Sushma Andhare : "सत्ताधाऱ्यांना खुश करून राज्यसभा मिळवायची..." अंधारेंकडून नीलम गोऱ्हेंविरोधात अब्रू नुकसानीचा दावा
"पक्षाच्या जीवावर तब्बल चार वेळा आमदारकी भोगणाऱ्या आणि मोबदल्यात एक नगरसेवकच काय साधी पक्षाची एक शाखा आपल्या राहत्या भागात उभी करू न शकणाऱ्या कर्तृत्वशून्य महिलेकडून झालेली चिखलफेक" असं म्हणत सुषमा अंधारेंनी समाचार घेतला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

नीलम गोऱ्हे यांच्या वक्तव्यानं नवा राजकीय वाद

सुषमा अंधारे अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार

संजय राऊत यांनीही केली सडकून टीका
नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन आता राजकीय वातावरण पेटलं आहे. नीलम गोऱ्हे यांच्या वक्तव्यानं नव्या वादाला तोंड फुटलं असून, संजय राऊत यांनी आज सकाळी त्यांच्यावर घणाघाती टीका केली. त्यानंतर आता सुषमा अंधारे यांनी नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याची माहिती दिली आहे.
हे ही वाचा >> Abdul Sattar : शिंदे सरकारच्या काळातील निर्णयाला फडणवीसांचा झटका, अब्दूल सत्तार यांच्या निर्णयावर आक्षेप
"सत्ताधाऱ्यांना खुश करून राज्यसभा पदरात पाडायची असल्यास..."
सुषमा अंधारे यांनी थेट सोशल मीडियावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. "प्रबोधनकार ठाकरे आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून आणि अपार कष्टातून उभा राहिलेला शिवसेना हा पक्ष गोरगरिबांसाठी झटणारा आणि छोट्यातल्या छोट्या समूहाला प्रतिनिधित्व देणारा पक्ष म्हणून ओळख आहे. नीलम गोऱ्हे यांनी जाणीवपूर्वक एक उदात्त आणि भव्यदिव्य परंपरा असणाऱ्या पक्षाची आणि पक्षप्रमुखांची प्रतिमा मलीन करण्याच्या हेतूने काल अत्यंत बेताल वक्तव्य केले. सत्ताधारी पक्षांना खुश करून राज्यसभा किंवा मंत्रीपद पदरात पाडून घ्यायचे असतील तर त्यांनी ती खुशाल पाडून घ्यावीत. मात्र त्यासाठी सत्ताधाऱ्यांचे लांगुलचालन करताना त्यांनी पक्ष आणि पक्षप्रमुखांवर चिखलफेक करण्याचा प्रयत्न केला आहे तो अत्यंत अश्लाघ्य आहे. त्यांचे हे बेताल वक्तव्य वंदनीय बाळासाहेब यांनी जोपासलेल्या परंपरेच्या मुळावरचा घाव आहे. महाराष्ट्रातल्या लाखो शिवसैनिकांनी जीवाचं रान करून जो पक्ष उभा केला त्या पक्षाच्या जीवावर तब्बल चार वेळा आमदारकी भोगणाऱ्या आणि मोबदल्यात एक नगरसेवकच काय साधी पक्षाची एक शाखा आपल्या राहत्या भागात उभी करू न शकणाऱ्या कर्तृत्वशून्य महिलेकडून झालेली चिखलफेक महाराष्ट्र तथा मराठी मनाला दुखावणारी आहेत. सबब मी, सुषमा अंधारे पक्षाची प्रवक्ता आणि महाराष्ट्रातला मराठी माणूस म्हणून नीलम गोरे यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करत आहे."
हे ही वाचा >> Sanjay Raut : "आमच्याकडे आल्या, 4 वेळा आमदार झाल्या, जाताना घाण करून गेल्या; ही विश्वासघातकी, नीर्लज्ज, बाई..."
"लक्षवेधी लावायला किती पैसे घेतात?"
संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकार परिषदेत बोलताना नीलम गोऱ्हे यांच्यावर सडकून टीका केली. "नीलम गोऱ्हे यांनी पत्रकारांना बोलताना सांगितलं की, मी महामंडळाला 50 लाख रुपये दिले आणि माझा कार्यक्रम लावला. जर मी मर्जिडीज देऊ शकते, तर 50 लाखही देऊ शकते" असं त्या म्हणाल्याचा दावा संजय राऊत यांनी सांगितलं आहे. आम्ही कसे घडलो, आम्ही कसे बिघडलो हे सांगायला आम्हालाही बोलवायचं होतं. ही कोण बाई आहे? ही बाईमाणूस आहे. हे कुठलं भूत आहे? जे साहित्य संमेलनाच्या मंचावरुन गरळ ओकतेय. मराठी साहित्य आणि मराठी माणसाचं नुकसान या लोकांमुळे होतंय. साहित्य महामंडळ हे भ्रष्ट झालंय, त्यांनी पैसे घेऊन, भेटी घेऊन हा कार्यक्रम लावलाय. त्यांनी लगेचच त्यांनी या वक्तव्याचा निषेध करायला हवा होता असं राऊत म्हणाले.