Maratha Reservation : बीडमध्ये शरद पवार गटाच्या पक्षाचं कार्यालय जाळलं! आंदोलन हिंसक वळणावर
अजित पवार गटाचे विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगला आंदोलकांनी पेटवून दिल्याची घटना घडली होती.ही घटना ताजी असतानाच आता बीडमध्येच पुन्हा शरद पवार गटाच्या पक्षाचं भवन जाळल्याची घटना घडली आहे.
ADVERTISEMENT
Maratha Reservation, Manoj Jarange Patil Agitation Antarawali Sarati : मराठा आरक्षणाच्या मुद्यावर संपूर्ण राज्य पेटून उठलंय. जागोजागी उपोषण, आंदोलने सुरू आहेत, तर काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झाले आहे. त्यात आज सकाळीच बीडमध्ये अजित पवार गटाचे विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगला आंदोलकांनी पेटवून दिल्याची घटना घडली होती.ही घटना ताजी असतानाच आता बीडमध्येच पुन्हा शरद पवार गटाच्या पक्षाचं कार्यालय जाळल्याची घटना घडली आहे. या घटनेने बीडमध्ये आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात तणावाची परीस्थिती निर्माण झाली आहे. (maratha reservation beed protestor burn sharad pawar group party office manoj jarange patil)
ADVERTISEMENT
बीडमध्ये सतंप्त मराठा आंदोलकांनी शरद पवार गटाचं पक्ष कार्यालय पेटवल्याची घटना घडली आहे. बीडमध्ये शरद पवार गटाचं राष्ट्रवादी भवन आहे. बीडचे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांच्या ताब्यात हे राष्ट्रपती भवन असते. या राष्ट्रवादीच्या भवनाला आता संतप्त आंदोलकांनी आग लावली आहे.त्यामुळे आता बीडमध्ये आमदाराच्या बंगल्यानंतर आता पक्ष कार्यालय पेटवल्याची घटना समोर आली आहे.
हे ही वाचा : Crime : जीवाचं रान करून मोबाईल चोरट्यांशी भिडली, पण… विद्यार्थीनीच्या धाडसाची कहाणी
दरम्यान बीडमध्ये सकाळी सतंप्त मराठा आंदोलकांनी विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर सुरुवातीला दगडफेक केली होती. या दगडफेकीनंतर आमदार प्रकाश सोळंके यांच्या घराला आग लावण्यात आली होती. यासह घराबाहेर असलेल्या वाहनांसह दहा दुचाकी देखील पेटवून देण्यात आली होती. या घटनेने बीडमध्ये तणावाची परीस्थिती निर्माण झाली आहे. तसेच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत.या घटनांमुळे बीडमध्ये मराठा आंदोलन हिंसक वळणावर गेले आहे.
हे ही वाचा : Manoj Jarange : शिंदे सरकारचा जरांगे पाटलांना नवा प्रस्ताव काय? बैठकीत काय ठरलं?
भाजप आमदाराचं कार्यालय फोडलं
भाजपाचे आमदार प्रशांत बंब यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. मराठा आंदोलकांनी ही तोडफोड केली आहे.प्रशांत बंब हे छत्रपती संभाजी नगरमधील गंगापूर भागातील आमदार आहेत.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT