Sanjay Raut : "पवारांकडून शिंदेंचा नाही तर महाराष्ट्र तोडणाऱ्या शाहांचा सत्कार, आम्हालाही राजकारण कळतं"
शरद पवार यांच्यासोबत ठाकरे महाविकास आघाडीमध्ये आहेत, त्यामुळे त्यांनी एकनाथ शिंदेंचा सत्कार केल्यानं संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

संजय राऊत यांची शरद पवारांवर टीका

शरद पवार यांच्याविरोधात ठाकरे गट आक्रमक

पवारांच्या हस्ते शिंदेंचा सत्कार झाल्यानं राऊतांचा संताप
ठाकरे आणि पवारांचं ब्रेकअप होणार का अशी चर्चा आता सुरू झाली आहे. याचं कारण आहे काल सरहद संस्थेच्या कार्यक्रमात शदर पवार यांच्या हस्ते झालेला एकनाथ शिंदेंचा सत्कार. एकीकडे एकनाथ शिंदे आणि ठाकरेंच्या शिवसेनेमधील संघर्ष कायम आहे, मात्र अशातच ज्या शरद पवार यांच्यासोबत ठाकरे महाविकास आघाडीमध्ये आहेत, त्यांनीच शिंदेंचा सत्कार केल्यानं संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे. शरद पवार यांनी शिंदेंचा नाही, तर महाराष्ट्र फोडणार अमित शाहांचा सत्कार केला असं राऊत म्हणाले.
हे ही वाचा >>Jalna Crime News : प्रेम प्रकरणातून वाद, घराबाहेर झोपलेल्या तरूणाला नेलं, खून करून जाळून टाकलं
सरहद संस्थेच्या वतीने दिला जाणारा महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार देऊन एकनाथ शिंदे यांना देण्यात आला. शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आल्यानं आता अनेक चर्चांना सुरूवात झाली आहे. त्यातच संजय राऊत यांनी थेट शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. सरकार पाडणाऱ्या शिंदेंचा पवारांनी सत्कार करायला नको होता. पवारांनी सत्कार सोहळ्याला जाणं टाळलं पाहिजे होतं .पवारांकडून शिंदेंचा नाही तर महाराष्ट्र तोडणाऱ्या शाहांचा सत्कार आहे. हा सन्मान महाराष्ट्राच्या अस्मितेला, स्वाभिमानाला धक्का लावणारा आहे. हे साहित्य संमेलन नसून दिल्लीतली दलाली आहे असं राऊत म्हणाले आहेत.
संजय राऊत पुढे बोलताना असंही म्हणाले की, आम्हालाही राजकारण कळतं पवार साहेब, या गोष्टीच्या आम्हाला, महाराष्ट्राला वेदना झाल्या आहेत. त्यामुळे आता येणाऱ्या काळात महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होणार का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
रोहित पवार काय म्हणाले?
हे ही वाचा >>Kailas Phad : बीड पोलिसांना उशिरा जाग? शरद पवारांच्या नेत्याला मारहाण करणाऱ्या कैलास फडवर...
रोहित पवार यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलं आहे. "दिल्लीतील कार्यक्रमावरून संजय राऊत साहेबांसारख्या मोठ्या राजकीय नेत्याने दिलेली प्रतिक्रिया आश्चर्यकारक आहे. महाराष्ट्राला स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या सुसंस्कृत राजकारणाची परंपरा लाभली असून स्व. बाळासाहेब ठाकरे, आदरणीय पवार साहेब यांच्यासारख्या जेष्ठ नेत्यांनी ही परंपरा पुढे नेली, सामाजिक-सांकृतिक कार्यक्रमांना राजकीय मतभेदाचा कधीही अडसर ठरू दिला नाही तसेच महाराष्ट्राची सामाजिक व सांकृतिक वीण अधिक घट्ट करण्यावर नेहमीच भर दिला. पण मागील दोन-तीन वर्षात भाजपाने कलुषित केलेले राजकारण, महाराष्ट्राच्या अस्मितेशी केलेली छेडछाड बघता यामुळंच संजय राऊत साहेबांनी तडकाफडकी ही प्रतिक्रिया दिली असावी!"