BJP : “पंकजा मुंडे राष्ट्रवादीत येणार, हे बावनकुळेंना माहितीये”
विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यापासून पंकजा मुंडेंची पक्षात घुसमट होत असल्याचं सातत्याने बोललं जातंय. त्यांच्या समर्थकांमध्येही असाच सूर आहे.
ADVERTISEMENT
Maharashtra Politics : आमदारकीची निवडणूक हरल्यापासून भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे सातत्याने चर्चेत आहेत. या चर्चेत एक विषय आहे तो म्हणजे त्या भाजपला सोडचिठ्ठी देणार! गेल्या अडीच तीन वर्षात भाजपत पंकजा मुंडेंना डावललं जात असल्याचं सातत्यानं बोललं जातय. इतकंच नाही, तर पंकजा मुंडे यांनी केलेल्या काही विधानांमुळेही या चर्चेच्या या आगीला हवा मिळत राहिलीये. आता महाराष्ट्रात पाय रोवू पाहणाऱ्या भारत राष्ट्र समितीने पंकजांना पक्षात या मुख्यमंत्री करतो, अशी खुली ऑफर दिलीये. दुसरीकडे त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही जाऊ शकतात, अशीही चर्चा दबक्या आवाजात राजकीय वर्तुळात होत असताना आता आमदार अमोल मिटकरींनी मोठं विधान केलंय.
ADVERTISEMENT
बीआरएसकडून पंकजा मुंडेंना ऑफर
विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यापासून पंकजा मुंडेंची पक्षात घुसमट होत असल्याचं सातत्याने बोललं जातंय. त्यांच्या समर्थकांमध्येही असाच सूर आहे. त्यामुळे त्या वेगळा निर्णय घेऊ शकतात, असंही म्हटलं गेलं. आता महाराष्ट्रात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी विस्तार वाढवण्यावर जोर दिला आहे. तेलंगणात सत्तेत असलेल्या बीआरएसने पंकजा मुंडेंना पक्षात येण्याची ऑफर दिली. त्यानंतर एमआयएमने पंकजा मुंडेंना अशीच ऑफर दिली.
हेही वाचा >> देवेंद्र फडणवीसांनी ‘गद्दारी’वरून डिवचले, शरद पवारांनी काढला सगळा इतिहास
मध्यंतरी एका भाषणात बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या की, “मी भाजपची आहे, पण भाजप ही पार्टी माझी थोडीच आहे.” पकंजांच्या याच विधानामुळे राजकीय वर्तुळात सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या गेल्या. आणि वेगवेगळ्या चर्चांचे पेव फुटले.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
अमोल मिटकरींनी पंकजा मुंडेंच्या प्रवेशाबद्दल काय केला दावा?
‘टीव्ही 9’ या वृत्तवाहिनीशी बोलताना अमोल मिटकरींनी पंकजा मुंडेंबद्दल मोठं विधान केलंय. यावेळी पंकजा मुंडेंच्या नाराजीवर प्रश्न विचारला असता, अमोल मिटकरी म्हणाले, “मध्यंतरी एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडेंची भेट घेतली होती. तेव्हापासूनच्या घडामोडी तुम्ही बारकाईने पाहत असाल, तर बऱ्याच प्रमाणात भारतीय जनता पार्टीकडून पंकजा मुंडे यांना वारंवार अपमानास्पद वागणूक दिली जातीये. परवा कारखान्याची निवडणूक झाली, तेव्हा धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे दोघंही सामंजस्याने एकत्र आले. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे, पंकजा मुंडे राष्ट्रवादी पक्षात येतील. पंकजा मुंडे या गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत. त्या महाराष्ट्राचं नेतृत्व आहेत. त्यामुळे त्या आपल्या पक्षात असाव्यात, असं प्रत्येकाला वाटतं. त्यामुळे मलाही वाटतं”.
हेही वाचा >> व्लादिमीर पुतिन यांना निष्ठावंत येवजेनी प्रिझोझिनीने का दिला दगा? समजून घ्या
अमोल मिटकरींनी थेट “पंकजाताई थोड्याच दिवसात त्यांचा पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येतील, हे भाजपामध्ये फक्त चंद्रशेखर बावनकुळेंनाच माहीत आहे,” असा राजकारणात खळबळ उडवून देणारा दावा केलाय.
ADVERTISEMENT
आता मिटकरींनी केलेल्या या विधानावर पंकजा मुंडेंकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही, पण त्या खरंच भाजपला रामराम ठोकणार का? या प्रश्नाने डोकं वर काढलं आहे. पंकजा पुढील राजकारण भाजपत राहुनच करणार की, दुसरी वाट निवडणार, याचं उत्तर पुढच्या काळात मिळेल.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT