Vidhan Sabha: ऐन मध्यरात्री महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, महाविकास आघाडीचा आकडा ठरला!

साहिल जोशी

ADVERTISEMENT

महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा आकडा आला समोर
महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा आकडा आला समोर
social share
google news

बातम्या हायलाइट

point

महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा सुटला

point

विदर्भातील जागांचाही प्रश्नही महाविकास आघाडीने काढला निकालात

point

शिवसेना ठाकरे गट विदर्भात 9 जागा लढवणार

MVA Seat Allocation : मुंबई: एकीकडे भाजप, शिवसेना (UBT) आणि मनसेने आपआपल्या उमेदवारांच्या पहिल्या याद्या जाहीर केलेल्या असताना दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये अद्यापही चर्चाच सुरू होती. मात्र आज (23 ऑक्टोबर) मध्यरात्रीच्या सुमारास याबाबतची सर्वात मोठी बातमी ही समोर आली आहे. जागा वाटप हा महाविकास आघाडीमध्ये सर्वात कळीचा मुद्दा ठरला होता. पण अखेर काही मिनिटांपूर्वीच हे जागा वाटप पूर्ण झाल्याची खात्रीलायक माहिती मुंबई Tak च्या हाती लागली आहे. (maharashtra assembly election 2024  biggest news in maharashtra politics at midnight seat allocation of mahavikas aaghadi congress shiv sena ubt and ncp sp seats also came out)

ADVERTISEMENT

भाजपने रविवारी आणि शिवसेना (शिंदे गट) पक्षाने काल (22 ऑक्टोबर) रात्री उशिरा त्यांच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलेली असताना महाविकास आघाडीमधील जागा वाटपाचा तिढा काही सुटत नव्हता. अखेर बैठकांच्या अनेक फैरी पार पडल्यानंतर आता महाविकास आघाडीचं जागा वाटप पूर्ण झालं आहे.

हे ही वाचा>> Raj Thackeray MNS Candidate List: अमित ठाकरेंना तिकीट जाहीर, राज ठाकरेंकडून मनसेची यादी जाहीर

मिळालेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस सर्वाधिक जागा लढविणार असून शिवसेना (UBT) आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे त्या खालोखाल जागा लढवणार आहेत. 

हे वाचलं का?

महाविकास आघाडीमध्ये कोणता पक्ष किती जागा लढवणार?

1. काँग्रेस - लोकसभा निवडणुकीत शिवसेना (ठाकरे) पेक्षा कमी जागा लढवणाऱ्या काँग्रेसने विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपात आक्रमक पवित्रा घेत सर्वाधिक जागा पदरात पाडून घेतल्या आहेत. कारण लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक जागा लढवल्या होत्या. हाच निकष लावत काँग्रेसने जागा वाटपात आपल्याला अधिक जागा मिळाव्या असा आग्रह धरला होता. त्यानुसार आता काँग्रेसला सर्वाधिक म्हणजे 104 मिळाल्या आहेत.
 
2. शिवसेना (UBT) - लोकसभा निवडणुकीत तब्बल 21 जागा लढवणाऱ्या शिवसेनेला केवळ 9 जागांवर विजय मिळवता आला होता. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा ठाकरेंच्या शिवसेनेचा स्ट्राईक रेट हा कमी होता. मात्र, असं असलं तरीही शिवसेना UBT ने विधानसभा निवडणुकीत आपल्याला अधिकाधिक जागा मिळाव्या असा आग्रह धरला होता. त्यावरूनच महाविकास आघाडीमध्ये बरीच खडाखडी सुरू होती. अखेर यावर तोडगा काढत शिवसेना (UBT) ला 96 जागा देण्यावर एकमत झालं आहे. 

3. राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार - ज्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांनी कमी जागा लढवून जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणले होते. तोच फॉर्मेट आता विधानसभेत देखील पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 10 जागाच लढवल्या होत्या. पण त्यापैकी तब्बल 8 जागांवर त्यांनी आपले उमेदवार निवडून आणले होते. 

ADVERTISEMENT

आता विधानसभा निवडणुकीसाठी देखील जागा वाटपात शरद पवार यांनी संयमी भूमिका घेत आपल्या पक्षासाठी केवळ 88 जागांच घेतल्या असल्याचं आता समोर आलं आहे. मात्र असं असलं तरी ज्या जागा आपल्या जिंकता येतील तिथेच उमेदवार उभे करण्याची रणनीती शरद पवारांनी आखली आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Shiv Sena (Shinde) Candidates List: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर.. कोणाला दिला धक्का?

काँग्रेस - 104 जागा लढवणार
शिवसेना (UBT) - 96 जागा लढवणार
राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार - 88 जागा लढवणार

दरम्यान, याच जागांमधून मित्र पक्षांना देखील जागा देण्यात येणार आहेत. त्यामुळे आता या तीनही पक्षांच्या वाट्याला नेमक्या किती जागा येतात हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. 

विदर्भाचा तिढा सुटला

महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपात सर्वाधिक तिढा हा विदर्भातील जागांवरून होता. त्यामुळेच हे जागा वाटप अडून राहिलं होतं. पण अखेर प्रदीर्घ चर्चा आणि बैठकानंतर त्यावर तोडगा काढण्यात महाविकास आघाडीला यश आलं. 

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर दक्षिण, कामठी, गोंदिया, भंडारा या जागा  काँग्रेसने आपल्या पदरात पाडून घेतल्या. तर रामटेक ही जागा पुन्हा आपल्याकडे मिळविण्यात ठाकरेंच्या शिवसेनेला यश आलं आहे. तर दुसरीकडे आर्वीची जागा ही पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आली आहे. 

विदर्भात 11 ते 12 जागा या राष्ट्रवादी काँग्रेस लढविणार आहे. तर वणीसह विदर्भातील 9 जागा या शिवसेना ठाकरे गट लढविणार आहे. 

दरम्यान, आता जागा वाटपाचा तिढा सुटल्याने लवकरच महाविकास आघाडीमधील तीनही पक्षांकडून आता उमेदवारांची पहिली यादी देखील जाहीर केली जाईल. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT