पेट्रोल-डिझेलची दरवाढ कुणाच्या हाती? हे लोकांना ठाऊक-अजित पवार

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

सध्या देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती प्रती लीटर 92 रुपयांच्याही पुढे गेल्या आहेत. या मुद्द्यावरून विरोधक मोदी सरकारवर टीका करत आहेत. तर महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यांच्या या मागणीला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी उत्तर दिलं आहे.

ADVERTISEMENT

पेट्रोल-डिझेलची दरवाढ करणं हे कुणाच्या हातात असतं हे देशातल्या जनतेला अगदी व्यवस्थित माहित आहे. केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलचे दर वाढवले आहेत. वाढलेल्या दरांचं समर्थन करता येत नाहीत म्हणूनच देवेंद्र फडणवीस राज्य सरकारला पेट्रोल डिझेलचे दर कमी करा असं म्हणत आहेत. असंही अजित पवारांनी सुनावलं आहे.

केंद्र सरकारच्या अशा दरवाढीमुळे पेट्रोल प्रती लीटर 100 रुपयांवरर गेलं तरीही आश्चर्य वाटून घेऊ नये. मोदी सरकारचं अपयश लपवण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे अशा प्रकारचं वक्तव्य करत आहेत असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

हे वाचलं का?

आज देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. पेट्रोल डिझेलचे दर आम्ही आमच्या काळात राज्यातला टॅक्स कमी करुन प्रती लीटर 2 रुपयांनी कमी केले होते. आता या सरकारनेही तशी पावलं उचलायला हवीत अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारलं असता अजित पवार यांनी केंद्र सरकारच या गोष्टीला जबाबदार आहेत आणि त्यांचं अपयश लपवण्यासाठी फडणवीस टीका करत आहेत असं म्हटलं आहे.

वीज दरवाढीविरोधात भाजपने उद्या आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्याबाबत विचारलं असता अजित पवार म्हणाले , वीज दरांबाबत राज्य सरकारने मह्त्तवाचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांची 45 हजार कोटींची थकबाकी होती त्यातले केवळ 15 हजार कोटी शेतकऱ्यांनी भरायचे आहेत. उर्वरित रक्मक राज्य सरकारने माफ केली आहे. अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतच केली आहे. त्यामुळे उद्या भाजपचं जे आंदोलन होणार आहे ते तोंड देखलं आंदोलन आहे असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT