Fact Check: पुण्यातील भांडारकर इन्स्टिट्यूटवर हल्ला करणाऱ्यांमध्ये मनोज जरांगे होते का?

राहुल गायकवाड

ADVERTISEMENT

maratha reservation fact check was manoj jarange among those who attacked bhandarkar institute in pune regarding the james lane book
maratha reservation fact check was manoj jarange among those who attacked bhandarkar institute in pune regarding the james lane book
social share
google news

Manoj Jarange Bhandarkar Institute Fact Check: पुणे: मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेलं मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचं आंदोलन संपवण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना यश आलं आहे. दहा दिवसांच्या उपोषणानंतर अखेर राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगेंशी चर्चा करुन त्यांना आरक्षणासाठी करण्यात येत असलेल्या कामांची माहिती दिली. त्यानंतर जरांगेंनी उपोषण मागे घेतलं. मराठा आरक्षणासाठी जरांगेंनी पुकारलेल्या लढ्याला मराठा समाजाकडून मोठा पाठिंबा मिळाला, असं असताना आता जरांगे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. (maratha reservation fact check was manoj jarange among those who attacked bhandarkar institute in pune regarding the james lane book)

ADVERTISEMENT

पुण्यातील (Pune) भांडारकर इन्स्टिटूटवर झालेल्या हल्ल्यात जरांगे पाटील देखील आरोपी होते असा दावा सोशल मीडियावर करण्यात येत आहे. याप्रकारचे अनेक मेजेस देखील आता व्हायरल झाले आहेत. त्यामुळे जरांगे-पाटील खरंच भांडारकर इन्स्टिट्यूच्या प्रकरणात आरोपी होते का? त्यांचा कुठल्या पक्षाशी किंवा कुठल्या संघटनेशी संबंध होता का? याबाबतचं फॅक्ट चेक आपण करणार आहोत.

गेल्या महिन्याभरापासून मनोज जरांगे हे राज्यात सर्वाधिक चर्चेत आहेत. त्यांनी पुकारलेल्या आंदोलनाची सर्वच राजकीय पक्षांना दखल घ्यावी लागली. आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सर्वच राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करा असा आदेशच त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना दिला होता. जरांगेंचा आदेश पाळत बड्या-बड्या नेत्यांना मराठा समाजाकडून गावबंदी करण्यात आलेली. मी कुठल्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नाही किंवा कुठल्याही राजकीय पक्षाचे मला समर्थन नाही असं जरांगे सातत्याने सांगतात.

हे वाचलं का?

हे ही वाचा>> उद्धव ठाकरे बद्रीनाथला गेले, पण.. घडलं भलंतच राजकारण!

तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांवर त्यांनी केलेल्या टिकेमुळे जरांगेंचं नाव शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी जोडलं जातं. त्यातच आता भांडारकर इन्स्टिट्यूट प्रकरणात जरांगे देखील आरोपी होते असा दावा केला जात आहे.

मुंबई Tak च्या अनेक चर्चांमध्ये आणि कार्यक्रमांमध्ये हा प्रश्न विचारला जातोय. ‘महाराष्ट्र टुडे’ या आमच्या बुलेटिनमध्ये अरविंद देवधर नावाच्या व्यक्तीने जरांगे भांडारकर इन्स्टिट्यूट प्रकरणात आरोपी होते. असा दावा केला आहे. देवधर त्यांच्या कमेंटमध्ये म्हणतात, ‘काही वर्षांपूर्वी पुण्याच्या भांडारकर इन्स्टिट्यूटवर हल्ला करण्यात आला होता आणि त्यात अनेक मौल्यवान दस्तावेज जाळून टाकण्यात आले होते. अटक करण्यात आलेल्यांमध्ये मनोज जरांगे हे देखील एक नाव होतं. आता तुम्हाला कळालं असेल कोण जरांगेंना पाठिंबा देत आहे आणि ते देवेंद्र फडणवीसांवर वैयक्तिक हल्ले का करत आहेत?‘

ADVERTISEMENT

आता फॅक्ट चेक करण्यापूर्वी भांडारकर इन्स्टिट्यूट प्रकरण नेमकं काय होतं हे थोडक्यात जाणून घेऊया:

परदेशी लेखक जेम्स लेन याच्या पुस्तकात शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह लिखाण करण्यात आलं, असा आरोप करण्यात आला होता. जेम्स लेनला पुस्तक लिहिण्यात भांडरकर इन्स्टिट्यूटच्या 12 जणांनी मदत केल्याचा दावा करण्यात आला होता. यावरुनच 5 जानेवारी 2004 या दिवशी भांडरकर इन्स्टिट्यूटवर हल्ला करण्यात आला होता. हा हल्ला संभाजी ब्रिगेडने केला होता. या हल्ल्यात भांडारकर इन्स्टिट्यूटचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं.

ADVERTISEMENT

या घटनेनंतर राज्यातील राजकारण ढवळून निघालं होतं. या प्रकरणात पोलिसांनी संभाजी ब्रिगेडच्या 72 कार्यकर्त्यांना अटक केली होती. हा खटला अनेक वर्ष चालला. 27 ऑक्टोबर 2017 ला या प्रकणातील सर्वच्या सर्व 72 आरोपींची पुण्याच्या सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती. भांडारकर इन्स्टिट्यूटवरील हल्ला हा राजकीय विषय देखील बनला होता.

राष्ट्रवादी काँग्रेसने जेम्स लेनच्या पुस्तकाचा मुद्दा लावून धरला होता. निवडणुकांच्या तोंडावर झालेल्या या घटनेमुळे राष्ट्रवादीला निवडणुकांमध्ये त्याचा फायदा झाला होता अशी राजकीय वर्तुळात तेव्हा चर्चा होती.

फॅक्ट चेक.. जरांगेचा ‘त्या’ हल्ल्यात सहभाग होता का?

मुंबई Takने या प्रकरणामध्ये संभाजी ब्रिगेडचे वकील मिलिंद पवार यांच्याशी संवाद साधला होता, मिलिंद पवार यांनी सर्व 72 आरोपींच्या बाजूने केस लढली होती. मिलिंद पवारांच्या म्हणण्यानुसार, मनोज जरांगे पाटील यांचा या घटनेशी कुठलाही संबंध नाही. 72 अटक आरोपींमध्ये मनोज जरांगे यांचं कुठेही नाव नाही.

मिलिंद पवार यांनी मुंबई Takशी पोलिसांनी फाईल केलेली चार्जशीट देखील शेअर केली. त्या चार्जशिटमधील 72 आरोपींमध्ये कुठेही मनोज जरांगे यांचं नाव दिसून येत नाही.

हे ही वाचा>> Maratha Reservation : मुख्यमंत्री अ‍ॅक्शन मोडवर! ‘वर्षा’ बंगल्यावरील बैठकीत काय घडलं? Inside Story

इतकंच नाही तर त्यावेळी लोकसत्ता या वृत्तपत्रात भांडारकर इन्स्टिट्यूटवर झालेल्या हल्ल्याचं वार्तांकन करण्यात आलं होतं, त्यात सर्व आरोपींची नावं छापली गेली होती. त्या वार्तांकनामध्ये देखील मनोज जरांगे यांचा कुठेही उल्लेख नसल्याचं समोर आलं आहे.

मुंबई Takने संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ता संतोष शिंदे यांच्याशी देखील संवाद साधला, संतोष शिंदे यांच्या म्हणण्यानुसार ‘भांडारकर इन्स्टिट्यूट प्रकरणाशी मनोज जरांगे यांचा कुठलाही संबंध नाही. मनोज जरांगे हे संभाजी ब्रिगेडमध्ये कार्यकर्ते कधीच नव्हते. ते छावा संघटनेत काम करत असल्याचं आढळतं परंतु संभाजी ब्रिगेडमध्ये त्यांनी कधी काम केलेलं नाही.’

त्यामुळे मुंबई Takने केलेल्या फॅक्ट चेकमध्ये मनोज जरांगे यांचा भांडारकर इन्स्टिट्यूट प्रकरणात संबंध नसल्याचं समोर आलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT