India Alliance : मुंबईतील बैठकीत विरोधक दोन गोष्टी ठरवणार, काय आहे अजेंडा?
india mumbai meeting news in marathi : The third meeting of the opposition alliance INDIA will be held in Mumbai on 31 August and 1 September.
ADVERTISEMENT
India Mumbai meeting in Marathi : विरोधकांची आघाडीची अर्थात इंडियाची तिसरी बैठक 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी मुंबईत होणार आहे. त्यादृष्टीने जोरदार तयारी सुरू आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीच्या (MVA) नेत्यांनी ‘मुंबई Tak’ला सांगितले की, मुंबईत होणाऱ्या बैठकीत विरोधी गटातील 5 मुख्यमंत्र्यांसह 26 राजकीय पक्षांचे 80 नेते उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये ही बैठक होणार आहे. पण, यात बैठकीत एका महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे, त्यामुळेच या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे.
ADVERTISEMENT
बैठकीच्या तयारीसंदर्भात पूर्व बैठक शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे काही नेते आज ग्रँड हयात हॉटेलमध्ये MVA आघाडीचे वरिष्ठ नेते भेटणार आहेत.
खासदार सुप्रिया सुळे, अनिल देसाई, आमदार वर्षा गायकवाड, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि संजय निरुपम यांच्यासह मविआ नेत्यांच्या शिष्टमंडळाने मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेऊन सुरक्षा व्यवस्थेबाबत चर्चा केली.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
Video : माजी उपमुख्यमंत्र्यांना तिकीट नाकारलं, उंबरठ्यावर ढसाढसा रडले
समन्वयकांची नियुक्ती
या बैठकीचा अजेंडा दिल्लीतून निश्चित केला जाईल, असे मविआ आघाडीच्या नेत्यांनी सांगितले. यासोबतच समान किमान कार्यक्रमाचा मसुदा तयार करणे आणि इंडिया आघाडी समन्वयक नेमण्यावरही चर्चा होणार आहे. या बैठकीतच दोन समन्वयकांची नावे निश्चित केली जाऊ शकतात.
इंडियाचा लोगो लाँच होणार?
बंगळुरू येथील बैठकीत विरोधकांच्या आघाडीचे नाव निश्चित करण्यात आले. त्यानंतर मुंबईतील बैठकीत इंडिया आघाडीचा लोगोही निश्चित केला जाणार असल्याची माहिती आहे. या बैठकीनंतर हा लोगोबद्दल माहिती दिली जाणार असल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT
ठाकरेंकडे यजमान
उद्धव ठाकरे 31 ऑगस्ट रोजी कार्यक्रमस्थळी मान्यवरांच्या भेटीसाठी डिनरचे आयोजन करणार आहेत. दुसऱ्या दिवशी काँग्रेसकडून दुपारच्या जेवणाचं आयोजिन करण्यात आलेलं आहे. या बैठकीची जबाबदारी शिवसेनेकडे (यूबीटी) आहे. तर राष्ट्रवादीचे नेते उपस्थित असणाऱ्या नेत्यांच्या स्वागताला असणार आहेत.
ADVERTISEMENT
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल हे देखील मुंबईत होणाऱ्या विरोधी आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. मुंबईतील विरोधी पक्षांच्या आगामी बैठकीला आपण उपस्थित राहणार का, असे केजरीवाल यांना विचारले असता, त्यांनी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने मुंबईला जाणार असल्याचे सांगितले.
हेही वाचा >> Lok Sabha Election : राष्ट्रवादाची खेळपट्टी, हिंदुत्वाचा अजेंडा अन्…; ही आहे भाजपची स्ट्रॅटजी!
आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचा सामना करण्यासाठी विरोधी गट इंडिया स्थापन करण्यात आला आहे. विरोधी गटाची ही तिसरी बैठक असेल. त्याची पहिली बैठक जूनमध्ये पाटण्यात आणि दुसरी बैठक गेल्या महिन्यात बेंगळुरूमध्ये झाली होती.
ADVERTISEMENT