Supriya Sule : "संतोष देशमुखांच्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत हा लढा सुप्रिया सुळे लढणार, माझा शब्द"

मुंबई तक

मी आणि बजरंग बाप्पा आम्ही काही दिवसांपूर्वीच अमित शाहांना भेटलो, हात जोडून त्यांना विनंती केली की या प्रकरणात कुणाचीही गय करू नका अशी विनंत केली अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

"संतोष देशमुख कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत लढणार"

point

"मी देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर पदर पसरणार"

point

सुप्रिया सुळे यांचा मस्साजोगकरांना शब्द

बीड प्रकरणात राजकारण होऊ नये, पण या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. त्यामुळे या प्रकरणात शेवटपर्यंत लढणार, बाकी कुणी जबाबदारी घेऊ दे अन्यथा न घेऊदे, पण सुप्रिया सुळे याप्रकरणात शेवटपर्यंत लढणार असा शब्द सुप्रिया सुळे यांनी मस्साजोगच्या गावकऱ्यांना आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना दिला. देवेंद्रजी सुसंस्कृत नेतृत्व आहे, त्यामुळे हे कुटुंब त्यांना भेटलं तेव्हा या कुटुंबाला लवकर न्याय मिळेल असं अपेक्षित होतं, एक सिग्नल मिळणं अपेक्षित होतं असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

मी देवेंद्र फडणवीस यांना भेटून, मला न्याय द्या म्हणून पदर पसणार आहे असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. तसंच गावकऱ्यांनी आंदोलन करु नये असं आवाहन करत आम्ही तुमचा लढा लढू असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

हे ही वाचा >>Santosh Deshmukh Case : "रात्री कुणी झोपत नाही, जेवण वेळेवर नाही, सावरणं खूप अवघड आहे ताई..."

मी आणि बजरंग बाप्पा आम्ही काही दिवसांपूर्वीच अमित शाहांना भेटलो, हात जोडून त्यांना विनंती केली की या प्रकरणात कुणाचीही गय करू नका अशी विनंत केली अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली. मी संतोष देशमुख यांच्या मुलीला, आईला शब्द देते की, बीडमधील ही सत्तेची आणि पैशांची मस्ती मी मोडून काढणार. आपण सगळे एकत्र लढू, ताकदीने लढू,तुमच्या केसेस मी बघते, ही गुंडागर्दी थांबली पाहिजे असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. 

प्रशासन नेमकं काय करतंय? काय तपास करतंय? यात लपवण्यासारखं काही नाही, त्यामुळे या प्रकरणातली माहिती द्यावी असं मी देवेंद्र फडणवीस यांना आवाहन करते असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. सरकार रोज आमचे फोन टॅप करतंय, मग कृष्णा आंधळेचा कसा टॅप करू शकत नाही. तो कसा सापडत नाही असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. 

हे ही वाचा >>Nitin Gadkari: "...तर आपण जगात राज्य करू शकतो", केंद्रीय मंत्री नितिन गडकरींनी स्पष्टच सांगितलं

 

जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी बोलताना म्हटलं की, हे प्रकरण घडलं तेव्हा एसपी आणि डीवायएसपी यांचे सीडीआर काढा अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली. तसंच न्यायालयीन चौकशी होईपर्यंत या कुणालाच न्याय मिळणार नाही असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. 

हे वाचलं का?

    follow whatsapp