Chhatrapati Sambhajinagar : हिंसाचार करणारे सीसीटीव्हीत कैद, 6 CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगर हिंसाचाराचे काही सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. यात नेमक्या घटना कशा घडल्या? जमाव कितपत आक्रमक झाला होता? नेमके दंगेखोर कोण आहेत? याचे अंदाज लावण्यास सुरुवात झाली आहे.
ADVERTISEMENT
छत्रपती संभाजीनगर : राम नवमी उत्सवाची तयारी सुरू असतानाच छत्रपती संभाजीनगरमध्ये हिंसक घटना घडली. दोन समुदायातील तरुणाच्या गटात वाद होऊन परिस्थिती चिघळली. यावेळी दगडफेक आणि जाळपोळ असे प्रकार घडले. त्यामुळे रात्रभर शहरात तणाव निर्माण झाला होता. मात्र आता या हिंसक घटनेनंतर छत्रपती संभाजीनगरमधील परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. पोलीस प्रशासन संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. (6 CCTV footages of Chhatrapati Sambhajinagar Violence Incident)
ADVERTISEMENT
दरम्यान आता या घटनेचे काही सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. यात नेमक्या घटना कशा घडल्या? जमाव कितपत आक्रमक झाला होता? नेमके दंगेखोर कोण आहेत? याचे अंदाज लावण्यास सुरुवात झाली आहे.
काय आहे या सहा सीसीटीव्ही फुटेजमध्ये?
Exclusive LIVE : छत्रपती संभाजीनगर राड्याचं CCTV फुटेज समोर, कोण आहेत दंगेखोर? #chhatrapatisambhajinagar #Sambhajinagar #imtiazjaleel #shivsena #MIM @Pkhelkar @AnujaDhakras21 @sahiljoshii
https://t.co/hrLIXb98Ae— Mumbai Tak (@mumbaitak) March 30, 2023
व्हीडीओ १ – २ गट आमनेसामने, एकमेकांवर दगडफेक सुरु.
व्हीडीओ १ – काही लोकांनी चेहरे झाकले आहेत.
व्हीडीओ २ – पोलिसांच्या गाडीच्या बाजूला काही लोकांकडून दगडफेक.
व्हीडीओ २ – पोलिसांच्या गाडीवरही दगडफेक करण्याचा प्रयत्न.
ADVERTISEMENT
हेही वाचा – छत्रपती संभाजीनगरात दगडफेक, जाळपोळ; पोलिसांकडून हवेत गोळीबार
व्हीडीओ ३ – जमावानं पोलिसांची १ गाडी जाळली.
व्हीडीओ ३ – जमावाकडून आणखी एका गाडीची मोडतोड करण्याचा प्रयत्न.
ADVERTISEMENT
व्हीडीओ ४ – जमावाकडून पोलिसांची व्हॅन आणि दुसरी गाडी हलवण्याचा प्रयत्न.
व्हीडीओ ४ – जमावाकडून रस्त्यावरची कमान पाडण्याचा प्रयत्न, गाड्यांवर दगडफेक.
व्हीडीओ ५ – पोलिसांची गाडी आगीच्या भक्ष्यास्थानी.
व्हीडीओ ५ – जमावाकडून दुसरी गाडी तोडण्याचा प्रयत्न सुरु.
व्हीडीओ ६ – जमावाकडून एकमेकांवर जोरदार दगडफेक.
व्हीडीओ ६ – जमावाची काठ्यांनी मोडतोड, पोलिसांकडून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न.
हेही वाचा – छत्रपती संभाजीनगरात जाळपोळ… संजय राऊत म्हणाले, “मिंधे गटाच्या टोळ्या…”
स्वार्थासाठी परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न सुरु : देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं
दरम्यान, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेबद्दल भाष्य करताना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. फडणवीस म्हणाले, “संभाजीनगरला घडलेली घटना दुर्दैवी आहे. तिथे शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु काही लोकांचा प्रयत्न आहे की, भडकावणारी विधाने करून परिस्थिती आणखी चिघळली पाहिजे. मला इतकेच म्हणायचे आहे की, अशा स्थितीत नेत्यांनी कसे वागले पाहिजे, हे समजून घेण्याची आवश्यकता आहे.”
कुणी अशा पद्धतीने चुकीची विधाने करत असतील, तर त्यांनी ती करू नये. सगळ्यांनी शांतता पाळावी. आपले शहर शांत ठेवण्याची जबाबदारी सगळ्या नेत्यांची आहे. याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न कुणी करत असेल, तर त्यापेक्षा अधिक दुर्दैवी काहीच नाहीये. अशा प्रकारची विधाने करणे म्हणजे किती राजकीय बुद्धीने बोलले जात आहे आणि किती छोट्या बुद्धीने बोलले जात आहे, त्याचा हा परिचय आहे. याक्षणी तिथे शांतता आहे. हीच शांतता तिथे राहिली पाहिजे, असा प्रयत्न सगळ्यांनाच करावा लागेल म्हणून मी म्हटले की काही नेते राजकीय विधाने करून तिथली परिस्थिती बिघडली पाहिजे असा प्रयत्न करत आहेत.
हेही वाचा – छत्रपती संभाजीनगर हिंसाचार : रात्री बारा ते दुपारी बारा, काय-काय घडलं?
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT