प्रतापगडावर अफजलखानाचा कोथळा काढतानाचा छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार; सरकारची घोषणा

मुंबई तक

सातारा : प्रतापगडावर अफजलखानाचा कोथळा काढतानाचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे. जोडीला लाईट आणि साउंड शोही सुरु करण्यात येणार आहे. राज्याचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी याबाबतची घोषणा केली. येत्या ६ जून रोजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्ष पूर्ण होत आहेत. या अनुषंगाने ऐतिहासिक पर्यटनाला चालना देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचंही […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

सातारा : प्रतापगडावर अफजलखानाचा कोथळा काढतानाचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे. जोडीला लाईट आणि साउंड शोही सुरु करण्यात येणार आहे. राज्याचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी याबाबतची घोषणा केली. येत्या ६ जून रोजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्ष पूर्ण होत आहेत. या अनुषंगाने ऐतिहासिक पर्यटनाला चालना देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.

याबाबतची घोषणा करताना मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले, हिंदू एकता आंदोलन सातारा आणि इतर संघटनांकडून या पुतळ्याबाबत मागणी करण्यात येत होती. शिवभक्तांच्या या मागणीला लक्षात घेऊन, किल्ले प्रतापगड परिसरात छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यावर चाल करुन आलेल्या अफजल खानाचा कोथळा काढतानाचा पुतळा आणि लाईट व साउंड शो सुरु करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तात्काळ प्रस्ताव मागविण्यात आला आहे.

अफजलखान कबर आणि वाद :

मागील काही दिवसांपासून प्रतापगडावरील अफजलखानाच्या कबरीबाबत वाद सुरु आहे. ११ नोव्हेंबर रोजी कबरीजवळचं अनधिकृत बांधकाम पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आलं आहे. छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष म्हणून अफजलखानाची कबर आहे. मात्र गेल्या काही वर्षात त्या परिसरात इतर काही प्रमाणात अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढले होते. त्यामुळे अनेकदा वाद – प्रतिवाद सुरू होता. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचे विषय ऐरणीवर आले होते.

प्रतापगडाच्या पायथ्याशी सुरू असलेले अफझल खानच्या कबरीचे उदात्तीकरण थांबविण्यासाठी श्री शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलनाच्या वतीने शिवभक्तांचे आंदोलन उभे केले होते. याची दखल घेऊनच अफझल खानाच्या कबरीचा परिसर बंद करण्यात आला होता. त्यानंतर या ठिकाणी असलेलं अनधिकृत बांधकाम पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आलं आहे. चार जिल्हांतील पोलीसांचा ताफा मागवून ही कारवाई करण्यात आली होती.

हे वाचलं का?

    follow whatsapp