MVA : काँग्रेसचं वादाच्या मुद्द्यावर 'बोट', उद्धव ठाकरे धडा घेणार का?
Maha Vikas Aghadi Maharashtra Vidhan Sabha election 2024 : महाविकास आघाडीत विधानसभा जागावाटपाची चर्चा सुरू झाली आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
पृथ्वीराज चव्हाण यांचा उद्धव ठाकरेंचा सल्ला
विधानसभा निवडणूक जागावाटपाबद्दल चर्चा
Maha Vikas Aghadi : विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाबद्दल महाविकास आघाडीत चर्चा सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची कामगिरी चांगली राहिली, पण एका जागेचा मुद्दा चांगलाच गाजला. सांगली लोकसभा मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचे चंद्रहार पाटील पराभूत झाले, तर महाराष्ट्र काँग्रेसचे उपाध्यक्ष विशाल पाटील अपक्ष म्हणून निवडून आले. त्यामुळे ठाकरे नाराज झाले. पण, या निकालानंतर काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी अप्रत्यक्षपणे सल्ला दिला आहे. त्यावर ठाकरेंची भूमिका मविआसाठी महत्त्वाची आहे. (Prithviraj Chavan has said that the mistake made about Sangli Lok Sabha constituency should be avoided in Maharashtra Assembly election)
ADVERTISEMENT
सांगली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने तयारी केली होती. काँग्रेसचे विशाल पाटील निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. पण, पारंपरिक कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे गेल्याने ठाकरेंच्या शिवसेनेने सांगली मतदारसंघावर दावा केला.
हेही वाचा >> काँग्रेसचं पारडं जड, पण, 'या' गोष्टीचा भाजपला फायदा होणार?
महाविकास आघाडीच्या जागावाटपाची अधिकृतपणे घोषणा होण्याआधीच उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटील यांच्या नावाची उमेदवार म्हणून घोषणा केली होती. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र, विशाल पाटील यांनी बंडखोरी करत निवडणूक लढवली आणि ठाकरेंचे उमेदवार चंद्रहार पाटील पराभूत झाले.
हे वाचलं का?
पृथ्वीराज चव्हाणांचा सल्ला, ठाकरे धडा घेणार का?
सांगली लोकसभा मतदारसंघातून विशाल पाटील विजयी झाले असले, तरी महाविकास आघाडीचा या मतदारसंघात पराभव झाला. काँग्रेसचे मतदान विशाल पाटलांच्या पारड्यात पडले. या निकालावर बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी ठाकरेंचा उल्लेख न करता एक सल्ला दिला आहे.
हेही वाचा >> वायकरांच्या मेहुण्याला मोबाईलसह रंगेहाथ पकडणाऱ्या उमेदवाराने सांगितली Inside Story
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की,
ADVERTISEMENT
सांगलीतील परिस्थिती वेगळी आहे. त्या मतदारसंघात अपक्ष उमेदवाराने महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव केला आहे. त्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांच्या इच्छेविरुद्ध तिकीट देता कामा नये हा धडा घेणे गरजेचे आहे.
माजी मुख्यमंत्री चव्हाण असेही म्हणाले की, "महाविकास आघाडी ज्या ताकदीने लोकसभेची निवडणूक लढली, त्यापेक्षा अधिक ताकदीने विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जाणार आहे. कमीत कमी 180 मतदारसंघात विजय मिळवणे आमचे लक्ष्य आहे", असे त्यांनी सांगितले.
ADVERTISEMENT
उद्धव ठाकरेंची भूमिका काय?
सांगली लोकसभा मतदारसंघात शिवसेनेची अपेक्षित ताकद नसताना ठाकरेंनी उमदेवार उतरवला होता. आता विधानसभेच्या जागावाटपाबद्दल ठाकरेंची काय भूमिका असणार आणि सांगली जिल्ह्यातील कोणत्या विधानसभा मतदारसंघांवर दावा करणार, याबद्दल उत्सुकता असणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT