Indrajit Sawant : "तुमचे महाराज पळून गेले होते..." इंद्रजित सावंत यांना धमक्या देताना, शिवरायांबद्दल संतापजनक वक्तव्य
"मुख्यमंत्री यांचे नाव घेऊन प्रशांत कोरटकर नावाचा एक परशूरामी ब्राम्हण धमक्या देत आहे." असं म्हणत इंद्रजित सावंत यांनी ही ऑडिओ क्लिप शेअर केली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

छत्रपती शिवरायांबद्दल संतापजनक वक्तव्य

इंद्रजित सावंत यांना धमक्या देताना काय बोलला कोरटकर?

प्रशांत कोरटकर याच्या वक्तव्यामुळे नव्या वादाची शक्यता
Indrajt Sawant and Prashant Koratkar Call Recording : इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकीचा फोन आल्याची माहिती समोर आली आहे. इंद्रजित सावंत यांनी स्वत: याबद्दलचा ऑडिओ आपल्या सोशल मीडियावरुन शेअर केला आहे. "मुख्यमंत्री यांचे नाव घेऊन प्रशांत कोरटकर नावाचा एक परशूरामी ब्राम्हण धमक्या देत आहे." असं म्हणत इंद्रजित सावंत यांनी ही ऑडिओ क्लिप शेअर केली आहे.
"मला अशा धमक्या नवीन नाहित पण या हरामखोरांचे शिवरायांच्या बद्दलचे विचार किती घाणेरडे आहेत,यांच्या पोटात श्री शिव छत्रपतीं बद्दल काय विष भरलेले आहे हे झोपलेल्या मराठा बहुजनांना समजावे म्हणून हे रेकार्डींग व्हायरल करत आहे. या कोरटकर नावाच्या नागपूरच्या भिक्षूकालाच काय यांच्या बापाला ही हा शिवरायांचा मावळा घाबरत नाही." असं इंद्रजित सावंत म्हणाले आहेत.
हे ही वाचा >> Santosh Deshmukh Case : मस्साजोगमध्ये आजपासून अन्नत्याग आंदोलन, दखल न घेतल्यास दोन दिवसानंतर...
इंद्रजित सावंत यांनी त्यानंतर पत्रकार परिषद घेऊनही आपली भूमिका मांडली आहे. मला आलेल्या धमकीचा मुद्दा नाही, पण छत्रपती शिवरायांवर असं कुणी बोलत असेल आणि नंतर ते म्हणणार असतील की मी असं बोललो नाही, तर महाराष्ट्राचे गृहमंत्री काय करतात असा सवालही इंद्रजित सावंत यांनी उपस्थित केला आहे.
इंद्रजित सावंत यांच्याशी वाद घालताना फोनवर असलेल्या या व्यक्तिनं "शिवाजी महाराज पळून गेले होते, बाजीप्रभूंमुळे ते वाचले, ब्राह्मणांची ताकद कमी समजू नका, ब्राह्मणांबद्दल एवढे वक्तव्य करू नका, तुम्ही सध्या ब्राम्हणांच्या मुख्यमंत्र्यांच्या शासनात काम करत आहात" अशी अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहे.
हे ही वाचा >> Raju Patil : गंगेत कधीही डुबकी मारली तर पाप धुतलं जाईल, पण इथं पुण्य जास्त मिळेल, एकनाथ शिंदेंवर मनसेचा थेट निशाणा
मला धमकी देणाऱ्या व्यक्तिचे भगतसिंह कोश्यारी यांच्यासोबत फोटो आहेत. समर्थ रामदास स्वामी नसते तर शिवाजी महाराज नसते अशी त्यांची ही विचारसरणी आहे असं म्हणत इंद्रजित सावंत यांनी म्हटलं आहे.