सुशांत सिंग प्रकरण: ‘रियाचे बँक अकाउंट डीफ्रीज करा, मोबाइल-लॅपटॉपही परत द्या’, कोर्टाच्या आदेशाने NCBला धक्का

विद्या

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूमुळे त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिला अनेक दिवस तुरुंगात काढावे लागले होते. बराच काळ ती न्यायालयाच्या कायदेशीर प्रक्रियेत अडकली होती. यावेळी कारवाईसाठी रियाचा पासपोर्ट, फोन, लॅपटॉप आदी साहित्य जप्त करण्यात आले होते. एवढंच नव्हे तर तिची बँक खातेही गोठवण्यात आली होती.

ADVERTISEMENT

सुशांतच्या मृत्यूची जेव्हा सर्वत्र जोरदार चर्चा सुरु होती तेव्हा त्याचवेळी ड्रग्स अँगल देखील समोर आला होता. ज्यामध्ये रियाचाही सहभाग असण्याचा आरोप नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) केला होता. एनसीबीच्या याच आरोपानंतर कोर्टाने रियाचे बँक खाते गोठविण्याचे आदेश दिले होते. पण आता या सगळ्या प्रकरणात रिया चक्रवर्तीला मोठा दिलासा मिळाला आहे तर एनसीबीला मात्र मोठा धक्का बसला आहे.

रियाने दाखल केली होती याचिका

हे वाचलं का?

दरम्यान, सगळे गॅझेट्स तिला परत मिळावे, बँक खाती पूर्ववत करावीत यासाठी रियाने त्याबाबत कोर्टाकडे एक याचिका दाखल केली होती. रियाने केलेल्या या मागणीबाबत आता विशेष न्यायालयाने एक मोठा निर्णय घेतला आहे. तब्बल एका वर्षानंतर रियाला तिचे बँक खात्यांमध्ये प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आली आहे. एवढेच नाही तर रियाला तिचे गॅझेटही परत देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहे. त्यामुळे कोर्टाचा हा निर्णय रियासाठी मोठा दिलासा आहे. दुसरीकडे कोर्टाच्या या निर्णयामुळे एनसीबीला मात्र मोठा सेटबॅक बसला आहे.

स्पेशल कोर्टाने डी-फ्रीज केली बँक खाती

ADVERTISEMENT

एका वृत्तानुसार, न्यायालयाने रियाचे बँक खाते डी-फ्रीज केले आहे. यासोबतच तिचा लॅपटॉप आणि फोनही परत करण्यात आला आहे. रिया चक्रवर्तीची याचिका लक्षात घेऊन एनडीपीएस कोर्टाने एनसीबीला हे आदेश दिले आहेत. रियाने तिच्या याचिकेत असे म्हटले होते की, ‘ती एक अभिनेत्री आहे आणि तिचे बँक खाते हे 16/09/2020 पासून कोणतेही कारण नसताना गोठवले आहे. तिला तिच्या कर्मचार्‍यांना पगार देण्यासाठी आणि अनेक प्रकारच्या व्यवहारांसाठी बँक खात्यांची आवश्यकता भासते आहे.’

ADVERTISEMENT

तिच्या भावाचा संदर्भ देत रियाने याचिकेत म्हटले होते की, ‘आर्थिक बाबतीत तिचा भाऊही तिच्यावर अवलंबून आहे. तसेच स्वतःला देखील आर्थिक आधाराची गरज असल्याने बँकेत असणाऱ्या पैशांची गरज आहे. बँक खाते गोठवल्यामुळे ती जवळपास वर्षभर त्रस्त आहेत.’

ड्रग्ज प्रकरणात NCBकडून 40 हजार पानी चार्जशीट, रियासह 33 नावं

गॅजेट्सही मिळणार परत

यासोबतच रियाने आपल्या याचिकेत आपले गॅझेट, मॅकबुक, अॅपल लॅपटॉप आणि आयफोन परत करण्याची मागणी केली आहे. तिच्या या मागणीबाबत देखील कोर्टाने आदेश दिले आहे. सर्व बाबींची ओळख पटल्यानंतर रियाला तिचे गॅझेट परत करण्यात यावे असं कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं आहे.

रियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती अखेरची रुमी जाफरीच्या ‘चेहरे’ सिनेमात बिग बी अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मीसोबत दिसली होती. पण तिचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करू शकला नव्हता.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT