इंदुरीकर महाराजांवर चित्रा वाघ संतापल्या; म्हणाल्या, महिलांना छळायची शिकवण देताय का?
अहमदनगर जिल्ह्यासह राज्यात पारनेरच्या तहसीलदारांनी केलेल्या गंभीर आरोपांची चर्चा होत आहेत. याच प्रकरणात इंदुरीकर महाराजांनी केलेल्या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला असून, भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी इंदुरीकर महाराजांवर टीकास्त्र डागलं आहे. तहसीलदार ज्योती देवरे यांनी राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यासंदर्भातील एक ऑडिओ क्लिपही व्हायरल झालेली आहे. ज्योती देवरे […]
ADVERTISEMENT
अहमदनगर जिल्ह्यासह राज्यात पारनेरच्या तहसीलदारांनी केलेल्या गंभीर आरोपांची चर्चा होत आहेत. याच प्रकरणात इंदुरीकर महाराजांनी केलेल्या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला असून, भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी इंदुरीकर महाराजांवर टीकास्त्र डागलं आहे.
ADVERTISEMENT
तहसीलदार ज्योती देवरे यांनी राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यासंदर्भातील एक ऑडिओ क्लिपही व्हायरल झालेली आहे. ज्योती देवरे यांनी केलेल्या आरोपांमुळे नवा वाद उभा राहिला आहे. दरम्यान, हे प्रकरण चर्चेत असतानाच निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी केलेल्या विधानाने आणखी एक वाद उभा राहण्याची चिन्हं असून, इंदुरीकर महाराजांनी केलेल्या विधानावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे.
काय म्हणाल्या चित्रा वाघ?
हे वाचलं का?
‘राज्यातील भोळ्याभाबड्या भगिनी मन लावून ज्यांचं किर्तन ऐकतात, त्या ह.भ.प.नी एका महिलेचीचं प्रशासकीय तसेच स्थानिक लोकप्रतिनिधीकडून होणाऱ्या त्रासाची तुलना ‘कुत्री भुंकतात’ अशी करणं अतिशय दुदैवी… या सत्तेतील बेलगाम घोड्यांना ‘हत्ती’ म्हणतं बळ देऊन महिलांना छळायची शिकवण देताय का??’, असा सवाल करत चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे.
राज्यातील भोळ्या भाबड्या भगिनी मन लाऊन ज्यांचं किर्तन ऐकतात त्या
ह.भ.प नी
एका महिलेचीचं प्रशासकीय तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी कडून होणार्या त्रासाची
तुलना “कुत्री भुंकतात” अशी करणं अतिशय दुदैवी…या सत्तेतील बेलगाम घोड्यांना “हत्ती”म्हणतं बळ देऊन महिलांना छळायची शिकवण देताय का??— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) August 23, 2021
निवृत्ती महाराज इंदुरीकर काय म्हणाले होते?
ADVERTISEMENT
आमदार नीलेश लंके यांच्या पुढाकारातून पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे शरद पवार यांच्या नावाने कोविड केअर सेंटर उभारण्यात आलेले आहे. तेथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेलं असून, इंदुरीकर महाराजांचं कीर्तन आयोजित करण्यात आलेलं होतं. यावेळी इंदुरीकर यांनी आमदार लंके यांचं कौतूक केले.
ADVERTISEMENT
‘राज्यातील बहुतांश आमदार-खासदार साखर स्रमाट, शिक्षण सम्राट तर कोणी उद्योगपती आहेत. मात्र, त्यांना कोणाला असे सेवाभावी वृत्तीचे कोविड सेंटर उभारण्याचे सूचले नाही. ते काम लंके यांनी करून दाखविले’, असं इंदुरीकर महाराज म्हणाले.
‘हत्ती गावात आला की त्याच्यावर कुत्री भुंकत असतात. परंतु हत्ती आपली चाल बदलत नाही तो ध्येयाकडे चालत राहतो. त्यामुळे लंके तुमच्यावर कोणी कुत्री भुंकत असली, तरी तुम्ही त्याकडे लक्ष न देता तुमची वाटचाल सोडू नका. कितीही कुत्री भुंकली तर हत्ती चालत राहतो, तसे लंके तुम्हीही विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करून वाटचाल करीत रहा. पुढील पंचवीस वर्षे तुम्हाला धोका नाही’, असं इंदुरीकर महाराज म्हणाले होते.
ज्योती देवरे यांनी काय आरोप केले आहेत?
लसीकरणावरून काही कर्मचार्यांना पोलीस अधिकार्यांच्या समोर मारहाण करणे, अश्लील शिवीगाळ करणे, महिला कर्मचार्यांना मारण्यासाठी महिला पोलिसांना बोलाविण्यास सांगणे, जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांपर्यंत प्रकरण गेल्यानंतर तहसीलदार ज्योती देवरे यांच्या बदनामीचा प्रयत्न करणे, वरिष्ठ अधिकार्यांकडूनही धमक्या येणं, कोरोना नियमांचे पालन करण्याचा प्रयत्न केला जात असताना अडचणी निर्माण करणे आणि मग थेट मंत्र्यांकडे त्यांच्या बदलीची शिफारस करणे असे अनेक आरोप देवरे यांनी केलेले आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT