणूक करून कर सवलतीचा दावा करू शकता.
वाचा >> मुंबई Tak Chavadi: ‘पंकजाताईंना कोणीही संपवत नाहीए’, धनंजय मुंडेंनी फडणवीसांना घातलं पाठिशी?
नवीन आयकर रचना
0 ते 3 लाख 0 टक्के
– 3 ते 6 लाखांवर 5 टक्के
– 6 ते 9 लाखांवर 10 टक्के
– 9 ते 12 लाखांवर 15 टक्के
– 12 ते 15 लाखांवर 20 टक्के
– 15 लाखांपेक्षा जास्त रकमेवर 30 टक्के
ADVERTISEMENT
जुनी आयकर रचना
– 2.5 लाखांपर्यंत – 0 टक्के
– 2.5 लाख ते 5 लाख – 5 टक्के
– 5 लाख ते 10 लाख – 20 टक्के
– 10 लाखाच्या वर – 30 टक्के
ADVERTISEMENT
वाचा >> Loksabha सर्व्हे: महाराष्ट्राने शिंदे-अजित पवारांना नाकारलं, NDA ला मिळणार फक्त…
ITR भरताना या गोष्टी लक्षात ठेवा
योग्य ITR फॉर्म निवडा.
– उत्पन्नाची योग्य माहिती द्या.
– करमुक्त उत्पन्नाबद्दल चुकीची माहिती देऊ नका.
– योग्य वैयक्तिक माहिती द्या.
– कर परतावा पडताळून घ्या.
– फॉर्म 2AS डाउनलोड करणे आवश्यक आहे आणि ते तुमच्या उत्पन्नाशी जुळले पाहिजे.
हेल्प डेस्क 24×7 कार्यरत आहे
आयकर विभागाकडून सांगण्यात आले आहे की, आमचा हेल्पडेस्क करदात्यांना मदत करण्यासाठी 24×7 कार्यरत आहे. हे लोकांना आयटीआर फाइल करण्यापासून ते कर भरण्यापर्यंतच्या सेवांसाठी मदत करत आहे. हेल्प डेस्क कॉल, लाइव्ह चॅट, वेबेक्स सत्र आणि सोशल मीडियाद्वारे मदत करत आहे.
घरबसल्या ITR कसा भरायचा?
– आयकर विभागाच्या ई फायलिंग पोर्टलवर म्हणजे https://eportal.incometax.gov.in/ या साईटवर जा.
– त्यानंतर होम पेजवर यूजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा.
– डॅशबोर्ड गेल्यानंतर ई-फाईल > आयकर रिटर्न > ‘आयकर रिटर्न भरा’ यावर क्लिक करा.
– त्यानंतर असेसमेंट वर्ष निवडा. उदा. 2023-24 निवडून कंटिन्यू बटणावर क्लिक करा.
– आता आयटीआर फायलिंगची पद्धत निवडा आणि ऑनलाईन पर्याय निवडा.
– आता तुमच्या उत्पन्नाप्रमाणे आणि टीडीएस कॅल्क्युलेशनप्रमाणे ITR फॉर्म निवडा.
– ITR निवडल्यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रे जवळ ठेवा आणि स्टार्ट पर्यायावर क्लिक करा.
– आता स्क्रीनवर काही प्रश्न येतील. जे तुम्हाला लागू पडतात, त्यावर क्लिक करून कंटिन्यू बटणावर क्लिक करा.
– कागदपत्रांप्रमाणे तुमचं उत्पन्न आणि डिडक्शनची माहिती वेगवेगळ्या सेक्शनमध्ये भरा.
– टॅक्स लायबिलिटीच असतील, तर तुम्ही भरलेल्या माहितीच्या आधारावर टॅक्स कॅल्क्युलेशनची माहिती दिसेल.
– तुम्ही कर भरण्यास पात्र ठरत असल्यास त्यानंतर आता पैसे भरा किंवा नंतर पैसे भरा या दोन्ही पैकी एक पर्याय निवडू शकता.
– जर कर भरावा लागत नसेल, तर प्रिव्ह्य रिटर्न वर क्लिक करा.
– त्यानंतर प्रिव्ह्यू आणि जमा करा या बॉक्स वर क्लिक करा आणि व्हॅलिडेशनसाठी पुढे जा या पर्यायावर क्लिक करा.
– प्रिव्ह्य बघा आणि रिटर्न जमा करा या पेज वर व्हेरिफाय करण्यासाठी पुढे जा. रिटर्न व्हेरिफाय करणे आणि पडताळणी करणे आवश्यक आहे.
– व्हेरिफाय पेज जो पर्याय निवडून तुम्ही ई-पडताळणी करू इच्छिता, ती निवडा आणि कंटिन्यू बटणावर क्लिक करा.
– तुम्ही रिटर्न ई व्हेरिफाय केल्यानंतर फॉर्म यशस्वीपणे भरल्याचा मेसेज स्क्रीनवर दिसेल.
– ट्रॅजेक्शन आयडी आणि अॅक्नॉलेजमेंट नंबर स्क्रीनवर दिसेल. याच्या आधारे तुम्ही आयटीआर फॉर्मचं स्टेटस बघू शकता.
– ई-फायलिंग पोर्टलवर तुमचा जो मोबाईल नंबर आणि इमेल आयडी नोंदवला आहे, त्यावर फॉर्म भरला गेल्याचा मेसेज येईल.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT