Narayan Rane: ‘शिंदे.. कोणाला पैसे नेऊन देत होते?’, राणेंचे ठाकरेंवर आरोप

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

BJP minister Narayan Rane has criticized Uddhav Thackeray: मुंबई: ‘तुझ्या शिवसेनेत असताना मंत्री होता ना एकनाथ शिंदे.. पैसे कोणाला नेऊन देत होता? सगळी खाती हेच लोक चालवत होते. एकनाथ वैगरे नावाला होते.’ असा गंभीर आरोप भाजपचे (BJP) केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केला आहे. एवढंच नव्हे तर आता महाराष्ट्रात शिवसेनेचं (Shiv Sena) काही राहिलेलं नाही, शिवसेनेचं दुकान बंद झालं आहे. अशी टीका नारायण राणेंनी यावेळी केलं आहे. सध्या मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. त्यातच उद्या (9 मार्च) राज्याचा अर्थसंकल्प (Budget) मांडला जाणार आहे. असं असताना नारायण राणे यांनी अचानक विधिमंडळात येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. ज्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) जहरी टीकाही केली. (eknath shinde was giving money to whom narayan ranes serious accusations against uddhav thackeray)

ADVERTISEMENT

पाहा नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर काय टीका केली

‘उद्धव ठाकरेंनी कोणाला कानाखाली पण नाही मारली’

‘आता शिवसेना संपलीय.. काही राहिलेलं नाही. उरलेले 15 पण त्यांच्या हाताशी राहत नाही निवडणुकीपर्यंत. उद्धव ठाकरेची ताकदच नाही.. मंत्रालयात यायची ताकद नव्हती तर महाराष्ट्र पिंजून काढणार? शक्य आहे का..’

‘अरे.. उद्धव ठाकरेला बोलताना त्रास होतो.. 20 पावलं चालू शकत नाही आणि घणाघात? वाघ वैगरे दाखवायचं.. अरे कशाला.. ते वय नाही राहिलं आता. त्या वयात पण काही करू शकले नाही. शिवसेना जी घडली त्यामध्ये उद्धव ठाकरेने कोणाला कानाखाली पण नाही मारली. हा त्यांचा इतिहास आहे.’

हे वाचलं का?

‘राणे तुला पूर्ण नागडा करीन…’, राऊतांच्या संयमाचा स्फोट; काय घडलं?

‘एकनाथ शिंदेंने डेरिंग करून दाखवली.. 40 घेऊन गेला..’

‘अरे कोणाची जीभ हासडतो? अरे स्वत:ची जीभ सांभाळ म्हणावं.. असा फिरत राहिला ना.. तर ती पण जीभ राहणार नाही. अरे एकनाथ शिंदेंने डेरिंग करून दाखवली.. 40 घेऊन गेला.. एकनाथ गेला पुढे 40.. यांना सांगून गेले.. जय महाराष्ट्र.. काय केलं यांनी? त्यातील एकाची जीभ, नाक, हात काही नाही पकडलं? 40 लोक गेले.. उद्धवने थांबवलं का? कसं बोलतो.. तो शब्द त्याला शोभत नाही.’

ADVERTISEMENT

‘शिवसेनेत आता काय राहिलंच नाही. 40 जाताना उघड्या डोळ्याने सैनिक पाहू शकत होते का? मी असेपर्यंत शिवसेनेतून बाहेर पडायची कोणाची हिंमत होती का? त्यामुळे शिवसेना विषय महाराष्ट्रातून संपला आहे.. दुकान बंद झालं आहे.. आता लवकर लॉकआऊट होईल.’

ADVERTISEMENT

मी उद्धव ठाकरेंना भेटणार, त्यानंतर ते राऊतला चपलेने मारतील: राणे

नारायण राणेंनी हातच जोडले…

‘जाऊ..दे जाऊ..दे (कॅमेऱ्यांसमोर नारायण राणेंनी हातच जोडले) हे म्हणजे कहर आहे.. विधिमंडळात न येता.. मातोश्रीवर बसून राहिले आणि तो पंतप्रधान.. अरे काय जेवण आहे का? ही चेष्टा आहे त्या पदाची..’

‘अरे कसला आणि कसला घणाघात.. हात वर नेला तर तीन मिनिटं लागतात खाली आणायला. या महाराष्ट्रात खोके जमवले असतील तर आम्हाला विचारा आणि एकनाथच्या टीमला विचारा.. किती, कोणी पोहचवले.. उद्धवच्या हातात दिले..’

राणे, कदमांची उडवली खिल्ली! भास्कर जाधवांनी एकनाथ शिंदेंवर चढवला हल्ला

‘एकनाथ शिंदे.. पैसे कोणाला नेऊन देत होता?’

‘खोके कलेक्शन मास्टर तर उद्धव ठाकरे आहे. अडीच वर्षात तर एकच काम केलं. खोके… औषधाच्या टेंडरमध्ये पैसे घेतले.. खोके बोलायचा अधिकार आहे का? तुझ्या शिवसेनेत असताना मंत्री होता ना एकनाथ शिंदे.. पैसे कोणाला नेऊन देत होता? सगळी खाती हेच लोक चालवत होते. एकनाथ वैगरे नावाला होते.’

‘शरद पवार आहेत.. काही करू शकतात.. काही होऊ शकतं. त्यामुळे पवारांच्या कोणत्याही निर्णयावर अंदाज वर्तवणं अशक्य आहे.’ असं नारायण राणे यावेळी म्हणाले.

राणे vs राऊत संघर्ष : शरद पवारांनी नारायण राणेंना फटकारलं, काय बोलले?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT