CRPF Recruitment 2024 : CRPF मध्ये परिक्षेशिवाय नोकरीची संधी, पगार तब्बल 75 हजार महिना, कसा कराल अर्ज?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

केंद्रीय राखीव पोलीस दलात नोकरीची संधी

point

अर्ज करण्यासाठी कोणकोण पात्र?

केंद्रीय राखीव पोलीस दलाने (CRPF) पशुवैद्यकीय पदांसाठी अर्ज मागवले आहेत. नोकरीच्या शोधात असलेल्या तरूणांना नोकरीची ही सुवर्णसंधी आहे. इच्छूक उमेदवारांना crpf.gov.in वर जाऊन अर्ज करता येणार आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 2 पदांची भरती केली जाणार आहे. निवडलेल्या उमेदवारांना 5व्या आणि 10व्या NDRF बटालियनमध्ये कंत्राटी पद्धतीने नियुक्त केले जाईल.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Maharashtra Assembly Session Live Updates : नागपुरात आजपासून विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात

कोण कोण करु शकतं अर्ज?

1. अर्ज करण्यासाठी उमेदवारांची कमाल वयोमर्यादा 70 वर्षे निश्चित करण्यात आली आहे.

2. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन या विषयात पदवी प्राप्त केलेली असावी.

हे वाचलं का?

3. भारतीय पशुवैद्यकीय परिषदेकडे नोंदणी असावी.

तसंच या पदांवरील उमेदवारांची भरती कंत्राटी पद्धतीने केली जाणार आहे.

ADVERTISEMENT

पगार किती?

या पदांवरील उमेदवारांना दरमहा अंदाजे 75 हजार रुपये पगार मिळेल.

ADVERTISEMENT

निवड प्रक्रिया कशी असेल?

या भरती प्रक्रियेत उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल.

5व्या NDRF बटालियनमधील पशुवैद्यकीय पदासाठी वॉक-इन-मुलाखत 6 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9 वाजता कंपोझिट हॉस्पिटल, CRPF, GC कॅम्पस, तळेगाव, पुणे येथे होणार आहे.

 

हे ही वाचा >> Zakir Hussain Passes Away in US : कला विश्वावतला सूर्य मावळला, झाकीर हुसैन यांचं अमेरिकेत निधन


10 व्या NDRF बटालियनमधील पशुवैद्यकीय पदासाठी वॉक-इन-मुलाखत 6 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9 वाजता कंपोजिट हॉस्पिटल, CRPF, हैदराबाद, तेलंगणा-500005 येथे होईल.

उमेदवारांना अर्ज करण्यापूर्वी अधिकृत अधिसूचनेत पात्रता आणि शैक्षणिक पात्रता तपासण्याचा सल्ला दिला जातो. अधिक माहिती मिळविण्यासाठी, उमेदवारांना अधिकृत वेबसाइटला भेट देण्याचा सल्ला दिला जातो.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT