Ladki Bahin Yojana : फक्त 'याच' महिलांच्या खात्यात 3000 होणार जमा, तुमच्या बँकेत येणार का?

मुंबई तक

ADVERTISEMENT

ladki bahin yojana scheme fourth and fifth installment 3000 amount deposite only these women account mukhymantri ladki bahin yojana scheme aditi tatkare ajit pawar eknath shinde
महिलांची दसरा, दिवाळी गोड होणार
social share
google news

बातम्या हायलाइट

point

महिलांच्या खात्यात चौथा आणि पाचवा हप्ता जमा

point

तुमच्या खात्यात आले का 3000 रूपये?

point

'या' महिलांना मिळणार 3000 रूपयाचा लाभ

Mukhymantri Ladki Bahin Yojana, Fourth Installement : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा चौथा आणि पाचवा हप्ता येत्या 10 ऑक्टोंबरपर्यंत महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. म्हणजेच महिलांच्या खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे एकत्रित मिळून 3000 रूपये महिलांच्या खात्यात येणार आहेत.  त्यामुळे महिलेांची दसरा, दिवाळी गोड होणार आहे. पण असे असले तरी हे 3000 रूपये नेमक्या कोणत्या महिलांच्या खात्यात येणार आहेत? हे जाणून घेऊयात. (ladki bahin yojana scheme fourth and fifth installment 3000 amount deposite only these women account mukhymantri ladki bahin yojana scheme aditi tatkare ajit pawar eknath shinde)  

ADVERTISEMENT

खरं तर जुलै महिन्यापासून या योजनेची सूरूवात झाली होती. त्यावेळी ज्या महिलांनी 31 जुलै आधी अर्ज केले होते आणि त्यांचे अर्ज देखील मंजूर झाले होते. त्या महिलांना ऑगस्ट महिन्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000   रूपये देण्यात आले होते. त्यानंतर ज्या महिलांनी 31 जुलै नंतर अर्ज केला होता. त्या महिलांना सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पैसे पाठवण्यात आले होते. यामध्ये ज्या महिलांना आधी 3000 रूपये मिळाले होते. त्या महिलांना आता सप्टेंबर महिन्याचे 1500 रूपये देण्यात आले होते. तर ज्या महिलांना अर्ज केल्यापासून एकही हप्ता मिळाला नव्हता. त्या महिलांच्या खात्यात तिसऱ्या टप्प्यात 4500 जमा झाले होते. 

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : महिलांनो...7500 की 3000 रूपये, तुमच्या खात्यात किती रूपये जमा होणार?

आता या महिलांना चौथा आणि पाचवा हप्ता येणार आहे. सरकार ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्याचे एकत्रित मिळून 3000 रूपये देण्यात येणार आहेत. त्यामुळे ज्या महिलांना आता सप्टेंबर महिन्यापर्यंतचे पैसे आले आहेत, त्याच महिलांना आता 3000 रूपयाचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे या महिलांच्या खात्यात आता 10 ऑक्टोबरपर्यंत पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे महिलांनी त्याचे बँक खाते आणि मेसेज तपासायला सूरूवात करा. 

हे वाचलं का?

दरम्यान कागदपत्रांत त्रुटी असल्यामुळे तसेच चुकीच्या पद्धतीने अर्ज भरल्यामुळे अनेक महिलांना अद्याप एकाही हप्त्याचे पैसे मिळाले नाही आहेत. ज्या महिलांचे बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक नाही आहेत. त्या महिलांच्या खात्यावरही पैसे आले नाही आहेत. त्यामुळे अद्याप एकही हप्ता न मिळालेल्या महिलांनी लवकरच बँक खाते आधार क्रमांकाशी जोडून घ्यावे, असे आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे. 

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींची दसरा, दिवाळी झाली गोड! 4500 नंतर 3 हजार खात्यात जमा, तुमचे आले का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT