Pune : स्वारगेटमध्ये घडलेल्या दुष्कृत्यातील आरोपीबद्दल मोठी माहिती समोर, जुन्या गुन्ह्यांची रेकॉर्डही काढले

मुंबई तक

स्वारगेट पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने पुष्टी केली की, सीसीटीव्ही फुटेजद्वारे अधिकाऱ्यांनी आरोपीची ओळख दत्तात्रेय गाडे म्हणून केली आहे. ज्याच्याविरुद्ध आधीच चोरी आणि चेन-स्नॅचिंगचे गुन्हे दाखल आहेत. त्याला पकडण्यासाठी अनेक पोलीस पथके तैनात करण्यात आली आहेत.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

स्वारगेटमधील घटनेतल्या आरोपीबद्दल मोठी माहिती समोर

point

पोलिसांनी जुन्या गुन्ह्यांची रेकॉर्डही काढले

point

पोलिसांचं पथक लवकरच आरोपीला अटक करणार?

Pune Case : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात घडलेल्या बलात्कार प्रकरणाने महाराष्ट्र हादरला. त्यानंतर आता आरोपीची शोधाशोध पोलिसांकडून सुरू आहे. पोलिसांचे वेगवेगळे पथक आरोपीचा शोध घेतायत. पोलिसांनी या प्रकरणात काही लोकांची चौकशीही केली असल्याची माहिती आहे. त्यानंतर आता पुण्यातल्या घटनेतल्या आरोपीबद्दल मोठी माहिती समोर आली असून, या माहितीच्या आधारे आरोपीच्या लवकरच मुसक्या आवळल्या जातील अशी शक्यता आहे.

हे ही वाचा >> Manoj Jarange : उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीनंतर मनोज जरांगे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी फक्त कागद दाखवून...

26 वर्षीय तरूणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणातला आरोपी दत्ता गाडे हा शिरूर तालुक्यातील गुणाट गावचा असल्याचं निष्पन्न झालं आहे. आरोपी दत्ता गाडेवर अगोदरच जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. शिरूर आणि शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये हे गुन्हे दाखल असल्यानं त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं समोर आलंय. ह्या दत्ता गाडे नावाच्या फरार आरोपीचा शोध शिरूर आणि पुणे पोलिस करीत आहेत. 

हे ही वाचा >> इमॅजिकामध्ये पिकनिकला गेलेल्या 14 वर्षीय मुलाचा हृदयविकाराने मृत्यू

स्वारगेट पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने पुष्टी केली की, सीसीटीव्ही फुटेजद्वारे अधिकाऱ्यांनी आरोपीची ओळख दत्तात्रेय गाडे म्हणून केली आहे. ज्याच्याविरुद्ध आधीच चोरी आणि चेन-स्नॅचिंगचे गुन्हे दाखल आहेत. त्याला पकडण्यासाठी अनेक पोलीस पथके तैनात करण्यात आली आहेत.

कशी घडली होती घटना? 

26 फेब्रुवारीला पहाटे 5:30 वाजता पुण्यातील एसटी स्टँडवर ही घटना घडली. 26 वर्षांची तरुणी पुण्यातून फलटणच्या दिशेने निघाली होती, स्वारगेट एसटी स्टँड परिसरात आल्यानंतर एका ठिकाणी ती थांबली असताना आरोपीने तिला तिची एसटी दुसऱ्या ठिकाणी थांबली असल्याचं सांगितलं. माझी एसटी याच ठिकाणी थांबते, तिकडे जाणार नाही असं त्या मुलीने आरोपीला सांगितलं. मात्र, एकट्या मुलीचा फायदा घेत त्या आरोपीने तिला बोलण्यात अडकवलं. नंतर  स्वारगेट एसटी स्टँड परिसरात असलेल्या एका अंधाराच्या ठिकाणी एक शिवशाही बस उभी होती. या ठिकाणी ती मुलगी गेल्यानंतर तिने ही एसटी तर बंद आहे असं देखील सांगितलं. त्यावर "तू टॉर्च लावून आत मध्ये जा.. हीच एसटी काही वेळात फलटणला निघेल" असं या नराधमाने तिला सांगितलं. नंतर आरोपी स्वतः तिच्यासोबत बसमध्ये शिरला. त्यानं तिच्यावर जबरदस्ती केली आणि त्यानंतर तो तिथून पसार झाला.

हे वाचलं का?

    follow whatsapp