मधुमेहाच्या रूग्णांनी रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी रिकाम्या पोटी ‘या’ गोष्टींचे करा सेवन…
मधुमेहाच्या रुग्णांना शरीराची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. कारण मधुमेहामध्ये रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी योग्य आहार, वेळोवेळी आरोग्य तपासणी करणे महत्त्वाचे आहे.
ADVERTISEMENT
Diabetes Patient : मधुमेहाच्या रुग्णांना शरीराची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. कारण मधुमेहामध्ये रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी योग्य आहार, वेळोवेळी आरोग्य तपासणी करणे महत्त्वाचे आहे. खाण्यापिण्याच्या आणि जीवनशैलीच्या काही सवयी बदलूनही मधुमेह नियंत्रणात ठेवता येतो. सकाळी उठल्यावर शरीराला पूर्ण दिवस स्फुर्तीदायी ठेवण्यासाठी आपल्याकडे वेळ असतो. मधुमेच्या रूग्णांसाठी हा वेळ सर्वात महत्त्वाचा मानला जातो. त्यांनी या वेळेत रिकाम्या पोटी अशा गोष्टींचे सेवन करावे ज्यामधून त्यांचं पोटही भरेल आणि प्रोटीन, कार्ब्स, फायबरही मिळेल. तसेच सकाळी उठल्यावर नाश्ता कधीही वगळू नका कारण तो दिवसाचा पहिला आहार आहे. (Healthy Diet Tips For Diabetes Patient)
ADVERTISEMENT
अनेक मधुमेही रूग्णांचे सकाळी उठल्यावर रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. यामागचे कारण म्हणजे, आपले यकृत दिवसभर उर्जेसाठी ग्लुकोज तयार करते. जर आपल्याला खूप तहान लागत असेल, सारखं लघवीला जावं लागत असेल किंवा सकाळी अस्पष्ट दिसत असेल तर ही लक्षणं रक्तातील साखरेची पातळी वाढल्याची आहेत. अशा स्थितीत सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी काही गोष्टींचे सेवन केल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळेल. चला मग जाणून घेऊयात.
शरद पवारांची अदाणींसाठी बॅटिंग, राहुल गांधींचंही प्रत्युतर… पण वेगळ्याच स्टाइलमध्ये!
मधुमेहाच्या रूग्णांसाठी मॉर्निंग डाएट टिप्स
- एक चमचा गाईच्या दूधापासून बनलेलं तूप आणि हळद एकत्र करून सेवन केल्यास मधुमेही रूग्णांना फादेशीर ठरते. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. तूपाच्या सेवनाने दिवसभर साखरेची तल्लफ होत नाही. तर, हळदीने जळजळ कमी होते.
- 1 चमचाभर सफरचंदाचा रस आणि 30 मिली आवळा रस किंवा लिंबाचा रस 100 मिली पाण्यात मिसळून सेवन केल्यास मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरतो.
- दालचिनी हा असाच एक मसाला आहे जो शरीरातील रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी ओळखला जातो. यासाठी रात्री पिण्याच्या पाण्यात दालचिनीचे तुकडे टाका याचे पाणी आपण सकाळी हर्बल टी म्हणूनही पियू शकतो.
- मधुमेहाच्या रुग्णांनी सकाळी मेथीचे सेवन करावे. यासाठी रात्री एक चमचा मेथी दाणे पाण्यात भिजत ठेवा. या बिया सकाळी चांगले चावून खा आणि त्याचे पाणी प्या.
Psi Suspended : गर्लफ्रेंडच्या नवऱ्यावर पिस्तुल रोखली…पुण्याचा पोलीस उपनिरीक्षक सस्पेंड
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT