‘…पण यांनी भारत मातेचे तीन तुकडे केले’, राहुल गांधींवर PM मोदींचा घणाघात
मणिपूर हिंसाचारावरून विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज उत्तर दिले. यावेळी इतिहासातील दाखले देत मोदींनी राहुल गांधींवर पलटवार केला.
ADVERTISEMENT
Narendra Modi speech in lok sabha : ‘मोदीजींनी मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या केली. माझ्या दुसऱ्या आईची मणिपूरमध्ये हत्या करण्यात आलीये’, असे म्हणत काग्रेस नेते राहुल गांधींनी मोदी सरकारवर टीकास्त्र डागलं. राहुल गांधींच्या या टीकेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्युत्तर दिलं. इतिहासाचे दाखले देत मोदींनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर घणाघात केला.
नरेंद्र मोदी काय बोलले? भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
“विरोधकांना राजकारणाशिवाय दुसरं काहीही करायचं नाहीये. मणिपूर प्रकरणावर न्यायालयाचा एक निर्णय आला आहे. मणिपूरमध्ये हिंसा झाली. खूप कुटुंबांना त्रास झाला. अनेकांनी जवळची माणसं गमावली. महिलांसोबत गंभीर गुन्हे झाले. हे गुन्हे अक्षम्य आहेत. दोषींना कठोरात कठोर शिक्षा देण्यासाठी केंद्र, राज्य प्रयत्न करत आहेत. देशातील नागरिकांना विश्वास देतो की, लवकरच मणिपूरमध्ये शांतीचा सूर्य उगवेल. मणिपूर आत्मविश्वासाने पुढे जाईल.”
“मणिपूरमधील नागरिकांना सांगू इच्छितो की, देश तुमच्यासोबत आहे. हे सभागृह तुमच्यासोबत आहे. आपण मिळून या आव्हानावर तोडगा काढू. तिथे शांतता नांदेल. मणिपूर पुन्हा विकासाच्या वाटेने जाईल, यासाठी प्रयत्नात कुठलाही कसूर केला जाणार नाही.”
“सभागृहात भारत मातेविषयी जे बोललं गेलं. त्यामुळे भारतीयांच्या भावना दुखावल्या आहेत. मला माहिती नाहीये, सत्तेशिवाय असे हाल होतात. सत्तेशिवाय जगू शकत नाही का? काय भाषा आहे? काही लोक भारत मातेच्या मृत्यूची इच्छा व्यक्त करताहेत. यापेक्षा दुर्दैवी काय आहे. हे ते लोक आहेत, जे लोकशाहीच्या हत्येबद्दल बोलतात. कधी संविधानाच्या हत्येबद्दल बोलतात. पण, जे यांच्या मनात आहे. तेच त्यांच्या तोंडून येतं.”
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
वाचा >> PM Modi: ‘अविश्वास प्रस्ताव आमच्यासाठी शुभ’, पंतप्रधान मोदी लोकसभेत असं का म्हणाले?
“14 ऑगस्ट फाळणीचा दिवस. हा दिवस आजही आपल्याला वेदना देतो. हे ते लोक आहेत, ज्यांनी भारत मातेचे तीन तुकडे केले. जेव्हा भारतामातेला गुलामगिरीतून मुक्त करायचं होतं, तेव्हा या लोकांनी भारतमातेचे हात कापले. तीन तुकडे केले. हे लोक कोणत्या तोंडाने बोलतायची हिंमत करतात.”
“हे ते लोक ज्या वंदे मातरम गीताने देशाला प्राणार्पण करण्याची प्रेरणा दिली. देशाच्या कानाकोपऱ्यात वंदे मातरम प्रेरणेचा स्वर बनला होता. पण, फुटीच्या राजकारणामुळे त्यांनी भारतमातेबरोबरच वंदे मातरमचेही तुकडे केले.”
“भारत तेरे तुकडे होंगे म्हणणार हे लोक आहेत. त्यांना प्रोत्साहन देतात. सिलिगुडीजवळ जो ईशान्य भारताला जोडणारा कॉरीडोर आहे, तो कापावा असे हे म्हणतात. ईशान्ये भारत वेगळा होऊन जाईल. हे त्यांचं स्वप्न आहे.”
ADVERTISEMENT
वाचा >> No Confidence Motion : सर्व रेकॉर्ड मोडून 2024 मध्ये परत येऊ; PM मोदींचा पलटवार
“कच्छ तिबूक काय आहे. एक बेट. कुणी दुसऱ्या देशाला दिलं होतं. ते भारतमातेचं अंग नव्हतं का? तेही तुम्ही तोडलं. इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली हे झालं होतं. काँग्रेसचा इतिहास भारतमातेला छिन्न विच्छिन्न करण्याचा आहे”
ADVERTISEMENT
“काँग्रेसचे भारताविषयी, भारतांविषयी प्रेम कसं राहिलं आहे. मला एक सत्य सांगायचं आहे. ते ही पिडा समजू शकणार नाही. मला तीन प्रसंग सांगायचे आहेत. पहिली घटना 5 मार्च 1966. या दिवशी काँग्रेसने मिझोरमध्ये नागरिकांवर हवाई दलाच्या माध्यमातून हल्ला केला होता. मिझोरामचे लोक दुसऱ्या देशाचे होते का. त्याची सुरक्षा भारत सरकारची जबाबदारी नव्हती का. निर्दोष लोक मारले. मिझाराममध्ये 5 मार्चला हळहळतो. यांनी कधीही मलम लावण्याचा प्रयत्न केला नाही. यांना कधी त्याचं दुःख झालं नाही. काँग्रेसने हे सत्य लपवून ठेवलं.”
“दुसरी घटना 1962 ची. रेडिओवरून झालेली उद्घोषणा आजही ईशान्येकडील लोकांना त्रास देते. पंडित नेहरूंनी जेव्हा चीनने हल्ला केला होता, तेव्हा लोक मदतीची अपेक्षा करत होते. अशा बिकट परिस्थितीत दिल्लीत बसलेल्या पंडित नेहरूंनी म्हटलं होतं की, माझं ह्रदय आसामच्या लोकांसोबत आहे, असं म्हणाले. नेहरूंनी त्यांना त्यांच्या परिस्थितीत जगण्यासाठी सोडून दिली होते.”
वाचा >> Amol Kolhe: ‘सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?’, अमोल कोल्हेंनी लोकसभा दणाणून सोडली!
“लोहियांनी नेहरुंवर गंभीर आरोप केला होता. ते म्हणाले होते की, जाणिवपूर्वक नेहरू ईशान्य भारताचा विकास करत नाहीये. हे किती दुर्लक्ष आणि गंभीर बाब आहे. 30 हजार चौरस मैल क्षेत्राला एका कोल्ड स्टोरेजमध्ये बंद करून त्याला विकासापासून वंचित ठेवले गेले आहे.”
ADVERTISEMENT