Uddhav Thackeray: ‘थापाड्या बोलणार होतो पण..’; फडणवीसांवर ठाकरेंचा पुन्हा वार..

मुंबई तक

ADVERTISEMENT

Uddhav thackeray Hingoli Sabha Hinduism maharashtra government
Uddhav thackeray Hingoli Sabha Hinduism maharashtra government
social share
google news

Uddhav Thackeray : महाराष्ट्र सुजलाम सुफलाम कर, गद्दारांचे सुल्तानी संकट दूर कर अशी हिंगोलीतील शंभूमहादेवाकडे प्रार्थना करत भाजपसह केंद्र सरकावर शिवसेना प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सडकून टीका केली. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्य सरकारवर टीका करताना केंद्रातील भाजप (BJP) सरकारचेही त्यांनी वाभाडे काढले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दक्षिण आफ्रिकेत जाण्यासाठी वेळ आहे मात्र ज्या आपल्या देशातील माता भगिनींवर अन्याय अत्याचार झाले त्या मणिपूरला जाण्यासाठी मात्र त्यांना वेळ नसल्याचे सांगत त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघात केला. (Our Hinduism is Ram in the heart and work in the hand Thackeray bjp criticize)

ADVERTISEMENT

शेतकऱ्यांवर गद्दारांचे आस्मानी संकट

राज्यातील शेतकऱ्यांवर ज्या प्रमाणे निसर्गाचे संकट आहे. त्याच प्रमाणे गद्दारांचेही सुलतानी आस्मानी संकट आहे. केंद्राच्या साहाय्याने शेतकऱ्यांचे हित चिरडून टाकण्याचं कामच हे राज्य आणि केंद्र सरकार करत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी त्यांच्यावर केला.

हे ही वाचा >> Ajit Pawar: फडणवीसांसमोरच अजित पवारांची संभाजी भिडेंवर टीका, म्हणाले, ‘वाचाळवीर…’

शेतकरी नैराश्याचे गर्तेत

शेतकऱ्यांच्या हितासाठी ज्या एका अधिकाऱ्याने सर्व्हे केला. त्या अधिकाऱ्याच्या सर्व्हेमध्ये मराठवाड्यातील 1 लाख पेक्षा जास्त शेतकरी हे नैराश्याच्या गर्तेत सापडले आहेत. ते सरकार निराश झाले आहेत. त्यामुळे पेरणीपूर्वीच प्रत्येक शेतकऱ्याला 25 हजारची मदत द्या अशी मागणी त्यांनी केली. मात्र त्या मागणीचे फळ त्या अधिकाऱ्या स्वेच्छानिवृत्ती घेण्याचे मिळाले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

गद्दारांनी घात केला

आमच्या बरोबर गद्दारी करुन उपमुख्यमंत्री अजित पवार सरकारमध्ये सामील झाले. त्यांच्यामुळे डबल इंजिन सरकारला आणखी एक डबा लागला आणि ते सरकार मालगाडीसारखे वाढत गेले आहे. या गद्दारांनी आमच्या सोबत घात केला नाही तर आज महाराष्ट्र देशात नाही तर जगात अव्वल ठरले असते असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

हे ही वाचा >> Vijay Wadettiwar on Ajit Pawar : ‘अजितदादा इकडेही उपमुख्यमंत्री अन् तिकडेही…’; वडेट्टीवारांचा टोला…

आमचे हिंदुत्व म्हणजे हृदयात राम

उद्धव ठाकरे यांनी हिंगोलीच्या सभेत आपल्या हिंदुत्वाची री पुन्हा एकदा ओढली. यावेळीही त्यांनी आमचे हिंदुत्व म्हणजे हृदयात राम आणि हाताला काम म्हणत भाजपच्या हिंदुत्वावर घणाघात केला. भाजपमध्ये राम राम श्रीराम म्हटले जाते मात्र निष्ठावंत बाजूला राहतात आणि आयाराम घेऊन प्रामाणिक कार्यकर्त्याला बाहेर फेकले जाते. या त्यांच्या राजकारणामुळेच भाजपसोबत युती तोडल्याचेही त्यांनी ठणकावून सांगितले.

ADVERTISEMENT

भाजपवर निशाणा

हिंगोलीच्या सभेत पक्षांतर करणाऱ्यांवर गद्दारीचा शिक्का मारत हिंदुत्व, देशभक्ती, भारत-पाकिस्तानचा सामना, ईडीकडून होणाऱ्या कारवाई, मुस्लिम महिलांसोबतचे रक्षाबंधन, राम मंदिर आणि हिंदुत्वाच्या राजकारणावर बोलत त्यांनी देशभक्तीच्या मुद्यावरून भाजपवर जोरदार निशाणा साधला.

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT