IMD Todays Rain Update: मुंबईत धो धो कोसळणार? पुढील २४ तासांसाठी पावसाची स्थिती काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

IMD Todays Rain Update For Mumbai
IMD Todays Rain Update For Mumbai
social share
google news

बातम्या हायलाइट

point

महाराष्ट्रात चक्रीवादळ धडकणार?

point

मुंबईतील आजची पावसाची स्थिती काय?

point

IMD ने वर्तवला पावसाचा अंदाज

Maharashtra Rain Update: काही दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर कायम झाला आहे. परंतु, गुजरातचे अत्यंत तीव्र कमी दाबाचे क्षेत्र (डीप डिप्रेशन) अरबी समुद्रात आल्याने शुक्रवारी ३० ऑगस्टला त्याचे चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यामुळे महाराष्ट्रावर चक्रीवादळाचं संकट ओढावणार की काय? असा प्रश्न उपस्थित झाला होता. याच पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभाग (IMD) ने आजचा पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मुंबईसह महाराष्ट्राची आजची पावसाची स्थिती काय असणार, याबाबत आयएमडीने ट्वीटरवर माहिती शेअर केली आहे. (Will Harashtra be hit by a cyclone or not? Such a question was raised. Against this backdrop, the Indian Meteorological Department (IMD) has predicted rain for today)

ADVERTISEMENT

पुढील २४ तासांसाठी पावसाची स्थिती काय असणार? 

हवामान विभागाने ट्वीटरवर दिलेल्या माहितीनुसार, पुढील २४ तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज. अंशतः ढगाळ आकाश राहील आणि हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३२°C आणि २५°C च्या आसपास असेल.

दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हे वाचलं का?

 

 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT