Mazi Ladki Bahin Yojana: महिलांनो तुमचा अर्ज Pending म्हणजे, 1500 रुपये...

मुंबई तक

ADVERTISEMENT

महिलांनो तुमचा अर्ज Pending म्हणजे, 1500 रुपये...
महिलांनो तुमचा अर्ज Pending म्हणजे, 1500 रुपये...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लाडकी बहीण योजनेचा अर्जाचे नेमकी स्थिती काय?

point

लाडकी बहीण योजनेची यादी जाहीर

point

Pending to submitted लाडकी बहीण योजनेच्या अर्जाचा नेमका अर्थ काय?

Mazi Ladki Bahin Yojana: मुंबई: महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेसाठी महिलांकडून अर्ज मागवले जात आहेत, त्याअंतर्गत आतापर्यंत राज्यातील 80 लाख महिलांनी नारी शक्ती दूत ॲपद्वारे अर्ज केले आहेत. आणि आतापर्यंत ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज केले आहेत, त्या महिलांचे अर्ज प्रलंबित (Pending) असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता अनेक महिला त्यांच्या अर्जाचं नेमकं झालं तरी काय? असा सवाल विचारत आहेत. (mazi ladki bahin yojana your application status pending to submitted means more delay in getting rs 1500)

लाडकी बहिन योजनेची प्रलंबित अर्जाबाबत अनेक प्रश्न हे विचारले जात आहेत. त्यामुळे याचबाबत आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.

Pending to Submitted Ladki Bahin Yojana म्हणजे काय?

Ladki Bahin Yojana Pending to Submitted म्हणजेच अर्ज केल्यानंतर अर्ज प्रलंबित म्हणून दाखवला जातो. याचा अर्थ असा होतो की तुम्ही केलेला अर्ज संबंधित अधिकाऱ्यांच्या तपासणीत प्रलंबित आहे आणि सरकारी अधिकारी तुमच्या अर्जाची तपासणी करतात. म्हणजेच ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाइन अर्ज केला आहे आणि ते सादर केलेल्या अर्जाचे स्टेट्स हे प्रलंबित दाखवत आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Mazi Ladki Bahin Yojana List 2024: माझी लाडकी बहीण योजनेची यादी जाहीर, नाव कसं दिसणार?

आता अशा परिस्थितीत त्यांचा अर्ज अद्याप का स्वीकारला गेला नाही, अशी चिंता महिलांना लागली आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत त्या सर्व महिलांनी काळजी करण्याची गरज नाही. कारण राज्य सरकार लाभार्थी महिलांनी केलेल्या ऑनलाइन अर्जाची पुन्हा तपासणी करत आहे, जर तुमच्या अर्जात दिलेली सर्व माहिती खरी असेल तर तुमच्या अर्जाची सत्यता तपासला गेल्यावर तो स्वीकारला जाईल, त्यानंतर तुम्हाला या समस्येचा सामना करावा लागणार नाही.

माझी लाडकी बहीण योजना फॉर्म स्टेट्सचे नेमके प्रकार कोणते? (Majha Ladki Bahin Yojana Form Status)

राज्यातील ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज केला आहे, त्यांच्या अर्जाची स्थिती तपासण्यासाठी त्यांना तीन प्रकारचे स्टेट्स बघायला मिळतील. जे अर्जाची नेमकी स्थिती काय आहे ते दर्शवतं.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Govt Job:  कर्मचारी राज्य विमा महामंडळात नोकरीची संधी! महिना मिळणार एवढा पगार...

1. प्रलंबित स्थिती (Pending Status) - जर तुमची अर्जाची स्थिती अजूनही प्रलंबित म्हणून दर्शवत असेल, तर याचा अर्थ तुमच्या अर्जाची छाननी प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहे.

ADVERTISEMENT

2. रिजेक्ट स्टेटस (Reject Status) - जर तुमच्या अर्जाची स्थिती Reject दिसत असेल, तर याचा अर्थ तुमचा अर्ज सरकारने रद्द केला आहे.

3. पुनरावलोकन स्थिती (Review Status) - जर तुमच्या अर्जाची स्थिती Review म्हणून असेल, तर याचा अर्थ असा आहे की, सरकार तुमच्या अर्जाचे पुनरावलोकन करत आहे.

4. मंजुरीची स्थिती (Approval Status) - जर तुम्ही तुमचा अर्ज तपासला गेला आणि त्याची स्थिती Approval असेल, तर याचा अर्थ तुमच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाली असून तो अर्ज स्वीकारला गेला आहे. 

 

योजनेचं नाव

माझी लाडकी बहीण योजना

कोणी सुरू केली?

महाराष्ट्र सरकार

संबंधित मंत्रालय

महिला आणि बाल विकास विभाग

राज्य

महाराष्ट्र

वर्ष

2024


लाभार्थी

राज्यातील महिला

उद्देश

महिलांना स्वावलंबी बनवणं

लाभ

प्रतिमाह 1500 रुपये

यादीमध्ये नाव तपासण्याची प्रक्रिया

ऑनलाइन

अधिकृत वेबसाइट

https://ladakibahin.maharashtra.gov.in/

 

Ladki Bahin Yojana form Pending to Submitted  

बहुतेक महिलांची समस्या अशी आहे की त्यांना अर्ज दाखल करताना Image Not Support समस्या येते. 

पण ही समस्या तेव्हा येते जेव्हा आपण स्क्रीन शॉट घेतो अनेक कागदपत्रे दिसत नाहीत, पण पासपोर्ट आकाराचा फोटो घेतल्यास  घेतला किंवा लाइव्ह फोटो काढला असेल, तर ते तुम्हाला तिथं पाहायला मिळतं. पण ही तुमची समस्या नाही, ही समस्या ज्या ॲपवरून तुम्ही अर्ज केला आहे त्याची आहे.

त्यामुळे तुम्हाला याची काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही फोटो अपलोड केल्यानंतरही तो दिसला नाही तरीही अपलोड बटणावर क्लिक करा, त्यानंतर तुम्हाला OTP विचारला जाईल. तो ओटीपी टाकून फॉर्म सबमिट करा. यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT