Mahayuti Government च्या विकासकामांवर कामावर राज्यातील जनता खूश? आकडेवारीत किती टक्के लोक नाराज?
यंदाच्या निवडणुकीत जनता सरकारच्या कामावर किती खूश आहे, सरकारने त्यांना आवश्यक असलेली कामे करतंय का? याबद्दल सी-व्होटरच्या सर्व्हेमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामधून नेमकं काय समोर आलं ते पाहुयात.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
महायुती सरकारने केलेल्या कामांवर जनता खूश?
किती टक्के लोकांना वाटतं चांगली कामे झालीत?
राज्यातील जनता महायुतीला संधी देणार का?
विधानसभा निवडणुकीसाठी सगळेच पक्ष सध्या प्रचारात ताकद लावताना दिसत आहेत. येणाऱ्या 20 तारखेला होणाऱ्या निवडणुकीत जनता ठरवणार आहे की, पुढचा मुख्यमंत्री कुणाचा होणार. त्यामुळे आपल्या कामाचं रिपोर्टकार्ड घेऊन महायुतीचे नेते घरोघरी जाण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे विरोधकही सरकारच्या अपयशाचे पाढे वाचून दाखवत आहेत. प्रचाराच्या या संपूर्ण रणधुमाळीत जनतेचं लक्ष असतं ते विकासाच्या कामांची पूर्ण केलेली वचनं आणि येणाऱ्या काळातील विकासासाठी दिली जाणारी आश्वासनं. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत जनता सरकारच्या कामावर किती खूश आहे, सरकारने त्यांना आवश्यक असलेली कामे करतंय का? याबद्दल सी-व्होटरच्या सर्व्हेमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामधून नेमकं काय समोर आलं ते पाहुयात. ( Maharashtra Public Opinion Survey amid Vidhan Sabha Elections)
हे ही वाचा >>Election 2024: तिकीट न मिळाल्याने श्रीनिवास वनगा 36 तासांपासून होते बेपत्ता! नेमकं घडलं तरी काय?
राज्यात मागच्या अडीच वर्षांपासून एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि भाजप यांच्या युतीचं सरकार अस्तित्वात असून, या सरकारने अनेक योजना जाहीर करुन ते पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. मात्र, आपल्या परिसरात, शहरात झालेल्या विकासावरुन जनतेचा सरकारबद्दलचा दृष्टीकोण ठरत असतो. त्यामुळे या निवडणुकीत जनतेला आपल्या भागात झालेल्या विकासाच्या प्रश्नावर काय वाटतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, 52 टक्के लोकांना आपल्या भागात विकास झाला असं वाटतंय. या सर्व्हेतून काय आकडेवारी समोर आली, जाणून घेऊ.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
सरकारने आपल्या भागात केलेल्या कामांबद्दल आपली प्रतिक्रिया काय?
हे ही वाचा >>Election 2024: तिकीट न मिळाल्याने श्रीनिवास वनगा 36 तासांपासून होते बेपत्ता! नेमकं घडलं तरी काय?
चांगली विकासकामं झाली (GOOD) | 52.5 |
सामान्य स्वरुपात कामे झाली (AVERAGE) | 21.5 |
फार विकासकामं झाली नाही (POOR) | 23.2 |
सर्व्हेमधून विभागवार समोर आलेल्या आकडीवारीतून असं समोर येतंय की, मुंबईच्या परिसरातील 44 टक्के लोकांनी सरकारने चांगली विकासकामं केल्याचं म्हटलं आहे, तर कोकणातही 52 टक्के लोकांनी विकासकामं झाल्याचं म्हटलं आहे. मराठवाड्यात 54 टक्के, उत्तर महाराष्ट्रात 55 टक्के, विदर्भात 54 टक्के, पश्चिम महाराष्ट्रात 52 टक्के लोकांना सरकारने त्यांच्या भागात चांगली विकासकामं केली आहेत असं वाटतंय. त्यामुळे राज्यातील सरासरी 52 टक्के जनता ही सरकारच्या कामांवर खूश आहे. तर दुसरीकडे भागांमध्ये सरकारने केलेल्या कामांबद्दल याच भागांमध्ये 23 टक्के जनता नाराज आहे आणि 21 टक्के जनतेने मध्यम स्वरुपात नाराजी व्यक्त केली. त्यामुळे जनता आता यापुढे कुणाला संधी देते हे आता नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीतच समजणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT