Shiv Sena: अजित पवारांच्या एंट्रीमुळे शिंदे गटाला छळतेय ‘ही’ भीती; वाचा Inside Story
अजित पवारांच्या सरकारमधील प्रवेशामुळे शिंदे गटात अस्वस्थता पसरली आहे. राष्ट्रवादीचा सरकारमध्ये समावेश केल्यामुळे शिवसेनेच्या मंत्र्यांनी बरीच नाराजी व्यक्त केली आहे. वाचा काय आहे नेमकी Inside Story
ADVERTISEMENT
Maharashtra Political News Live: मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह 9 आमदार हे रविवारी महाराष्ट्रातील विद्यमान सरकारमध्ये सामील झाले. यामुळे थेट सरकार आणि भाजपची (BJP) ताकद वाढली असली, तरी अप्रत्यक्षपणे शिंदेंच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. शिंदे गटातील (Shinde Group) सर्व मंत्र्यांनी सोमवारी सकाळी मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) यांची त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी कॅबिनेट मंत्री उदय सामंत, गुलाबराव पाटील, शंभूराज देसाई, शिंदे गटाचे नेते दादा भुसे, संदीपान भुमरे उपस्थित होते. प्रत्येकाची मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी एक बैठक झाली ज्यात त्यांनी संभाव्य खाते वाटपावर चर्चा केली. यासोबतच अजित पवारांना सरकारमध्ये सामावून घेण्याच्या निर्णयावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. (ncp ajit pawar entry in government uneasiness in shinde group shiv sena ministers expressed much displeasure inside story latest update on maharashtra politics)
ADVERTISEMENT
राष्ट्रवादी काँग्रेसने शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री शिंदे हे त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची ठाण्यातील त्यांच्या खाजगी निवासस्थानी भेट घेताना दिसले. तसेच या कालावधीत कोणत्याही शासकीय बैठक किंवा कार्यक्रमाला हजेरी न लावता मुख्यमंत्री शिंदे दिवसभर संघटनात्मक कामात व्यस्त राहिले.
शिंदे गटामधील अस्वस्थतता निराधार नाही!
शिंदे कॅम्पमध्ये अस्वस्थता हे ही गोष्ट निराधार नाही. खरे तर शिंदे-फडणवीस सरकारला 30 जूनलाच एक वर्ष पूर्ण झाले. तरीही राज्यात 23 मंत्रिपदे रिक्त आहेत. अजित पवारांच्या बंडखोरीचा आणि त्यांच्या एनडीएतील प्रवेशाने शिंदे गटाची चिंता वाढवली आहे.
हे वाचलं का?
हे ही वाचा>> गौप्यस्फोट! एकनाथ शिंदे गुवाहाटीत असतानाच पवार-पटेलांचा झाला होता प्लॅन
खरं तर महाराष्ट्र सरकारचा जुलैमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होणार होता. हे जवळपास निश्चित झाले होते. तशा बातम्याही समोर आल्या होत्या. साहजिकच तेव्हा मंत्रिमंडळ विस्तारात भाजप-शिवसेना यांचाच झाला असता, ज्यामुळे शिंदे गटातील नेते आणि आमदारांना मंत्रिपदे मिळाली असती. पण अचानक अजित पवार आणि त्यांच्या 9 आमदारांना मंत्रिपदं मिळाल्याने शिवसेनेच्या आमदारांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून घेण्यात आल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
अजित पवार यांच्यासोबत 9 जणांना मंत्रिपदाची शपथ
अजित पवारांनी एनडीएत प्रवेश केल्यावर त्यांच्यासह 9 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष आपल्या आमदारांना सामावून घेण्याचा आणि आगामी निवडणुकीपूर्वी त्यांना कायम ठेवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत असल्याच्या बातम्या येत होत्या. मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेदरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही 29 जून रोजी रात्री उशिरा दिल्लीत पोहोचले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांनी भाजपच्या सर्वोच्च नेत्यासोबत बैठक घेतली ज्यामध्ये त्यांनी खाते वाटपावर चर्चा केली आणि अंतिम निर्णय घेतला.
ADVERTISEMENT
हे ही वाचा>> NCP: अजितदादा आणि शरद पवारांसोबत किती आमदार?, ‘ही’ आकेडवारी बरंच काही सांगते!
पण आता बदललेल्या समीकरणानंतर, आधीच तयार करण्यात आलेल्या खातेवाटपाबाबत पेच निर्माण झाला आहे. पवार गटही आपल्यासोबत कायम राहिला पाहिजे या दृष्टीने भाजप हायकमांडला आता नव्या पद्धतीने फेरबदल करावे लागतील. अशा स्थितीत मंत्रिमंडळ विस्तारात आपल्या हाती काही लागेल की नाही, अशी भीती शिंदे गटातील अनेक नेत्यांना वाटू लागली आहे. त्यामुळेच सत्ता समीकरण बदलल्यानंतर शिंदे गटात अस्वस्थता दिसून येत आहे.
ADVERTISEMENT
अजित पवारांच्या शपथविधीआधी मंत्रिमंडळात होते 20 मंत्री
अजित पवारांच्या प्रवेशापूर्वी महाराष्ट्र मंत्रिमंडळात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केवळ 20 मंत्री होते. तथापि, त्यात जास्तीत जास्त 43 मंत्री असू शकतात. दुसरीकडे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्रिमंडळात देखील शिवसेनेला अपेक्षा आहे की त्यांना एक कॅबिनेट मंत्रिपद आणि एक राज्यमंत्रीपद मिळण्याची अपेक्षा होती. पण इथे देखील अजित पवारांच्या एंट्रीमुळे संपूर्ण गणित बदलू शकतं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT