Maharashtra Cabinet: खातेवाटप कोणाला ठरला लाभदायक?, कोणत्या मंत्र्याने कमावलं, कोणी गमावलं?

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

cabinet of maharashtra allocated portfolio what exactly did cm eknath shinde dcm devendra fadnavis ajit pawar
cabinet of maharashtra allocated portfolio what exactly did cm eknath shinde dcm devendra fadnavis ajit pawar
social share
google news

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar) शपथविधीनंतर साधारण 12 दिवसांनी खातेवाटप झालं आहे. मात्र, असं असलं तरीही या खातेवाटपात (Portfolio Allocation) फार मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. हा एक प्रकाराच मंत्रिमंडळाचाच खांदेपालट असल्याचं बोललं जात आहे. या खातेवाटपात अनेक मंत्र्यांची चांगली खाती त्यांना गमवावी लागली आहेत. तर काही जणांची अनपेक्षिरित्या चांगल्या खात्यात वर्णी लागली. (cabinet of maharashtra allocated portfolio what exactly did cm eknath shinde dcm devendra fadnavis ajit pawar politics news)

ADVERTISEMENT

खातेवाटपात नेमकं कोणाला कोणती खाती गेली. कोणत्या पक्षाच्या मंत्र्याने खातेवाटपात काय कमावलं आणि काय गमावलं. या सगळ्याची माहिती आम्ही आपल्याल सविस्तरपणे दिली आहे. पाहा खातेवाटपातील अगदी महत्त्वाचे मुद्दे:

खातेवाटपातून नेमकं शिंदे-फडणवीस-पवारांनी काय साधलं?

भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेसला कोणती मंत्रिपदं गेली?

  • अर्थ – हे अत्यंत महत्त्वाचं खातं हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होते. जे आता अजित पवार यांच्याकडे असणार आहे.
  • सहकार – महाराष्ट्रात सहकारातील राजकारण हे महत्त्वाचं मानलं जातं. त्यामुळे हे खातं देखील अत्यंत महत्त्वाचं असंच आहे. हे खातं भाजपच्या अतुल सावे यांच्याकडे होतं. जे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे गेलं आहे.
  • अन्न नागरी पुरवठा – देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे रवींद्र चव्हाण यांच्याकडे हे खातं होतं. जे आता राष्ट्रवादीच्या छगन भुजबळांकडे गेलं आहे.
  • महिला-बालकल्याण – हे खातं आधी भाजपच्या मंगलप्रभात लोढा यांच्याकडे होतं. जे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांच्याकडे गेलं आहे.
  • वैद्यकीय शिक्षण – भाजपचे हेवीवेट नेते अशी ज्यांची ओळख आहे त्या गिरीश महाजन यांच्याकडे हे खातं होतं. जे आता हसन मुश्रीफ यांच्याकडे गेलं आहे
  • क्रीडा – भाजपचे गिरीश महाजन यांच्याकडेच क्रीडा हे महत्त्वाचं खातं होतं. जे आता संजय बनसोडे यांच्याकडे गेलं आहे.

    हे ही वाचा >> Cabinet Portfolio: महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मोठी उलथापालथ… खातेवाटप जाहीर, संपूर्ण यादी एका क्लिकवर

शिवसेनेकडून राष्ट्रवादी काँग्रेसला कोणती मंत्रिपदं गेली?

  • कृषी – कृषी हे अत्यंत महत्त्वाचं असं खातं आहे. जे आधी शिवसेनेच्या अब्दुल सत्तार यांच्याकडे होतं. जे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनंजय मुंडेंकडे गेलं आहे.
  • मदत व पुनर्वसन – मदत व पुनर्वसन हे खातं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच होतं. जे आता राष्ट्रवादीच्या अनिल पाटीलांकडे गेलं आहे.
  • अन्न व औषध प्रशासन – शिवसेनेचे संजय राठोड यांच्याकडे अन्न व औषध प्रशासन हे खातं याआधी होतं. जे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या धर्मरावबाबा आत्राम यांच्याकडे गेलं आहे.

कोणकोणत्या मंत्र्यांची खाती बदलली?

शिवसेना:

हे वाचलं का?

  1. अब्दुल सत्तार – याआधी कृषी खातं होतं. त्यांच्याकडे आता अल्पसंख्यांक विकास हे खातं देण्यात आलं आहे.
  2. संजय राठोड – यांच्याकडे आधी अन्न व औषध प्रशासन हे खातं होतं. पण आता त्यांच्याकडे मृद आणि जलसंधारण हे खातं देण्यात आलं आहे.
  3. दादा भुसे – यांच्याकडे बंदरे व खनिकर्म हे खातं होतं. मात्र आता त्यांना काहीसं चांगलं समजलं जाणारं सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) MSRDC खातं देण्यात आलं आहे.

हे ही वाचा >> Cabinet Portfolio: मोठी बातमी… राष्ट्रवादीकडे अर्थ, सहकारसह मोठी खाती?, शिवसेनेला दणका

भाजप:

  1. अतुल सावे – भाजपचे अतुल सावे यांच्याकडे याआधी सहकार हे खातं होतं. त्याऐवजी आता त्यांना गृहनिर्माण हे खातं देण्यात आलं आहे.
  2. गिरीश महाजन – भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडे असलेलं पर्यटन हे खातं काढून ते आता गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आलं आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT