Wagner Chief vs Vladimir Putin: प्रिगोझिनला विमानतच संपवलं, पुतीन यांनी मित्र आणि शत्रूचा ‘असा’ काढला काटा!

मुंबई तक

ADVERTISEMENT

russian president vladimir putin enemies were being destroyed alexey navalny poisoned plan crashed prigozhin
russian president vladimir putin enemies were being destroyed alexey navalny poisoned plan crashed prigozhin
social share
google news

Russian President Vladimir Putin: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. दोन महिन्याआधी पुतिन यांच्यासमोर प्रचंड मोठी आव्हानं उभा राहिली होती. प्रायव्हेट आर्मी वॅगनरचे प्रमुख येवगेनी येवगेनी प्रिगोझिन यांचे निधन झाले आहे. बुधवारी झालेल्या विमान अपघातात येवगेनी प्रिगोझिन यांच्यासह दहा जणांचा मृत्यू झाला आहे. प्रिगोझिन यांच्या मृत्यूमुळे आता रशिया सरकारवर प्रश्न उपस्थित केला गेला आहे. या घटनेवरुनच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांचे वक्तव्य समोर आले आहे. ते त्यांच्या मृत्यूबाबत बोलताना म्हणाले की, त्यांच्या अपघाती मृत्यूबद्दल मला बिलकूल आश्चर्य वाटत नाही. तर रशियामध्ये ज्या घटना घडत आहेत, त्या पुतिन शिवाय घडूच शकत नसल्याचे म्हटल्याने त्यांच्या या विधानाचा वेगवेगळा अर्थ काढला जात आहे.

ADVERTISEMENT

संशयास्पद मृत्यू आणि आरोप

रशियाच्या विविध घटनांच्या इतिहासाचा संदर्भ बघितला की, लक्षात येईल की, राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या शत्रूंच्या मृत्यूविषयी अनेक सवालही उपस्थित होऊ शकतो. तसेच पुतिन आणि त्यांच्या जवळच्या काही संबंधितांना विरोध करणाऱ्या लोकांचाही मृत्यू झाला आहे. तर काही जणांचा संशयास्पदरित्या मृत्यूही झाले आहेत. त्यामुळे पुतीन यांचे असणारे शत्रू कधी आणि त्यांचा कसा मृत्यू होतो हेही याचीही माहिती जाणून घेऊया…

वाचा : Kullu landslide : अवघ्या 26 सेंकदात 7 इमारती जमीनदोस्त! विध्वंसक व्हिडीओ व्हायरल

रशियामध्ये गृहयुद्ध

सगळ्यात आधी येवगेनी प्रिगोझिन (वय 62) यांच्याविषयी माहिती जाणून घेऊया. रशियामध्ये वॅगनर ही एक प्रायव्हेट आर्मी आहे. रशियाच्या सैनिकांबरोबर हे खासगी सैन्य युक्रेनविरोधात लढत होते. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून हे खासगी सैन्य लष्करी आणि गुप्तचर कारवायांमुळे वादात सापडले आहे. वॅगनर आर्मीचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन हे एकेकाळी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या जवळचे आणि खास होते. पण गेल्या काही महिन्यांत प्रिगोझिनने रशियन सैन्य आणि पुतीन यांच्याविरुद्धच बंड केले होते. 23-24 जून रोजी या सैनिकांनी रशियातील दक्षिणेकडील रोस्तोव शहरावर ताबा मिळवला होता. त्यानंतर मॉस्कोचा ताबा घेण्याची तयारीही सुरु ठेवण्यात आली होती. या सर्व कारवायामुळेच रशियामध्ये गृहयुद्धाचीच परिस्थिती निर्माण झाली. या सगळ्या परिस्थितीमुळेच रशियामध्ये सत्तापालटाच्या चर्चांनाही वेग आला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

रशियावरचे मोठे संकट

प्रिगोझिन यांच्याकडून रशियाचे संरक्षण मंत्री आणि त्यांच्या सैन्य दलावर गंभीर आरोप करुन त्यांनी त्यांच्याविरोधात विद्रोह व्यक्त केला होता. मात्र त्यावेळी पुतिन यांच्या मध्यस्तीमुळेच रशियावरचे मोठे संकटही टळले होते. मात्र प्रिगोझिन यांच्याबरोबरच अनेक शंका आणि संशयही व्यक्त केले जात होते. मात्र त्याचवेळी प्रिगोझिन यांच्याबरोबर संशय आणि संकटामध्ये प्रचंड वाढ झाली होती. एकीकडे संकटं वाढत असतानाच अमेरिकेतील एका गुप्तचर संघटनेकडून मात्र प्रिगोझिन यांची हत्या होऊ शकते असा संशय व्यक्त केला गेला होता. मागील महिन्यामध्येच बिडेन आणि आणि सीआयएचे संचालक विल्यम्स बर्न्स यांनी प्रिगोझिनच्या बंडानंतर संभाव्य धोक्याचीही शक्यता वर्तवली होती. त्या पत्रकार परिषदेत बिडेन म्हणाले होते की, मी जर प्रिगोझिनच्या जागी राहिलो असतो तर मी खाण्यापिण्याचाही विचार केला असता. मी माझ्या खाण्यापिण्याच्या आवडीनिवडीवरही लक्ष ठेवले असते. मात्र हे सर्व गोष्टी कुणी हसण्यावर घेत असले तरी माझ्यासह रशियातील कुणालाच हे माहिती नसणार की, प्रिगोझिन यांचे भविष्य नेमकं काय असणार आहे.

वाचा : Chandrayaan 3 Update : विक्रम लँडर, प्रज्ञान रोव्हर 14 दिवस चंद्रावर काय करणार?

एलेक्सी नवेलनी

रशियाचे विरोधी पक्ष नेते एलेक्सी नवेलनी यांना ऑगस्ट 2020 मध्ये सायबेरियामध्ये त्यांच्या विषप्रयोग करण्यात आला होता. अलेक्सी एका विमान प्रवास असतानाच ते अचानक त्यांची तब्बेत बिघडली होती. त्यांची तब्बेत बिघडताच त्यांना पुढील उपचारासाठी जर्मनीमध्ये त्यांनी हलवरण्यात आले होते. नोविचॉक हे व्हीएक्स नर्व्ह एजंटपेक्षा पाच ते आठ पट जास्त विषारी असते. मात्र त्याचवेळी रशियाने त्यामध्ये आपला सहभाग नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र त्यानंतर 2021 मध्ये जेव्हा तो स्व-इच्छेने रशियाला परतला तेव्हा त्यांना लगेच अटक करण्यात आली. त्यांना अटक झाल्यानंतर फसवणूक आणि त्यांच्यावरील इतर आरोपांमुळे त्यांना साडे अकरा वर्षांची शिक्षा ठोठवण्यात आली. ही शिक्षा आताही ते भोगत असले तरी त्याविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, माझ्यावर खोटे आरोप करुन राजकीय चळवर आणि राजकीय पक्षाला जहालवादी संघटना म्हणून जागीर करण्यात आली. तसेच त्याही पुढे जाऊन एक धक्कादायक घटना घडली ती म्हणजे नवेलनीच्या शिक्षेत 19 वर्षांच्या तुरुंगवासाची अतिरिक्त शिक्षाही वाढवण्यात आली.

ADVERTISEMENT

सर्गेई स्क्रिपल

केजीबी या गुप्तचर संस्थेचा माजी गुप्तहेर सर्गेई स्क्रिपल याच्यावर विषबाधा झाल्याची माहिती पुढं आली होती. माजी रशियन गुप्तहेर सर्गेई स्क्रिपलने ब्रिटीश गुप्तचरांना महत्वाची आणि गोपनीय माहिती सांगितली होती. त्यांनंतर सर्गेई स्क्रिपल आणि त्यांची मुलगी युलिया ही दोघंही मार्च 2018 मध्ये सॅलिसबरी कॅथेड्रलमध्ये शॉपिंग सेंटरच्या बाहेरच बेशुद्ध अवस्थेत आढळले होते. त्यानंतर त्यांना गंभीर अवस्थेतच रुग्णालयात दाखल केल्यानंतर ब्रिटीश अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले होते की, त्यांच्यावर नोविचोकचा विषप्रयोग केला होता. आणि हे विष प्रचंड धोकादायक असते असंही त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र त्यांच्या विषप्रयोग होऊनही त्यांच्यावर उपचार करुन त्यांना त्यातून वाचवण्यात यश आले होते. त्यावेळी रशियाने हे विषप्रयोगाचे आरोप फेटाळून लावले होते, आणि ब्रिटनकडून रशियाची बदनामी करण्याचे काम सुरु असल्याचा पलटवार त्यांच्यावर करण्यात आला होता. 2006 मध्ये रशियाने निवृत्त रशियन लष्करी गुप्तचर अधिकारी स्क्रिपल यांना ब्रिटनसाठी हेरगिरी केल्याबद्दल 13 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती, मात्र, त्यानंतर त्यांना माफही करण्यात आले. त्यानंतर त्यांना ब्रिटनकडून त्यांना नागरिकत्वही बहाल केले होते. तेव्हापासून ते ब्रिटनमध्ये राहत आहे.

ADVERTISEMENT

व्लादिमीर कारा मुर्झा

रशियाच्या राष्ट्रध्यक्षांचा चर्चेत राहिलेला विरोधक म्हणून व्लादिमीर कारा मुर्झा यांच्याकडूनही आपल्यावर विषप्रयोग करण्यात आला होता. 2015 आणि 2017 मध्ये त्यांना विष देण्याचा प्रयत्न केला गेला होता. मात्र त्यांच्यावर झालेला विषप्रयोग हे एक रहस्यच बनले होते. त्यानंतर एका जर्मन प्रयोगशाळेत पारा, तांबे, मॅंगनीज आणि जस्त यांचे उच्च प्रमाण आढळले असल्याचे त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले. मुर्जा यांच्यावर विषप्रयोग केल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीका करताना म्हटले होते की, रशियाच्या गुप्तचर सेवांसाठी विषप्रयोग हे सर्वाधिक पसंतीचे शस्त्र असल्याची टीका त्यांच्यावर करण्यात आली होती. तर त्याच वेळी, मॉस्कोकडूनही त्यांचा सहभाग नाकारला होता. या वर्षी एप्रिलमध्ये, मुर्झाला मॉस्को न्यायालयाने देशद्रोह आणि इतर गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवून त्यांना शिक्षा ठोठवण्यात आली.

अलेक्झांडर लिटविनेन्को

अलेक्झांडर लिटविनेन्को यांची ओळख ही राजकीय टीकाकार म्हणून होती. मात्र त्यांची दुसरी ओळख ही क्रेमलिनचे माजी गुप्तहेर म्हणूनही ओळखले जात होते. त्यांनाही ग्रीन टीमधून विषप्रयोग केला असल्याचे प्रकार पुढं आला होता. त्यांच्यावर विषप्रयोग झाल्यानंतर त्यांचा वयाच्या 43 व्या वर्षीच त्यांचा मृत्यू झाला होता. अलेक्झांडर पेरेपिलिची यांचाही झालेल्या मृत्यूमुळे मोठी खळबळ उडाली होती. नोव्हेंबर 2012 मध्ये लंडनबाहेरील एका खास इमारतीबाहेर त्यांचा मृतदेह आढळून आला होता. 2009 मध्ये, अलेक्झांडर पेरेपिलिची यांनी रशियन मनी-लाँडरिंग योजनेच्या स्विस तपासात मदत केल्याचे पुढे आले होते. त्यावेळी त्यांनी यूकेमध्ये आश्रय मागितला होता. मात्र त्यानंतर त्याचा झालेला मृत्यू हा खून असल्याचा संशय व्यक्त केला गेला होता. त्यावेळीही रशियाने आपला यामध्ये सहभाग नसल्याचे स्पष्ट केले होते.

अन्ना पोलितकोवस्काया

मानवाधिकारांचे होणारे उल्लंघन आणि त्यावर काम करणाऱ्या पत्रकार अन्ना पोलितकोवस्काया यांची ऑक्टोबरमध्ये गोळ्या घालून त्यांची हत्या करण्यात आली होती. त्या मॉस्कोमध्ये बाजारातून घरी परतत असताना त्यांच्या गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. 48 व्या वर्षी आणि त्यांना दोन मुलं असताना पोलितकोवस्काया यांची हत्या झाल्यानंतर पश्चिम राष्ट्रांमधून त्यांच्यासाठी जोरदार आवाज उठवण्यात आला होता. त्यांची हत्या होण्याआधी पोलितकोवस्काया यांनी रशियातील पत्रकार आणि विविध चळवळीत काम करणाऱ्यांच्या जीवाला धोका असल्याची शक्यता वर्तवली होती.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT