Congress : राहुल गांधींनी सोडली वायनाडची खासदारकी, काँग्रेसकडून 'मोठ्या' नेत्याला तिकीट!

मुंबई तक

Rahul Gandhi News : राहुल गांधी रायबरेलीचे खासदारकी कायम ठेवणार आहेत आणि वायनाडची जागा सोडण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता प्रियांका गांधी वायनाडमधून पोटनिवडणूक लढवणार आहेत.

ADVERTISEMENT

राहुल गांधी रायबरेलीची खासदारकी कायम ठेवणार
rahul gandhi mp in rae bareli seat leave wayanad seat priyanka ganddhi will contest by poll malliakarjun kharge
social share
google news

Rahul Gandhi Resign from wayanad : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रायबरेलीची खासदारकी कायम ठेवली आहे आणि वायनाडची (wayanad(  जागा सोडली आहे. त्यामुळे वायनाडच्या जागेवरून आता प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) पोटनिवडणूक लढणार आहे, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Malliakarjun kharge) यांनी याबाबतची मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या माध्यमातून प्रियंका गांधी पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. (rahul gandhi mp in rae bareli seat leave wayanad seat priyanka ganddhi will contest by poll malliakarjun kharge) 

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत राहुल गांधी, प्रियंका गांधी उपस्थित होते. यावेळी माध्यमांशी बोलताना खरगे म्हणाले की,  राहुल गांधी रायबरेलीचे खासदारकी कायम ठेवणार आहेत आणि वायनाडची जागा सोडण्याची घोषणा त्यांनी केली आहे. त्यामुळे आता प्रियांका गांधी वायनाडमधून पोटनिवडणूक लढवणार आहेत. 

हे ही वाचा : 'जातगणना झालीच पाहिजे...', भुजबळांच्या मागणीने शिंदे सरकार कोंडीत?

यावेळी प्रियंका गांधी यांनी ‘मी एक मुलगी आहे, मी लढू शकते’ या जुन्या घोषणा वापरून वायनाडमधून पोटनिवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले. अशात काँग्रेसने एकाच दिवसात दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत. एक म्हणजे, रायबरेलीतून खासदार राहण्याचा राहुल गांधींचा निर्णय आणि दुसरे म्हणजे, वायनाड पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसनेही आपला उमेदवार उभा केला आहे.

हे ही वाचा : कीर्तिकरांनी 'ती' 2 मिनिटे घालवली अन् मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेचा निकाल बदलला?

राहुल गांधी केरळमधील वायनाड लोकसभा मतदार संघातून खासदारकीचा राजीनामा देणार असून रायबरेलीचे खासदार म्हणून कायम राहणार आहेत. या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी रायबरेली आणि वायनाड या दोन्ही जागावर विजय मिळवला होता. आता ते रायबरेलीची खासदारकी कायम ठेवणार आहेत. राहुल गांधी यांनी यावेळी वायनाडची जागा सोडण्याआधी वायनाडच्या जनतेचे आभार मानले. आता वायनाडमध्ये पोटनिवडणूक लागणार आहेत. ही पोटनिडणूक प्रियांका गांधी लढवणार आहेत. 

हे वाचलं का?

    follow whatsapp