Kumbh Mela Fire : कुंभ मेळ्यात तिसऱ्यांदा लागली आग, मंडप पेटले, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी
पहिल्यांचा 19 जानेवारीला आणि त्यानंतर 30 जानेवारीला सुद्धा महाकुंभाच्या मंडपांना आग लागली होती. या आगीत 15 तंबू जळून खाक झाले होते. कुंभमेळ्यातील सेक्टर 2 मध्येही दोन गाड्यांना आग लागल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. तसंच काही दिवसांपूर्वी झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत 30 लोकांचा मृत्यू झाल्यानं देशभर हळहळ व्यक्त करण्यात आली होती.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

कुंभमेळ्यामध्ये तिसऱ्यांदा लागली आग

आगीमध्ये शंकाराचार्य रोडवरील मंडप जळाला

जिवित हानी झाली नसल्याची माहिती
Kumbh Mela Fire : प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या कुंभमेळ्यात काल पुन्हा एकदा आग लागली आहे. सेक्टर-18 मधील शंकराचार्य मार्गावर ही आग लागली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं असलं, तरी तिसऱ्यांदा आग लागण्याची घटना घडल्यामुळे प्रशासनाने केलेल्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
हे ही वाचा >> Nashik : पार्किंगमध्ये खेळताना कारखाली चिरडल्या गेलेल्या 4 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, घटना CCTV मध्ये कैद
अग्निशमन दल आग विझवण्याच्या प्रयत्न करत असून, आगीचं कारण अद्याप कळलेलं नाही. आगीत सामानाचं कोणतेही नुकसान झालं नाही. आग आटोक्यात आणण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. अद्याप आगीच्या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन दलाचे कर्मचारी वेळीच घटनास्थळी पोहोचल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली.
आगीची पहिली घटना
19 जानेवारी रोजी महाकुंभमेळ्याच्या सेक्टर १९ मध्ये आगीची आणखी एक घटना घडली, जेव्हा एका छावणीत ठेवलेल्या गवताला आग लागली. या घटनेत सुमारे १८ छावण्या जळून खाक झाल्या. तथापि, अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने आग आटोक्यात आणल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
हे ही वाचा >>Sangli : चिमुकलीवर बलात्कार केला, हत्या करून मृतदेह लपवला, आरोपीने कुटुंबासमोर मुलीला शोधण्याचं नाटकही केलं
आगीची दुसरी घटना
यापूर्वी 30 जानेवारीला सुद्धा महाकुंभाच्या सेक्टर 22 मधील अनेक मंडपांना आग लागली होती. या आगीत 15 तंबू जळून खाक झाले होते. कुंभमेळ्यातील सेक्टर 2 मध्येही दोन गाड्यांना आग लागल्यानंतर एकच खळबळ उडाली होती.