Aditya Thackeray Net Worth : आदित्य ठाकरेंची संपत्ती किती वाढली?
Aditya Thackeray New Worth : वरळी विधानसभा मतदार संघातून ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे विधानसभा निवडणूक लढवणार आहे. आज आदित्य ठाकरेंनी उमेदवारी अर्जासोबत प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपल्या संपत्तीचे तपशील दिले आहेत.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
आदित्य ठाकरेंनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे
प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपल्या संपत्तीचे तपशील दिले आहेत.
आदित्य ठाकरेंची एकूण संपत्ती किती?
Aditya Thackeray Net Worth : वरळी विधानसभा मतदार संघातून ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे विधानसभा निवडणूक लढवणार आहे. आज आदित्य ठाकरेंनी उमेदवारी अर्जासोबत प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपल्या संपत्तीचे तपशील दिले आहेत. त्यामुळे प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार त्यांची नेमकी एकूण संपत्ती किती आहे? हे जाणून घेऊयात. (aditya thackeray net worth contest election on worli assembly seat maharashtra assembly election 2024)
ADVERTISEMENT
प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, आदित्य ठाकरेंकडे 15 कोटी रूपयांहून अधिक रूपयांची चल संपत्ती आहे.चल संपत्ती म्हणजे ही संपत्ती कुठेही आपण सोबत घेऊन जाऊ शकतो. आदित्य ठाकरेंकडे अशी 15 कोटींहून जास्त चल संपत्ती असल्याची माहिती त्यांच्या प्रतिज्ञापत्रातून समोर आली आहे.
आदित्य ठाकरे यांची अचल संपत्ती 6 कोटी 4 लाख रूपयांची आहे. आदित्य ठाकरे यांच्या बँकेतील रक्कम आणि ठेवी ही 2 कोटी 81 लाख रूपयांची आहे. आदित्य ठाकरे यांनी 5 लाखांचे 50 हजार शेअर घेतले आहेत. तसेच त्यांची म्युच्युअल फंड आणि शेअर मार्केटमध्ये एकूण 10 कोटी 14 लाख रूपयांची गुंतवणूक केली आहे. आदित्य ठाकरे यांच्याकडे 1 कोटी 91 लाख रूपयांचे सोने-चांदी आहे. आदित्य ठाकरे यांची कर्जतच्या भिसेगाव येथे 171 स्क्वेअर मीटर इतकी जमीन आहे.
हे वाचलं का?
हे ही वाचा : Constituency Wise congress Candidates List: काँग्रेसची पहिली यादी जाहीर, 48 उमेदवार जाहीर; ठाकरेंना काय संदेश?
आदित्य ठाकरेंवर एक गुन्हा
प्रतिज्ञापत्रानुसार, आदित्य ठाकरे यांच्यावर 1 गुन्हा दाखल आहे. डिलाईल रोड खुला केल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल झालाय.आदित्य ठाकरे यांच्या नावावर रायगड येथे काही एकर जागा आहे, ज्याचं आताचं बाजारमूल्य 1 कोटी 48 लाख 51 हजार 350 रुपये आहे.याशिवाय आदित्य ठाकरे यांच्या नावावर ठाकुर्ली आणि घोडबंदर येथे दोन दुकानाचे गाळे आहेत. त्यांचं आताचं बाजार मूल्य 4 कोटी 56 लाख रुपये आहे. आदित्य ठाकरे यांच्याकडे BMW चार चाकी वाहन आहे.
बँकेत किती पैसे आहेत?
आदित्य ठाकरे यांच्याकडे 1 कोटी 91 लाख 07 हजार 159 रुपयांचे दागिने आहेत. आणि 15 कोटी 43 लाख 03 हजार 060 जंगम मालमत्ता आहे. तर 6 कोटी 04 लाख 51 हजार 350 रुपयांची अचल मालमत्ता आहे.आदित्य ठाकरे यांच्या बँक खात्यात 2 कोटी 44 लाख 18 हजार 985 रुपये आहेत. 2 कोटी 81 लाख 20 हजार 723 रुपयाचे फिक्स डिपॉझिट आहे. 70 हजार रूपये शेअर मार्केट गुंतवले आहेत. म्युच्युअल फंडात 10 कोटी 13 लाख 78 हजार 052 रुपये आहेत. आणि त्यांनी 50 हजार रूपयांचे बॉण्ड्स घेतले आहेत. 21 लाख 55 हजार 741 रुपये त्यांनी एलआयसी पॉलिसीत गुंतवले आहेत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : NCP Sharad Pawar: पाहा तुमच्या मतदारसंघात शरद पवारांनी कोणाला दिली उमेदवारी!
दरम्यान आदित्य ठाकरे यांची 2019 ची विधानसभा निवडणुक लढवताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांची एकूण संपत्ती त्यावेळी 16 कोटी होती. आणि आता 2024 मध्ये सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची एकूण संपत्ती 15 कोटी आहे. त्यामुळे प्रतिज्ञापत्रानुसाप त्यांची संपत्ती 1 कोटी घटल्याचे समजते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT