Mumbai : विद्यार्थीनीने बुटाच्या लेसने बाथरूमध्येच स्वत:ला संपवलं, मुंबईतील मोठ्या शाळेतील धक्कादायक घटना
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. पण घटनास्थळावरून पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही.
ADVERTISEMENT

मुंबईतील एका मोठ्या शाळेत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अकरावीत शिकणाऱ्या 16 वर्षीय विद्यार्थिनीने शाळेच्या बाथरूममध्ये बुटाच्या लेसने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही विद्यार्थिनी सकाळी शाळेत गेली आणि नेहमीप्रमाणे तिच्या लेक्चरसाठी हजर राहिली. यानंतर, दुपारी, मुलगी शाळेच्या बाथरूममध्ये गेली आणि तिच्या बुटाच्या लेसने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने शाळेतील विद्यार्थ्यांसह पालकांना धक्का बसला आहे.
हे ही वाचा >> S. N. Subrahmanyam : "90 तास काम करा, बायकोकडे किती बघत बसणार...", L & T चे सर्वेसर्वा सुब्रमण्यम यांचं वक्तव्य
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. पण घटनास्थळावरून पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. पोलिसांनी मृत विद्यार्थ्याच्या पालकांना तुम्हाला कुणावर संशय आहे का असं विचारलं, त्यावर मुलीच्या पालकांनी कुणावरही संशय नसल्याचं सांगितलं. पोलिसांनी सध्या या प्रकरणात अपघाती मृत्यूची नोंद केली असून, विद्यार्थ्यानीने हा टोकाचा निर्णय का घेतला याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जातोय.
हे ही वाचा >> PM Narendra Modi : "माझ्याकडूनही चुका होतात, मी सुद्धा माणूस आहे, देव थोडी आहे...", का म्हणाले पंतप्रधान मोदी?
दरम्या, गेल्या काही दिवसांमध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. आजच नांदेडमध्येही अशी घटना घडली. नांदेड जिल्ह्यातल्या मिनकीमध्ये एका मुलानं आपल्या बापाकडे मोबाईलसाठी हट्ट केला. वडिलांनी मोबाईल दिला नाही म्हणून, मुलगा रागात घराबाहेर निघून गेला. नाराज झालेला मुलगा कुठंतरी रुसून बसला असावा म्हणून बापाने मुलाची शोधाशोध सुरू केली. शेतात आपल्या मुलाला शोधताना बापाने झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मुलाला पाहिलं आणि बाप हादरला. पण हा घटनाक्रम इथेच थांबला नाही. मुलाचा मोबाईलचा हट्ट पूर्ण करता आला नाही, म्हणून खचलेल्या बापानं झाडाला लटकलेला मुलाचा मृतदेह स्वत: खाली उतरवला. हादरलेल्या बापानं त्याच दोरखंडाचा वापर करत, या बापाने स्वत: त्याच झाडाला फाशी घेतली. या संपूर्ण हृदयद्रावक घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ओमकार असं आत्महत्या केलेल्या मुलाचं नाव असून, तो फक्त 16 वर्षांचा होता. तर राजेंद्र पैलवार हे त्याचे वडीलही आता या जगात राहिलेले नाहीत.