Manoj Jarange: ‘असले बाजारचाळे करू नका…’, जरांगे-पाटील संतापले; कोणावर उठवली टीकेची झोड?
Manoj Jarange Maratha Reservation: मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकारला मार्गच काढायचा नाही असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला आहे.
ADVERTISEMENT
Manoj Jarange Criticized Devendra Fadnavis: अंतरवाली सराटी: ‘आमच्यात लढण्याची शक्ती आहे. पण सरकारला आणखी एकदा सांगतो.. तुम्हाला विनंती आहे असले बाजारचाळे करू नका.. नेट सुरू करा. राज्याचं वातावरण दूषित करू नका.. त्यातून तुम्हाला काही मिळणार नाही.’ असं म्हणत पुन्हा एकदा मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. अतंरवाली सराटीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते (manoj jarange again criticized shinde goverment and dcm devendra fadnavis over maratha reservation in antarwali sarathi)
ADVERTISEMENT
जरांगेंचं सरकारला अल्टिमेटम, जोरदार टीका
हे ही वाचा >> Maratha Reservation : “आपापली व्होटबँक…”, संभाजीराजेंनी सर्वच नेत्यांवर ओढले ताशेरे
‘आरक्षण कसं देणार हे आम्हाला इथे येऊन सविस्तर सांगा.. त्यावर आम्ही मराठे विचार करू.. निर्णय मराठ्यांचा आहे अंतिम काय करायचं. पण तुम्ही इथे येऊन बोला.. तिकडून गोळ्या हाणू नका.. तोडगा यांचा काय ते तर कळू द्या..’
‘वेळ मारून न्यायची असेल तर तुम्हाला पाच मिनिटं देखील मिळणार नाही. आम्हाला कळू द्या त्यांच्या मनात काय आहे. आम्हाला कळू द्या यांची अडचण काय आहे.’
‘उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणले ना.. आता आमच्या कोणत्याच मंत्र्याला आरे-तुरे म्हणू नका.. बरं जाऊ द्या.. दोन-चार दिवस गोड बोलून बघू..’
‘ते म्हणाले ना.. चर्चा माध्यमातून होणार नाही.. मी त्यांना सांगतोय ना.. जोवर बोलता येतंय तोवर या.. पण येतात का? पण हे एवढे खोडीचे आहेत म्हणून मी त्यांना खपाखप बोलतोय त्यांना.. हे असले आहेत, यांना गोडीनं बोललं की येत नाही, काड्या घालायची सवय लागलीय यांना. मग मराठ्यांना निघतन नाही दम.. मग मराठे आहेत तापट..’
‘देवेंद्र फडणवीस यांना यायचं असेल तर त्यांनी यावं.. त्यांना मराठे अडवणार नाहीत. पण यांना मार्गच काढायचा नाही.. येऊच नका, बघू काय होतं ते.. आज संध्याकाळपासून मी पाणीच सोडणार आहे. बघू हे कसं काय…’
‘आता मराठ्यांनी ओळखलंय.. कोणताही पक्ष असो ते आपले नाहीत. त्यामुळे लोकं पक्षापासून आता बाजूला झाले आहेत. इंटरनेट बंद असण्यामागे सरकारचं षडयंत्र असू शकतं. पण मराठ्यांना सांगतो मला काही होणार नाही.. फक्त शांततेचं आंदोलन करा.. यांना काय षडयंत्र करायचं ते करू द्या. माझा मराठा समाज सक्षम आहे. ही मराठ्यांची औलाद भेकड नाही की, तुमच्या नेटवर जिवंत राहणार आहे.’
‘आमच्यात लढण्याची शक्ती आहे. पण सरकारला आणखी एकदा सांगतो.. तुम्हाला विनंती आहे असले बाजारचाळे करू नका.. नेट सुरू करा. राज्याचं वातावरण दूषित करू नका.. त्यातून तुम्हाला काही मिळणार नाही. मराठे शांततेत आंदोलन करणार. ही लढाई आरपारची आहे.. तुम्हाला वाटेल नेट बंद करून, दहा-पाच जणांवर गुन्हे दाखल करून आंदोलन थांबेल. पण तसं होणार नाही.’
‘पोलीस, सरकारच लोकांना डिवचायला लागले आहेत. तुम्ही शांततेने आंदोलन हाताळा काहीही होत नाही. तुम्ही केजचे शांततेत बसलेले लोकं उचलून आणायला लागले आहात. मग काय होणार… याचा अर्थ असा आहे की, तुम्हाला जाणूनबुजून वातावरण खराब करायचं आहे. आता आम्हालाही पर्याय नाही.’
‘आम्हाला आरक्षण दे.. नाही तर सरकारची जबाबदारी. आमचं शांततेत आंदोलन सुरू राहील. उद्रेकाला आमचं समर्थन नाही.’
हे ही वाचा >> Manoj Jarange Patil : प्रसाद लाडांचं विधान ऐकून जरांगे पाटलांच्या संतापाचा कडेलोट; म्हणाले, “तुला…”
असं म्हणत जरांगे पाटील यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT