मलंगगडावरून ओवैसींनी शिंदेंवर साधला निशाणा, तुम्हाला बाबरीमुळेचं…

मुंबई तक

ADVERTISEMENT

MP Asaduddin Owaisi criticizes Chief Minister Eknath Shinde over Malanggarh statement
MP Asaduddin Owaisi criticizes Chief Minister Eknath Shinde over Malanggarh statement
social share
google news

Malanggad CM Shinde: मलंगगडवर सुरु असलेल्या हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी मलंगगडला मुक्त केल्याशिवाय मी शांत बसणार नसल्याचे वक्तव्य त्यांनी केले होते. मलंगगडावर गेल्या अनेक दिवसांपासून हिंदू-मुस्लीम वाद सुरू आहे. मात्र त्यावरून केलेल्या वक्तव्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर जोरदार टीका होऊ लागली आहे. मलंगगडाबाबत केलेल्या त्या वक्तव्यावरून आता ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

ADVERTISEMENT

हाजी मलंग दर्गा वाद

मलंगगडावरील हिंदू-मुस्लीम वाद हा आताचा नाही तर तो जुना वाद आहे. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्यावेळेपासून मलंगगडावरील हाजी मलंग या दर्ग्याबाबत आंदोलन सुरु आहे. हा दर्गा नसून पूर्वी येथे मंदिर होते असा दावा हिंदू संघटनाकडून करण्यात येत आहे. गेल्या कित्येक वर्षापासून हा वाद चालू असतानाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मलंगगड मुक्त करण्याचे अश्वासन दिल्याने त्यांच्यावर आता टीका होऊ लागली आहे. त्यांनी प्रतापगडावरील अतिक्रमण हटवल्याचे उदाहरण देऊन त्यांनी मलंगगडाचेही उदाहरण दिल्याने नव्या वादाला सुरुवात झाली. त्यावरूनच असदुद्दीन ओवैसी यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

आत्मविश्वास वाढला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मलंगगडाला मुक्त करण्याचे अश्वासन दिल्यानंतर त्यांच्या त्या वक्तव्याबद्दल असदुद्दीन ओवैसी यांनी संताप व्यक्त केला आहे. बाबरी मशीदप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे या लोकांचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे त्यामुळेच एकनाथ शिंदे यांच्याकडून दर्ग्यावर कारवाई करणार असल्याचे जाहीर वक्तव्य केले जात असल्याची टीका त्यांनी केली आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी, ठाण्यातून आरोपीला ठोकल्या बेड्या

भाजपमुळे धाडस

भाजपच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आहेत, त्यामुळेच त्यांना एवढा आत्मविश्वास आल्याचे त्यांनी म्हटले आहे. हाजी मलंग दर्गा हा 200 ते 300 वर्षे जुना आहे, तरीही ते अशा प्रकारची कशीकाय वक्तव्य केली जात आहेत असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

तुम्हाला सगळेच सारखे

एकनाथ शिंदे तुम्ही मुख्यमंत्री आहात. त्यामुळे तुमच्या नजरेत सगळे धर्म सारखे आणि समानच पाहिजे. मग ते समाजातील कोणीही असो हिंदू, मुस्लीम, ख्रिस्ती किंवा बौद्ध समाज असो तुमच्यासाठी हे सगळे सारखेच आहेत. मात्र तरीही तुम्ही अशी वादग्रस्त वक्तव्य का करत आहात अशी सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. त्यांच्या या अशा वक्तव्यातून देशात अराजकता पसरवण्याचा प्रयत्न होत असून सातत्याने चिथावणीखोर वक्तव्य केली जात असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> अखेर आमदार सुनील कांबळेंवर गुन्हा दाखल, कानशिलात लगावलेलं प्रकरण भोवणार

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT