CM Eknath Shinde : "युती धर्माचं पालन होत नाहीये..."; एकनाथ शिंदेंकडून दिल्लीत भाजप नेत्यांची तक्रार?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय जनता पक्षाच्या हायकमांडकडे एक तक्रार केल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
एकनाथ शिंदेंकडून दिल्लीत भाजप नेत्यांची तक्रार
दादर-माहिमचा वाद थेट दिल्लीत पोहोचला
महायुती धर्म पाळत नसल्याची तक्रार केल्याची माहिती
राज्यात विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय जनता पक्षाच्या हायकमांडकडे एक तक्रार केल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. महाराष्ट्रातील भाजप नेते युती धर्माचे पालन करत नसल्याचं त्यांनी या तक्रारीत म्हटल्याचं समजतंय. एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांच्यासाठी दादर-माहिमची जागा सोडावी, अशी मागणी भाजप नेत्यांनी सुरू केली होती. यावरुन बऱ्याच दिवसांपासून गोंधळ सुरू होता. एकनाथ शिंदे यांनी दादर-माहिम मतदारसंघातून आपला उमेदवार उभा केला असून, याच मतदारसंघात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांचा मुलगा अमित ठाकरे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे महायुतीसमोर मोठा पेच निर्माण झाला होता. राज ठाकरे हे गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीच्या नेत्यांच्या जवळ होते, त्यामुळे अमित ठाकरेंसाठी काही तडजोडी होणार का? यावर सर्वांचं लक्ष होतं.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >>Maharashtra Assembly Election 2024 Live : राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जाहीरनाम्यात नेमकं काय?
काही दिवसांपूर्वी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत शिंदेंनी राज ठाकरेंसोबत काय संवाद झाला होता, हे सुद्धा सांगितलं होतं. "राज ठाकरे यांच्याशी जागावाटपावर चर्चा झाली होती, त्यावेळी त्यांनी महायुतीमधील तिन्ही पक्षांचं झाल्यावर चर्चा करु असं म्हटलं होतं. मात्र नंतर राज ठाकरेंनी नंतर थेट उमेदवार देऊन टाकले" असं शिंदेंनी सांगितलं. यामुळे आपणही आता माहिममधून माघार घेणार नाही, तिथे आपला विद्यमान आमदार आहे असं शिंदेंनी स्पष्ट केलं होतं. मात्र दुसरीकडे भाजपचे नेते अमित ठाकरे यांना मदत करण्याची भूमिका घेत होते. नारायण राणे आणि आशिष शेलार या भाजप नेत्यांनी "शिंदे यांनी आपले उमेदवार सदा सरवणकर यांचं नाव मागे घ्यावं आणि अमित ठाकरे यांना पाठिंबा द्यावा" अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे शिंदेंच्या उमेदवारासमोर पेच निर्माण झाला होता. याच पार्श्वभूमीवर आता एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत भाजप नेत्यांची तक्रार केल्याचं समोर आलं आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हे ही वाचा >>Kolhapur Congress : दिल्लीतून फोन, बंटी पाटलांनी मिटींग बोलावली, 'या' उमेदवाराची घोषणा, विषय कसा क्लिअर केला?
एकनाथ शिंदे यांनी भूमिका स्पष्ट केल्यानंतर राज ठाकरे यांच्याकडूनही आक्रमक भूमिका पाहायला मिळाली. डोंबिवलीमध्ये झालेल्या सभेत राज ठाकरे यांनीही वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन शिंदेंवर निशाणा साधला. धनुष्यबाण आणि शिवसेना ही ना उद्धव ठाकरेंची ना एकनाथ शिंदेंची प्रॉपर्टी आहे असं म्हणत शिंदेंवर हल्लाबोल केला होता. यादरम्यान शिंदेंनीही ही गोष्ट दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांच्या कानावर घातल्याचं समजतंय. त्यामुळे आता आशिष शेलार आणि नारायण राणे यांचा सूर बदललेला दिसला. सदा सरवणकर हेच महायुतीचे उमदेवार असल्याचं आता भाजप नेत्यांकडून सांगितलं जातंय.
ADVERTISEMENT