Jitendra Awhad: अजित पवार मर्दाची औलाद असते तर... जितेंद्र आव्हाड आक्रमक, 'त्या' घटनेवरुन थेट हल्लाबोल

मुंबई तक

यंदाच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादींच्या नेत्यांकडून तुफान आरोपप्रत्यारोप केले जात आहेत. अशातच विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर गंभीर आरोप करत हल्लाबोल केला आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अजित पवार यांच्यावर थेट हल्लाबोल

point

जितेंद्र आव्हाड काय काय म्हणाले?

point

पाकीटमारांची टोळी म्हणत टीका

Jitendra Awhad Vs Ajit Pawar :  अजित पवार एक दिवस येतात आणि शरद पवार यांना धक्का मारून बाहेर काढतात... असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. तसंच शरद पवार यांच्या हातातील घड्याळ काढून नेलं असंही ते म्हणाले. अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेतली आणि त्यानंतर राष्ट्रवादीत मोठी फूट पडली. त्याआधी शिवसेनेचंही काहीसं असंच चित्र झालं होतं. मात्र ही घटना राष्ट्रवादीच्या समर्थकांसाठी एकूणच राज्याच्या राजकारणासाठी काहीशी वेगळी होती. याचं कारण म्हणजे शरद पवार आणि अजित पवार हे एकाच कुटुंबातील दोन नेते वेगळे झाल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. मात्र त्यानंतर आता बराच काळ उलटून गेलाय. यंदाच्या निवडणुकीत दोघांच्याही राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून तुफान आरोपप्रत्यारोप केले जात आहेत. अशातच विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर गंभीर आरोप करत हल्लाबोल केला आहे.

 

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले? 

 

हे ही वाचा >>Mazi Ladki Bahin Yojana: गुड न्यूज… नोव्हेंबरमध्ये ‘या’ तारखेला मिळणार १५०० रुपये

 

"राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा आहे??? एक दिवस अजित पवार आलेत आणि शरद पवार यांना त्यांनी धक्का मारून बाहेर काढलं... जाताजाता त्यांच्या हातातलं घड्याळही घेऊन गेले... ही पाकीटमारांची टोळी आहे" असं म्हणत अजित पवार यांच्यावर जितेंद्र आव्हाड यांनी हल्लाबोल केला आहे. "मर्दाची औलाद असते तर म्हणाले असते की, शरद पवार यांनी तुतारी निशाणी घेतली, मी सुद्धा एखादं वेगळं चिन्ह घेतो. असं केलं असतं तर मानलं असतं की, तुम्ही मर्दाची औलाद आहात..." असंही पुढे जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. "शरद पवार मोदींसमोर नाही झुकले, शरद पवार आमच्यासमोर म्हणाले होते की, तुम्हाला जायचं असेल तर जा, मी एकटा राहिलो तर चालेल... मी तरुणांमधून पुन्हा नेतृत्व तयार करेल" असं शरद पवार यांनी त्यावेळी म्हटल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.

हे ही वाचा >> WTC Points Table: टीम इंडियाला मोठा धक्का! डब्ल्यूटीसीची फायनल खेळणार की नाही? जाणून घ्या समीकरण

दरम्यान, अजित पवार यांच्या पक्षाकडूनही आता जितेंद्र आव्हाड यांच्यावर पलटवार होण्यास सुरूवात झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी जितेंद्र आव्हाड यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. "जे लोक 25-30 वर्ष तुमच्यासोबत राहिले, तुम्ही जे बोललेत ते त्या सर्वांना लागू होतं. जितेंद्र आव्हाड यांच्यावर जसा शरद पवार यांचा हात आहे तस छगन भुजबळ यांचाही आहे हे त्यांना माहिती आहे" असं जितेंद्र आव्हाड बोलले. तसंच पक्ष आणि चिन्ह हे आता नियमानुसार अजित पवार यांना मिळालं आहे असं भुजबळ म्हणाले आहेत. 
 

हे वाचलं का?

    follow whatsapp