Viral News: Shiv Sena च्या निकालानंतर एकनाथ शिंदेंचा ‘तो’ फोटो होतोय तुफान व्हायरल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Eknath Shinde Photo Viral: मुंबई: शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा राहुल नार्वेकर यांनी निकाल देताना शिवसेनेच्या एकाही आमदाराला अपात्र केलं नाही. मात्र, याचवेळी त्यांनी शिवसेना पक्ष हा एकनाथ शिंदे यांचाच असल्याचा मोठा निर्णय दिला. यावेळी राहुल नार्वेकर यांनी शिवसेना पक्षाची 1999 सालची घटनाच गृहीत धरली. तसंच 2018 मधील शिवसेनेच्या नेतृत्व रचनेबाबत आधार घेत त्यांनी हा निकाल दिला. पण याच निकालानंतर आता एकनाथ शिंदेचा एक फोटो प्रचंड व्हायरल होत आहे आणि त्यांना अनेक सवालही विचारले जात आहे. (mla disqualification case an old photo of shinde is going viral on social media after rahul narwekar said that shiv sena party is eknath shinde)

ADVERTISEMENT

राहुल नार्वेकरांनी शिवसेना शिंदेंचीच म्हणताना, काय टिप्पणी केली?

‘2013 आणि 2018 रोजी पक्षांतर्गत निडणूक झाली नाही, म्हणून ती घटना चुकीची आहे. 2018 ला पक्षाच्या घटना जी दुरुस्ती करण्यात आली ती चूक आहे. 2023 मध्ये शिंदे गटाने दिलेली घटना मी ग्राह्य धरतो. पण 2018 सालची शिवसेनेती पक्ष रचना मी ग्राह्य धरत आहे.’

हे ही वाचा>> CM Shinde Exclusive: ‘नार्वेकरांनी ‘तो’ निर्णय दबावाखाली घेतला..’, मुख्यमंत्री शिंदेंचं मोठं विधान

‘शिवसेना पक्षप्रमुख कोणालाही पदावरून काढू शकत नाहीत, उद्धव ठाकरेंनी धरलेला निर्णय ग्राह्य धरता येणार नाही. त्यामुळे एकनाथ शिंदेंची हकालपट्टी मान्य करता येत नाही. पक्षप्रमुखाला सर्वोच्च अधिकार देणं हे लोकशाहीला घातक उद्धव ठाकरे यांना अध्यक्षपदावरून हटविण्यात आलं होतं. त्यामुळे त्यांचा दावा मान्य करता येणार नाही. त्यांच्या गटाचा व्हीपही वैध नाही.’ असं म्हणत राहुल नार्वेकर यांनी उद्धव ठाकरे यांना पक्षप्रमुख म्हणून ग्राह्य धरलं नाही..

हे वाचलं का?

अन् सोशल मीडियावर व्हायरल झाला ‘तो’ फोटो

मात्र, याच निकालानंतर आता एकनाथ शिंदे यांचं एक जुनं ट्विट व्हायरल होत आहेत. 2019 विधानसभा निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांनी त्याचे फोटो आणि ट्विट हे शेअर केलं होतं. ज्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की, ‘शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी आज विधानसभा निवडणूक 2019 करिता कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेतर्फे अधिकृत उमेदवार म्हणून एबी फॉर्म देऊन पुन्हा एकदा माझ्यावर विश्वास दर्शविला. मा. उद्धवजी ठाकरे साहेबांचे मनस्वी आभार.’

एकनाथ शिंदेंचा व्हायरल होत असलेल्या ट्विटचा स्क्रिनशॉट

हे ट्वीट एकनाथ शिंदे यांनी 30 सप्टेंबर 2019 साली केलं होतं. ज्यामध्ये दोन फोटोही शेअर केले होते. ज्यामध्ये उद्धव ठाकरे निवडणुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा AB फॉर्म हा एकनाथ शिंदे यांना देताना दिसत आहे. शिंदेंनी त्यांचं हे ट्वीट उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना त्यावेळी टॅगही केलं होतं.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> ‘त्या’ निकालानंतर शरद पवारांचं मोठं विधान, ‘उद्धव ठाकरेंची केस…’

पण आता याच ट्विटचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्या माध्यमातून अनेक जण मुख्यमंत्री शिंदेंवर टीका देखील करत आहेत.

ADVERTISEMENT

आता या सगळ्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नेमकी काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT