Supriya Sule : "फडणवीसांवर केस व्हावी, त्यांनी राजीनामा द्यावा"; अजितदादांची आर. आर. आबांवर टीका, सुप्रिया सुळे भडकल्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सुप्रिया सुळे फडणवीसांवर का भडकल्या?

point

मुंबई तकच्या मुलाखतीत सुप्रिया सुळेंचे खळबळजनक आरोप

point

अजितदादांनी आर. आर. आबांवर केलेल्या आरोपांवर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

Supriya Sule Vs Ajit Pawar : अजित पवार यांनी सांगलीमध्ये प्रचार करताना आर. आर. पाटील यांच्यावर एक आरोप केला. आर. आर. आबांनी माझा केसाने गळा कापला असं म्हणत सिंचन घोटाळ्याशी संबंधीत फाईलवर आर. आर. पाटील यांनीच सही केली, ते मला देवेंद्र फडणवीस यांनी दाखवलं असं म्हणत अजित पवारांनी एक खळबळ निर्माण केली. त्यानंतर आता सुप्रिया सुळे यांनी या सर्व आरोपांवर पलटवार केला. गेलेल्या माणसाबद्दल कधीच बोलायचं नसतं असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी अजित पवार एवढे दिवस का नाही बोलले असा सवाल सुप्रिया सुळेंनी केला. तसंच फडणवीसांवरही सुप्रिया सुळेंनी गंभीर आरोप केले आहेत. (supriya sule answers allegations makes on R R Patil by ajit pawar)



हे ही वाचा >> Ajit Pawar: 'पवार साहेबांवर खालच्या पातळीवर जाऊन...', अजितदादा खोतांवर प्रचंड संतापले!


 

अजित पवार यांनी आपल्यावर झालेल्या 70 हजार कोटींच्या घोटाळा प्रकरणावरुन आर. आर. पाटील यांच्यावर आरोप केला होता. सांगलीतील सभेत बोलताना ते म्हणाले होते की, माझ्यावर झालेल्या 70 हजार कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपामध्ये चौकशीचे आदेश स्वत: आर. आर. पाटील यांनी दिले होते, ते पाहून वाईट वाटलं, त्यांनी केसाने गळा कापला. 2014 मध्ये सत्ताबदल झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनीच मला ती स्वाक्षरी दाखवली असं म्हणत अजित पवार यांनी खळबळजनक आरोप केले होते. त्यावर आता सुप्रिया सुळे यांनी मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत प्रतिक्रिया दिली, यावेळी त्या फडणवीसांवर संतापल्या.

 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मी फोन करुन माफी मागितली : सुप्रिया सुळे 

अजित पवार यांची चौकशी कुणामुळे लागली? देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीची मागणी केली. आर. आर. पाटील गृहमंत्री असताना चौकशीची मागणी झाली. पण चौकशीसाठी फायनल सही ही मुख्यंमंत्र्यांची लागते, ती देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना केली असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. तसंच सुप्रिया सुळेंनी आणखी एक गौप्यस्फोट केला. देवेंद्र फडणवीसांनी आरोप केले, चौकशीची मागणी केली, त्यानंतर ज्यांच्यावर आरोप केले त्यांनाच घरी बोलवून देवेंद्र फडणवीस यांनी फाईल दाखवली, हे अजित पवार यांनीच सांगितलं, ही फडणवीसांची नैतिकता आहे का? फडणवीसांवर केस व्हायला हवी. फडणवीसांनी याप्रकरणी देशाला, राज्याला, संविधानाला फसवलंय, कारण त्यांनी शपथ घेतलेली आहे गोपनीयतेची. देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा, राजकारण सोडावं, कारण आम्ही शपथ घेत असतो, त्यावेळी कुणालाही कागद दाखवायचे नसतात. आम्हाला नॅचरली करप्ट पार्टी म्हटल्याबद्दल माफी मागावी आमची असं म्हणत सुप्रिया सुळेंनी म्हटलं. या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मी अजित पवार यांच्यावतीने आर. आर. पाटील यांच्या पत्नी आणि वहिनींची, मुलांची अजितदादांच्यावतीने माफी मागितली असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसंच जेव्हा जेव्हा इमानदार राजकारणांचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा आर. आर. आबांचं नाव नक्की लिहीलं जाईल असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

 

ADVERTISEMENT

एकूणच या प्रकरणावरुन रोहित पवार यांनीही आपली भावना व्यक्त केली होती. आपले वडील गेल्यानंतर त्यांच्यावर अशी टीका झाल्यानं दु:ख झालं असं म्हणत त्यांनी अपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT