‘…त्यावेळी गिरीश महाजन हाफ पँटवर फिरायचे’; एकनाथ खडसे का भडकले?
-मनीष जोग, जळगाव Eknath Khadse-Girish Mahajan : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या एका विधानाने महाराष्ट्रात नव्या राजकीय वादाची ठिणगी पडलीये. मोदींच्या विधानानंतर गिरीश महाजनांनीही उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले. त्याला एकनाथ खडसेंनी उत्तर दिलंय. महाजनांना डिवचतानाच खडसेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरही निशाणा साधलाय. 2014 मध्ये भाजप-शिवसेना युती तुटली. त्यावेळी भाजपने युती तोडली, असा दावा वारंवार उद्धव ठाकरेंकडून […]
ADVERTISEMENT
-मनीष जोग, जळगाव
ADVERTISEMENT
Eknath Khadse-Girish Mahajan : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या एका विधानाने महाराष्ट्रात नव्या राजकीय वादाची ठिणगी पडलीये. मोदींच्या विधानानंतर गिरीश महाजनांनीही उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले. त्याला एकनाथ खडसेंनी उत्तर दिलंय. महाजनांना डिवचतानाच खडसेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरही निशाणा साधलाय.
2014 मध्ये भाजप-शिवसेना युती तुटली. त्यावेळी भाजपने युती तोडली, असा दावा वारंवार उद्धव ठाकरेंकडून केला गेला. याला अमित शाह यांच्यासह भाजपच्या नेत्यांकडून सातत्याने उत्तरं दिली गेली. पण, पंतप्रधान मोदींनी यावर मौन सोडत ठाकरेंच्या शिवसेनेवर खापर फोडलं. गिरीश महाजन यांनीही उद्धव ठाकरेंच्या आडमुठेपणामुळे युती तुटल्याचे म्हटले.
हे वाचलं का?
एकनाथ खडसेंचे गिरीश महाजनांना चिमटे
पंतप्रधान मोदींपाठोपाठ महाजनांनी केलेल्या विधानावर त्यावेळी भाजपत असलेले आणि सध्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भूमिका मांडली. महाजनांना उत्तर देताना खडसेंनी डिचवलं. “गिरीश महाजन त्या काळखंडामध्ये अर्ध्या पँटवर फिरत होते. त्यांचा या चर्चेमध्ये कुठेही सहभाग नव्हता. तेव्हा पक्षामध्ये त्यांना कोणत्याही मीटिंगला बोलावलं जात नव्हतं. कोअर कमिटी.. दिल्लीतील वरिष्ठ स्तरावरच्या बैठका होत्या, त्यांना मला आमंत्रित केलं जायचं. किंबहुना महाराष्ट्राचा विरोधी पक्षनेता म्हणून पक्षाची सुत्रं देवेंद्रजी आणि मी… दोघांकडे सोपवलेली होती.”
वाचा >> Flag Hoisting : शिंदेंची अजित पवारांवर मात? राष्ट्रवादीचे मंत्री जिल्ह्याबाहेर!
“मध्ये काय गोष्टी झाल्या. चर्चा झाल्या, हे आपले सर्वमान्य नेते गिरीश महाजनांना माहिती नाही. गिरीश महाजन अत्यंत हुशार राजकारणी आहेत. अत्यंत जाणकार राजकारणी आहेत. ते जर माहिती घेऊन बोलले असते, तर बरं वाटलं असतं. कारण त्या काळखंडामध्ये गिरीश महाजनांचा या बैठकीशी कुठेही संबंध नव्हता. त्यांना बोलावलं जात नव्हतं”, असं म्हणत एकनाथ खडसेंनी महाजनांनी डिवचलं.
ADVERTISEMENT
वाचा >> “पूर्वीचा जितेंद्र आव्हाड असता तर कानशिल लाल केले असते”, आव्हाडांच्या संतापाचा कडेलोट
“नाथाभाऊची विश्वासार्हता संपली की आहे, हे महाराष्ट्रातील जनता सांगेल. जनतेला माहिती आहे. मी काही वारंवार खोटी आश्वासने दिली नाहीत. कापसाला भाऊ देऊ. जळगाव शहराचा विकास करू. अशी या लोकांची शंभर खोटी आश्वासने मी सांगू शकतो. ज्यांना हे कालपर्यंत भ्रष्ट म्हणत होते. नॅशनल करप्ट पार्टी म्हणून हिणवत होते, असे गिरीश महाजनांचे नेते आज त्यांच्याबरोबर खुर्चीला खुर्ची ठेवून बसताहेत. यात कुठली नैतिकता राहिली आहे?”, असा मुद्दा अधोरेखित करत खडसेंनी देवेंद्र फडणवीसांनीही लक्ष्य केले.
ADVERTISEMENT
गिरीश महाजनांचं नेमकं विधान काय?
“मी कुठेही नव्हतो, पण मी माझी शेखी मिरवत नाहीये. मी कुठे म्हटलं की तेव्हा मी होतो. पण आपण तरी कुठे होतात आणि आता आपण कुठे आहात? तुम्ही तर मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होतात, पण आता तुम्ही कुठे आलात? उद्धवजींच्या अडवणुकीच्या धोरणांमुळे युती तुटली, हे मी पुन्हा स्पष्ट करतो. त्यांच्या आडमुठेपणामुळे युती तुटली”, असे गिरीश महाजन म्हणाले होते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT