Parbhani Crime News : तिसऱ्यांदा मुलगी झाल्याचा राग आला, नराधम पतीने पत्नीला जीवंत जाळून...

मुंबई तक

पीडितेच्या बहिणीने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी कुंडलिक उत्तम काळेला तीन मुली असल्यानं आरोपी कुंडलिक उत्तम काळे हा पत्नीला सतत शिवीगाळ करत असायचा. यावरून पती-पत्नीमध्ये अनेकदा भांडणं होत होती. त्यातूनच हा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

परभणीमध्ये संतापजनक घटना....

point

पतीने पत्नीलाच जीवंत जाळलं...

Parbhani Crime News : परभणी जिल्ह्यात एक संतापजनक घटना समोर आली आहे. गंगाखेड नाका परिसरात 26 डिसेंबरच्या रात्री एका नराधमाने आपल्या पत्नीवर पेट्रोल टाकून तिला जीवंत जाळल्याचा प्रकार घडला आहे. तिसऱ्यांदा मुलगीच झाल्याचा या नराधमाला राग आला आणि त्यातूनच पत्नीला जीवंत जाळलं अशी माहिती समोर आली आहे. या घटनेने परभणीत सध्या खळबळ निर्माण झाली असून, ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे.
 
पीडिता मैना कुंडलिक काळे यांच्या बहिणीने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी कुंडलिक उत्तम काळेला तीन मुली असल्यानं आरोपी कुंडलिक उत्तम काळे हा पत्नीला सतत शिवीगाळ करत असायचा. यावरून पती-पत्नीमध्ये अनेकदा भांडणं होत होती. त्यातूनच हा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला आहे.

हे ही वाचा >> Solapur crime News : ऊसतोड कामगार भाऊ-बहिणींचं अपहरण, तक्रार करूनही पोलिसांचं दुर्लक्ष? सोलापुरात धक्कादायक घटना

26 डिसेंबरच्या रात्री हा वाद इतका वाढला की, कुंडलिकने मैना काळे यांच्यावर थेट पेट्रोल टाकून तिला पेटवून दिलं. आग लागल्याचं समजताच महिला आरडाओरड करत इकडे तिकडे धावू लागली. हे पाहून लोकांनी आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला. घटनास्थळी अनेक लोक जमा झाले. पेट्रोलमुळे आग विझवण्यात बराच वेळ गेला. तोपर्यंत पीडितेचं शरीर भाजलं गेलं होतं. गंभीर भाजलेल्या मैनाला रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला.

हे ही वाचा >> Nanded : हॉर्न वाजवल्याचा राग, तरूणानं थेट फॉर्च्युनवर चढून हल्ला केला, गाडी चालवणाऱ्या डॉक्टरने थेट...

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी तक्रारीच्या आधारे कुंडलिक काळे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. आरोपीची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. तपास पूर्ण होईपर्यंत पोलीस याप्रकरणी काही सांगणार नाही असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट निर्माण झाली असून, समाजाने मुलींबाबत विचार बदलण्याची गरज असल्याचं या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचं लोकांचं म्हणणं आहे. 

 

हे वाचलं का?

    follow whatsapp