Mahayuti : 'बटेंगे तो कटेंगे'ला अजित पवार यांचा विरोध, मतांचं गणित जुळवण्यासाठी महायुतीचा प्लॅन?
'बटेंगे तो कटेंगे' सारख्या घोषणा उत्तर प्रदेश किंवा झारखंडमध्ये चालतील, महाराष्ट्रात ते चालणार नाही अशी स्पष्ट भूमिक अजित पवार यांनी घेतली होती.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
'बटेंगे तो कटेंगे'ला अजितदादांचा विरोध
मतांचं गणित जुळवण्यासाठी युतीचा प्लॅन?
अजित पवार यांच्या भूमिकेचा राजकीय अर्थ काय?
Maharashtra Vidhan Sabha : राज्यात विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीचे भाजप आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक लढत आहेत. महायुतीच्या प्रचारासाठी नेत्यांची मोठी फौज सध्या मैदानात आहे. अशातच योगी आदित्यनाथ यांनी प्रचारादरम्यान बटेंगे तो कटेंगे ही घोषणा दिली आहे. या घोषणावरुन महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा झाली होती. विरोधकांकडून या घोषणेला विरोध झालाच, मात्र महायुतीचे महत्वाचे घटक असलेल्या अजित पवार यांनीही या घोषणेला विरोध केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. अजित पवार यांचं या घोषणाला थेट विरोध करणं हा खरंच विरोध आहे की अल्पसंख्याक समाजाची मतं मिळवण्याचा प्लॅन? अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >>Riteish Deshmukh : धर्म वाचवा म्हणणाऱ्यांचा पक्ष धोक्यात... रितेश देशमुख तुफान बरसले, भाषणाची चर्चा
'बटेंगे तो कटेंगे' सारख्या घोषणा उत्तर प्रदेश किंवा झारखंडमध्ये चालतील, महाराष्ट्रात ते चालणार नाही अशी स्पष्ट भूमिक अजित पवार यांनी घेतली होती. अजित पवार म्हणाले होते की, या गोष्टी इथे चालत नाही, इतर राज्यात चालतात. ते इतर राज्याचे नेते आहेत भाजपचे, मुख्यमंत्री आहेत, त्यांनी काय बोलावं ते त्यांचं मत आहे. अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या निवडणुकीत 'सबका साथ, सबका विकास'चा नारा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा आणि यशवंतराव चव्हाणांच्या विचारांना मानणारा पक्ष असल्याचं अजित पवार वारंवार सांगत असतात. मात्र थेट महायुतीच्या नेत्यांच्या घोषणेला असहमती दाखवणं ही अजित पवार यांची भूमिका खरंच महायुतीत पडलेला मिठाचा खडा आहे की महायुतीचा प्लॅन अशी चर्चा सध्या सुरू आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये मतांचं गणित साधण्यासाठी ही खेळ केल्याचीही शक्यता आहे.
महायुतीची जाहिरात, पगड्यांची चर्चा...
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कटेंगे तो बटेंगे ही घोषणा दिली होती, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'एक हैं तो सेफ हैं' हा नारा दिला. या घोषणेबाबत महायुतीने राज्यातील वृत्तपत्रांच्या पहिल्याच पानावर या घोषणेची जाहिरातही दिसली. या जाहिरातीमध्ये महायुतीच्या तिन्ही पक्षांचे चिन्ह आहेत. तसंच राज्यातील वेगवेगळ्या समाजाच्या वेशभुषेवर घातल्या जाणारे फेटे, पगड्या, टोप्याही यामध्ये दिसतात. यामध्ये विशेषत: हिंदू धर्मातील वेगवेगळ्या जातींच्या, पद्धतींच्या आणि वेगवेगळ्या भागात वापरल्या जाणाऱ्या फेटे, पगड्या आणि टोप्यांचा समावेश आहे. त्यामुळे या जाहिराचीच्या माध्यमातून महायुतीने आपला मतदार टार्गेट करण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतंय.
हे ही वाचा >>Chief Justice Sanjiv Khanna : भारताचे 51 वे सरन्यायाधीश म्हणून संजीव खन्ना यांनी घेतली शपथ
अजित पवारांच्या भूमिकेचा अर्थ काय?
महायुतीचे तीन पक्ष सध्या राज्यात जास्तीत जास्त मतदान मिळवण्यासाठी वेगवेगळ्या आघाड्यांवर काम करत आहेत. त्यामुळे शिवसेना आणि भाजप हे दोन पक्ष महायुतीचा अजेंडा पुढे घेऊन जात असताना मुस्लिम आणि दलित समाजाला सोबत घेण्यासाठी अजित पवार यांच्यामाध्यमातून एक वेगळा अजेंडा चालवला जात असल्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केली जात आहे.
अजित पवार यांच्यावर सध्या त्यांच्याकडे असलेला पक्ष हाच खरा राष्ट्रवादी पक्ष आहे हे सिद्ध करण्याचं मोठं आवाहन आहे. त्यामुळे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसची विचारसरणी पूर्णपणे पाळण्याचाही प्रयत्न करत असल्याचं बोललं जातंय. तसंच त्यांच्या पक्षाकडे असलेल्या मुस्लिम उमेदवारांवरही त्यांना लक्ष ठेवावं लागणार असल्याचं स्पष्ट चित्र आहे. ही सगळी गणितं साध्य करण्यासाठी अजित पवार सध्या जोरदार तयारी करत असल्याचं दिसतंय.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT