Lok Sabha 2024 : दक्षिणेचा किल्ला भेदण्यासाठी मोदी मैदानात, भाजपचं ‘मिशन साऊथ’ काय?
Lok Sabha Elections 2024 BJP Mission South : दक्षिण भारताच्या राजकारणात आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपची रणनीती सांस्कृतिक राष्ट्रवाद, भ्रष्टाचाराबाबत शून्य सहिष्णुतेचे धोरण आणि केंद्र सरकारच्या विकास योजनांच्या मदतीने आपली विश्वासार्हता प्रस्थापित करण्याभोवती असल्याचे दिसते.
ADVERTISEMENT
PM Modi eyes on South before Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी तामिळनाडू, केरळ आणि लक्षद्वीपच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दौऱ्याच्या पहिल्या दिवशी तमिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथे विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे उद्घाटन केले आणि भारतीदासन विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभालाही हजेरी लावली. पीएम मोदींनी तमिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथे सुमारे 20 हजार कोटी रुपये खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली.
ADVERTISEMENT
देशात लोकसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. या वर्षातील पंतप्रधान मोदी एखाद्या राज्यात जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. भाजप संदर्भात उत्तर विरुद्ध दक्षिण असा वाद सुरू असताना पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याचा राजकीय अर्थ काढला जात आहे. पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्याला काही महिन्यांवर येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुका आणि भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) ‘मिशन दक्षिण’शी जोडले जात आहे.
दक्षिणेत विस्तारासाठी भाजपची रणनीती काय? या प्रश्नाचा विचार करण्यापूर्वी हे आधी बघावं लागेल की, दक्षिणेत भाजपसमोर कोणती आव्हाने आहेत. हिंदी पट्ट्यातील पक्षाच्या प्रतिमेतून बाहेर पडणे हे दक्षिणेकडील राज्यांमध्ये भाजपसमोर सर्वात मोठे आव्हान आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
गृहमंत्री अमित शाह यांनी अजेंडा आज तक 2023 च्या व्यासपीठावर सांगितले होते की, 2024 च्या निवडणुकीनंतर हा वाद संपेल. निवडणुकीच्या वर्षाच्या सुरुवातीसह भाजपने विरोधकांचा दक्षिणेचा बालेकिल्ला मोडून काढण्यासाठी आपला सर्वात मोठा चेहरा पीएम मोदींना मैदानात उतरवले आहे, त्यामुळे याचा स्वतःचा धोरणात्मक अर्थही आहे.
दक्षिणेबाबत भाजपची रणनीती काय?
दक्षिण भारताच्या राजकारणात आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपची रणनीती सांस्कृतिक राष्ट्रवाद, भ्रष्टाचाराबाबत शून्य सहिष्णुतेचे धोरण आणि केंद्र सरकारच्या विकास योजनांच्या मदतीने आपली विश्वासार्हता प्रस्थापित करण्याभोवती असल्याचे दिसते. कर्नाटक आणि तेलंगणानंतर मिशन दक्षिणमध्ये भाजपचे लक्ष आता तामिळनाडूवर आहे. भाजपला तामिळनाडूमधून आशा दिसत आहेत आणि 2021 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचा चार जागांवर विजय हे त्यामागचे कारण आहे. मात्र, त्यानंतर भाजपने एआयएमडीएमकेसोबत युती करून निवडणूक लढवली होती आणि आता युती तुटली आहे.
ADVERTISEMENT
भाजपने तामिळनाडूबाबत रणनीती बदलली. पीएम मोदींचा मतदारसंघ वाराणसीला तमिळ प्रदेशाच्या विकासाचे केंद्र बनवून भाजपने सांस्कृतिक राष्ट्रवादाचा पाया घातला. 2022 मध्ये पहिल्यांदा काशी-तमिळ संगमचे आयोजन करण्यात आले होते आणि अलीकडेच दुसऱ्या काशी तमिळ संगमचेही आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात खुद्द पीएम मोदीही सहभागी झाले होते.
ADVERTISEMENT
काशी-तमिळ संगममध्येही पंतप्रधानांच्या भाषणाचा केंद्रबिंदू तमिळ ऋषी, संत, कवी आणि महापुरुष होते. आता पीएम मोदींनी तिरुचिरापल्ली येथून तमिळनाडूला सुमारे 20 हजार कोटी रुपयांचे विकास प्रकल्पच भेट दिले नाहीत, तर ते संत आणि ऋषी तसेच तमिळनाडूच्या समृद्ध भाषा आणि संस्कृतीबद्दलही बोलले. भाषेच्या वादामुळे तामिळनाडू चर्चेत आहे आणि अशा परिस्थितीत भाषा आणि संस्कृतीवर पंतप्रधान मोदींचे भाषण भाजपच्या सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या रणनीतीशी जोडले जात आहे.
संघटना स्थापन करण्याचा प्रयत्न
कर्नाटक वगळता दक्षिण भारतातील बहुतांश राज्यांमध्ये भाजपला आपले संघटन व्यवस्थितपणे उभे करता आलेले नाही. गेल्या काही वर्षांत भाजपने तेलंगणा, तामिळनाडू तसेच केरळ आणि इतर राज्यांमध्ये संघटना बांधण्यावर भर दिला आहे. तेलंगणा मॉडेल पुढे ठेवून भाजप यासाठी काम करत आहे. तेलंगणात भाजपने रस्त्यावर उतरून तत्कालीन केसीआर सरकारचा भ्रष्टाचार, गैरव्यवस्थापन आणि घराणेशाहीविरोधात निदर्शने केली आणि आता तमिळनाडूतही याच सूत्रावर पक्ष वाढताना दिसत आहे.
लोकप्रिय व्यक्तींना पक्षाशी जोडण्यावर भर
लोकसभा निवडणुकीपूर्वी एनडीएचे गणित मांडण्याबरोबरच लोकप्रिय व्यक्तींना पक्षाशी जोडण्यावरही भाजपचा भर आहे. कर्नाटकात एचडी देवेगौडा यांच्या जनता दल सेक्युलरशी युती असो किंवा आंध्र प्रदेशात पवन कल्याणच्या जनसेना पक्षासोबत असो, हा भाजपच्या रणनीतीचा भाग आहे. केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमधील पीटी उषा, इलैयाराजा, वीरेंद्र हेगडे आणि व्ही विजयेंद्र प्रसाद या चार लोकप्रिय चेहऱ्यांना राज्यसभेवर उमेदवारी देणे हाही भाजपच्या या रणनीतीचा एक भाग असल्याचे बोलले जात आहे.
ADVERTISEMENT