“मोदी, शाहांच्या हिमतीचे बुडबुडे फुटतील”, संजय राऊतांनी चढवला हल्ला
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली. नरेंद्र मोदींना देशाचा राजा व्हायचे आहे का? असा सवाल राऊतांनी केला आहे.
ADVERTISEMENT
Sanjay Raut Latest News : मागील दोन दिवसांपासून थुंकण्यावरून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि अमित शाह (Union Home Minister Amit Shah) यांच्यावर हल्ला चढवला आहे. “मोदी व शाह हे दोन्ही नेते पराक्रमी आणि हिमतीचे आहेत असे सांगितले जाते, पण पोलीस, केंद्रीय तपास यंत्रणा हाताशी नसतील तर या सगळ्यांच्या हिमतीचे बुडबुडे फुटतील”, अशा शब्दात संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना डिवचलं आहे. (Maharashtra Political News In marathi)
ADVERTISEMENT
खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या रोखठोक सदरातून नव्या संसद भवनाबद्दल आणि सेन्गोलबद्दल कठोर शब्दात भाष्य करताना नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना कानपिचक्या लगावल्या आहेत.
रोखठोक सदरात संजय राऊत लिहितात, “दिल्लीत नव्या संसद भवनाचे जोरदार उद्घाटन झाले. त्या सोहळ्यात राज्यघटनेचे, राजधर्माचे पालन झाले नाही. ‘सन्गोल’ म्हणजे राजदंडाचे आगमन दिल्लीत झाले. राजदंडासमोर पंतप्रधान मोदी यांनी साष्टांग दंडवत घातल्याचे छायाचित्र प्रसिद्ध झाले. ‘सन्गोल’ हे राजेशाही म्हणजे बादशाहीचे प्रतीक आहे. याचा अर्थ पंतप्रधान मोदी यांना राज्यघटना बाजूला करून देशाचे राजे व्हायचे आहे काय? असा प्रश्न अनेकांनी विचारला.”
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हेही वाचा >> ‘4 वर्षात 2 डझन आमदार झाले, पण मी पात्र नाही…’, पंकजा मुंडे आता खेळणार मोठा डाव
“अमेरिकेच्या स्वातंत्र्य युद्धात जॉर्ज वॉशिंग्टन यांनी बहाद्दुरी गाजवली होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर तेथील संसदेची निर्मिती झाली. तेव्हा एका सभासदाने वॉशिंग्टन यांच्या शौर्याची स्तुती करून वॉशिंग्टनला अमेरिकेचा राजा करण्याची सूचना केली, पण वॉशिंग्टन याने ती लगेच फेटाळून लावली. प्रजासत्ताक राज्याची कल्पना स्वीकारण्यात आली. घटना समितीच्या बैठकीनंतर एका वृद्ध महिलेने बेंजामिन फ्रँकलिनला विचारले, ‘आपल्याला काय मिळाले? राजेशाही की प्रजासत्ताक?’ प्रँकलिनने उत्तर दिले, ‘अर्थात प्रजासत्ताक! पण तुम्ही ते टिकवले तर!'”
2014 पर्यंत भारत प्रजासत्ताक, राऊतांनी काय लिहिलंय?
ऐतिहासिक उदाहरण देत संजय राऊतांनी पुढे म्हटलं आहे की, “राज्यघटनेची अंमलबजावणी चुकीच्या लोकांच्या हाती गेली तर काय होते याचा अनुभव सध्या जगातले अनेक देश घेत आहेत. रेगन, निक्सन, ट्रम्प, क्लिंटन यांच्या काळात अमेरिकेनेही तो घेतला. हिंदुस्थान सध्या तो घेत आहे. मोदी यांचे समर्थक म्हणतात, “देशाला खरे स्वातंत्र्य 2014 नंतर मिळाले!” मोदी आल्यानंतर हिंदुस्थान निर्माण झाला असे त्यांना वाटते. त्यांना एक गोष्ट सांगावीशी वाटते, 2014 पर्यंत या देशात प्रजासत्ताक होते. त्यानंतर ते संपले. सन्गोल हे त्याचे प्रतीक आहे.”
ADVERTISEMENT
“हिंदुस्थानातील प्रवास राजेशाही, साम्राज्यशाही, लोकशाहीकडून पुन्हा राजेशाहीकडेच येताना दिसत आहे. सध्याच्या राजकारणी व्यक्तींना वाचनासाठी वेळ नसतो, पण जे वाचत नाहीत ते सत्तेवर राहण्यास पात्र नाहीत, असे मत ब्रिटनच्या मजूर पक्षाचे नेते मायकेल फूट यांनी व्यक्त केले होते. आपले राज्यकर्ते इतिहासाचे वाचन करीत नाहीत. किंबहुना इतिहासाची पाने फाडून नवा इतिहास लिहू पाहत आहेत, पण पुस्तकाची पाने फाडून इतिहास बदलता येईल काय?”, असा सवाल करत संजय राऊत यांनी भाजप सरकारला लक्ष्य केलं आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> गद्दारांची वर्षपूर्ती अन् 9 वर्षांच आत्मपरीक्षण, अजित पवारांची केंद्रासह राज्य सरकार टीका
“राजकारण हे सत्तेसाठीच असते, पण सत्ता देशाचा पायाच उखडून टाकणारी असेल तर लोकांना पुढे येऊन देश वाचविण्याचा लढा उभा करावा लागतो. देशाची स्थिती ही राज्यघटना व लोकशाहीला मारक आहे. नवी संसद देशाच्या इतिहासाची साक्षीदार खरेच आहे काय? नामदार गोपाळ कृष्ण गोखले हे तेव्हाचे भारतमंत्री लॉर्ड मोर्ले यांच्याशी घटनात्मक सुधारणांची चर्चा करण्यासाठी पार्लमेंटमधील कार्यालयात जात, तेव्हा त्या इमारतीत चालताना इतिहास आपल्या बाजूने चालत आहे, अशी त्यांची भावना होत असे. हिंदुस्थानच्या जुन्या पार्लमेंटमध्ये चालताना भारतीय स्वातंत्र्य लढय़ाचा, राज्यघटना निर्मितीचा इतिहास आपल्या बाजूने चालत आहे असे नेहमीच वाटत आले! आता नवे संसद भवन उभे राहिले. 2014 नंतरच्या कोणत्या घटना सोबत चालतील तेवढेच पाहायचे”, असे उद्विग्न भाष्य संजय राऊतांनी नव्या संसद भवनाबद्दल बोलताना केलं आहे.
ADVERTISEMENT