Baramati Vidhan Sabha: अजित पवारांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला!
Ajit Pawar vs Yugendra Pawar: लोकसभा निवडणुकीनंतर बारामतीत पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार अशी राजकीय लढाई बघायला मिळणार आहे. पार्थ पवार यांनीच याला दुजोरा दिला आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
बारामती विधानसभा मतदारसंघ निवडणूक २०२४
विधानसभेला पवार विरुद्ध पवार लढत
लोकसभेला सुनेत्रा पवार झाल्या होत्या पराभूत
Baramati Vidhan Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघाची देशभरात चर्चा झाली. सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत झाली. यात सुनेत्रा पवारांना धक्का बसला. आता पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार अशी राजकीय लढाई बारामतीत बघायला मिळणार आहे. बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवारांविरुद्ध युगेंद्र पवार निवडणूक लढवणार आहेत. पार्थ पवार यांनीच याला दुजोरा दिला आहे. (Yugendra Pawar will contest against Ajit Pawar from Baramati Assembly elections 2024)
ADVERTISEMENT
लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात होत्या. पण, प्रत्यक्षात लढत होती, ती शरद पवार आणि अजित पवार यांच्यात! आता पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार राजकीय संघर्ष बघायला मिळणार आहे.
विधानसभेला युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार
बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार सातत्याने निवडून आले आहे. पण, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. बारामतीत आता पवार विरुद्ध पवार संघर्ष बघायला मिळत आहे.
हे वाचलं का?
हेही वाचा >> "...तर महाविकास आघाडी तुटली असती", पृथ्वीराज चव्हाणांचे विधान
लोकसभा निवडणुकीपासूनच युगेंद्र पवार हे राजकारणात सक्रीय झाले. तेव्हापासूनच ते विधानसभा निवडणूक लढवणार अशी चर्चा सुरू झाली. आता पार्थ पवारांनीच याला दुजोरा दिला आहे.
पार्थ पवार म्हणाले, "विधानसभा निवडणुकीत बारामती विधानसभा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात युगेंद्र पवार यांना महाविकास आघाडीकडून उमदेवारी देण्याचे शरद पवार यांनी ठरवले आहे."
ADVERTISEMENT
हेही वाचा >> अजित पवारांची दोनदा भेट; युगेंद्र पवार बारामतीतून निवडणूक लढणार?
"युगेंद्र हा मोठा असून, निवडणूक लढवायची की नाही त्याने ठरवावे. मात्र, या निर्णयामुळे काही फरक पडणार नाही. निवडून येण्यास अजित पवार यांना कोणतीही अडचण येणार नाही", असे पार्थ म्हणाले आहेत.
ADVERTISEMENT
लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंना मताधिक्य
बारामती विधानसभा मतदारसंघाने लोकसभा निवडणुकीत अजित पवारांविरोधात कौल दिला. लोकसभा निवडणुकीत बारामती विधानसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांना मताधिक्य मिळाले. सुप्रिया सुळे यांना १ लाख ४३ हजार ९४१ इतकी मते मिळाली.
हेही वाचा >> 'माझ्याकडून चूक झाली', सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीबद्दल अजित पवारांची कबुली
सुनेत्रा पवार यांना ९६ हजार ५६० इतकी मते मिळाली होती. म्हणजे सुनेत्रा पवार यांना अजित पवार आमदार असलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघातूनच मताधिक्य मिळू शकले नाही.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT