MNS Toll: ‘टोलचा सगळा पैसा घेणारा म्हैसकर कोणाचा लाडका…’, राज ठाकरे प्रचंड संतापले
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील टोल नाक्यावरुन पुन्हा एकदा टीका सुरू केली आहे. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. तसेच राज्यातील सगळ्या टोलची कंत्राटं म्हैसकर यांना कशी मिळतात असा सवालही विचारला आहे.
ADVERTISEMENT
मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांना समृद्धी महामार्गावरील (Sammrudhi Highway) टोल नाक्यावर अडविण्यात आल्यानंतर मनसैनिकांकडून त्याची तोडफोड करण्यात आली होती. याच मुद्यावर राज ठाकरेंनी पुण्यात (Pune) पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. मात्र, टोलच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा त्यांनी भाष्य केलं आहे. यावेळी यावरुन त्यांनी संताप व्यक्त केला आहे. (mns raj thackeray criticizing toll naka state targeted bjp how mhaiskar gets all the toll contracts)
‘प्रत्येक वेळेला जे काही टोल म्हैसकर नावाच्या माणसाला मिळतात हा, कोण.. कोणाचा लाडका आहे हा म्हैसकर.. ही टोलची प्रकरणं तरी काय आहेत?’ असा संतप्त सवाल राज ठाकरेंनी यावेळी विचारला आहे
पाहा राज ठाकरे पुण्यात टोलवरून नेमकं काय म्हणाले:
‘मुळात अमित महाराष्ट्रभर दौरा करतोय. तो काही टोल फोडत चाललाय असं नाहीए. एखाद टोल नाक्यावर हा प्रसंग घडला. त्याच्या गाडीला फास्ट टॅग असून देखील तिथे त्याला थांबवलं गेलं. तो सांगत होता की, मी टोल भरलाय सगळ्या गोष्टींचे तरी तिकडे थांबवलं आणि नंतर काय फोनाफोनी झाली आणि नंतर त्यावेळी तिथे वॉकीटॉकी सुरू होता त्या माणसाच्या समोरच्या.. समोरचा माणूस काही तरी उद्धटपणे बोलत होता. त्यावर ती आलेली रिअॅक्शन आहे. त्यामुळे आता काय महाराष्ट्रभर टोल फुटत सुटा असं नाही..’
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Vijay Darda यांचे हात कोळसा घोटाळ्यात काळे, दर्डा पिता-पुत्राला ‘इतकी’ वर्ष काढावी लागणार तुरुंगात
‘पण त्याही पेक्षा भाजपने या गोष्टी बोलण्यापेक्षा टोलमुक्त महाराष्ट्र करू हे जे भाजपने निवडणुकीच्या काळात जे सांगितलं होतं त्याचं काय झालं ते भाजपने देखील सांगावं.’
‘प्रत्येक वेळेला जे काही टोल म्हैसकर नावाच्या माणसाला मिळतात हा, कोण.. कोणाचा लाडका आहे हा म्हैसकर.. ही टोलची प्रकरणं तरी काय आहेत?’
‘दुसरी गोष्ट म्हणजे समृद्धी महामार्गावर झालेली घटना.. समृद्धी महामार्गावर रस्ता बनवताना.. जसा मुंबई-पुणे एक्सप्रेस वे बनवताना त्याला दोन्ही बाजूने सुरक्षा कठडे टाकले गेले. असं संपूर्ण समृद्धी महामार्गावर कुठेही करण्यात आलेलं नाही. याच महामार्गावर आतापर्यंत अपघातात 400 लोकं मृत्युमुखी पडले आहेत.’
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Raj Thackeray : ‘हे नितीन गडकरींचं अपयश, महाराष्ट्राचं दुर्दैव’, राज ठाकरे का भडकले?
‘याची जबाबदारी भाजप किंवा सरकार घेणार का? तुम्ही अख्खा समृद्धी मार्ग सुरक्षा कठडे न बांधता लोकांसाठी मोकळा केलात तिथे जनावरं येतात त्या रस्त्यावर.. हरणं येतात, कुत्रे येतात, गायी येतात.. ज्या वेगाने गाड्या जाणार त्या अपघातात मरणार.. ही सरकारची जबाबदारी नाही का?’
ADVERTISEMENT
‘तुम्ही ती गोष्ट सुरू करण्याच्या अगोदर काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी होती. पण त्याच्याआधीच टोल सुरू करता. म्हणजे लोकांच्या जगण्या-मरण्याची काही काळजी नाही. पण रस्ता बनवला तर आम्हाला लगेच टोल पाहिजे. लोकं गाड्या चालवतायेत.. मरू देत.’
‘आता एक टोल बंद होता मुंबई-पुण्याचा एका टोलवरुन गाड्या सुरू होत्या.. लोकांना चार-चार सहा-सहा तास लागतायेत. नाशिकवरून काल आमचे एक मित्र येत होते त्यांना तब्बल सात तास लागले. सगळ्या ठिकाणी खड्डे पडले आहेत. रस्ते व्यवस्थित नाहीत. ट्रॅफिक जॅम आहे. तुम्ही कसले टोल वसूल करतात आमच्याकडून.. ही जी मनमानी सुरू आहे त्याबद्दल भाजप काही बोलणार का?’ असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.
ADVERTISEMENT