CM एकनाथ शिंदे म्हणाले ठाकरे एक नंबरचे मुख्यमंत्री आहेत, पण…
कोरोना काळात एकीकडे माणसं मरत होती, तर दुसरीकडे राजकीय नेते भ्रष्टाचार करून आपली घरं भरत होती असा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला. कोविड काळातील भ्रष्टाचार हा जिजामाता उद्यानातील पेंग्विनपासूनच सुरु झाल्याचे म्हणत त्यांनी आदित्य ठाकरेंवरही निशाणा साधला.
ADVERTISEMENT
Winter Session: हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांनी केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. विरोधी पक्ष गोंधळलेल्या अवस्थेत असून अवसान गळाले असल्याचा घणाघात त्यांनी यावेळी केला. दिशाहीन झालेल्या विरोधी पक्षाचे गलबत आता भरकटले असल्याचे सांगत उद्धव ठाकरेंचे (Former CM Uddhav Thackeray) थेट नाव न घेता आदित्य ठाकरे यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी टीका करताना कोविड काळातील आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळातील अनेक गोष्टींवर बोट ठेवत झालेल्या भ्रष्टाचारावरून ठाकरे पिता-पुत्रावर त्यांनी सडकून टीका केली. तुम्ही टीका करताना सांभाळून टीका करा असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
ADVERTISEMENT
स्वतःची घरं भरली
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधकांचा समाचार घेताना त्यांनी थेट आदित्यराज म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच्या काळात माणसं मरत होती, तर ही माणसं जनतेला लुबाडत होती आणि आणि स्वतःची घरं भरली जात होती अशी गंभीर टीकाही त्यांनी केली.
हे ही वाचा >> धक्कादायक ! 7 महिन्यात 4 हजार 872 नवजात बालकं दगावली, दररोजचा आकडा तर…
ठाकरे सरकारचा घोटाळा
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून एकनाथ शिंदे यांच्या कारभारावर टीका केली गेली होती. त्याला उत्तर देताना त्यांनी कोविड काळातील भ्रष्टाचारावरून त्यांना त्यांनी लक्ष्य केले. त्याचवेळी आदित्य ठाकरे यांच्याकडूनही टीका केली जाते. त्यामुळे त्यांनी हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने कोरोना काळात ठाकरे सरकारने केलेला घोटाळा आणि त्यांनी स्वतःचा करून घेतलेला फायदा यावरूनही त्यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला.
हे वाचलं का?
पेंग्विनपासून भ्रष्टाचाराला सुरुवात
ज्या कोराना काळात लोकांना राज्यातील लोकांची अवस्था वाईट होती, त्या कोरोना काळात लोकं मरत होती, तेव्हा ही लोकं पैसे खात होती असा घणाघातही एकनाथ शिंदे यांनी केला. त्या काळातच भ्रष्टाचाराने टोक गाठले होते. कोविड काळात मोठा भ्रष्टाचार झाला असला तरी त्या भ्रष्टाचाराची सुरुवात ही जिजामाता उद्यानातील पेंग्विनपासून भ्रष्टाचाराला सुरुवात झाल्याचा आरोपही त्यांनी आदित्य ठाकरेंवर केला.
विरोधी पक्षाचे गलबत भरकटले
कोविड काळातील भ्रष्टाचारावर बोलत त्यांनी ज्या काळात माणसं जीव वाचवण्यासाठी धडपडत होती. त्यावेळी काही लोकं आपली स्वतःची घरं भरती होती असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवरही त्यांनी निशाणा साधत दिशाहीन झालेल्या विरोधी पक्षाचे गलबत आता भरकटले असून त्यांनी टीका करताना अभ्यास करून टीका करा. नाही तर त्याची उत्तर आमच्याकडे तयार असल्याचंही त्यांनी स्पष्ट सांगितले.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Eknath Shinde : ‘पेग्विंन… कफनचोर… खिचडीचोर’; CM शिंदे विधानसभेत ठाकरेंवर बरसले
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT