कोरोना रूग्ण वाढल्याने तुळजाभवानी देवीचा शाकंभरी नवरात्र महोत्सव साधेपणाने साजरा होणार
गणेश जाधव, प्रतिनिधी, उस्मानाबाद महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीचा शाकंभरी नवरात्र महोत्सव साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. 11 जानेवारी ते 18 जानेवारी या काळात विविध धार्मिक कार्यक्रम , विधी व कुलाचार संपन्न होणार आहेत. कोरोना व ओमीक्रोनच्या पार्शवभूमीवर शाकंभरी नवरात्र महोत्सव साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. मंदिर संस्थान तुळजापूर यांच्यावतीने सर्व पुजारी, महंत, सेवेकरी व […]
ADVERTISEMENT
गणेश जाधव, प्रतिनिधी, उस्मानाबाद
ADVERTISEMENT
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीचा शाकंभरी नवरात्र महोत्सव साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. 11 जानेवारी ते 18 जानेवारी या काळात विविध धार्मिक कार्यक्रम , विधी व कुलाचार संपन्न होणार आहेत. कोरोना व ओमीक्रोनच्या पार्शवभूमीवर शाकंभरी नवरात्र महोत्सव साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे.
मंदिर संस्थान तुळजापूर यांच्यावतीने सर्व पुजारी, महंत, सेवेकरी व भाविक ,भक्तांना आवाहन करण्यात आले आहे की दिनांक 11 जानेवारी ते 18 जानेवारी या कालावधीत शाकंभरी नवरात्र महोत्सव कोरना व ओमीक्रोन विषाणू च्या प्रादुर्भावामुळे साध्या पद्धतीने संपन्न होणार आहे.
ADVERTISEMENT
महोत्सव काळात संपन्न होणाऱ्या धार्मिक विधी पैकी बहुतांश धार्मिक विधी हे रात्रीच्या वेळी असल्याने प्रतिवर्षाप्रमाणे श्रीदेवीजी चे सकाळचे चरणतीर्थ रात्री 1 वाजता होऊन पूजेची घाट व नंतर सकाळी 6:00 वाजता व सायंकाळी 7:00 वाजता अभिषेक पूजा करण्यात येईल असे आवाहन मंदिर सहा. व्यवस्थापक (धार्मिक) नागेश शितोळे यांनी केले आहे.
ADVERTISEMENT
राज्य सरकारने कोरोना बाबत अनेक निर्बंध घातले आहेत त्यामुळे भाविकांनी तुळजाभवानी मंदिर संस्थांनच्या अधिकृत वेबसाईट वरून शक्यतो ऑनलाईन दर्शन व विधीचा लाभ घ्यावा व गर्दी टाळावी असे आवाहन मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT